पुन्हा एकदा नव्याने 1

Submitted by राम पाटील on 24 December, 2016 - 11:43

आपण कितीही प्रयत्न केला तरी काही गोष्टी अश्या आहेत ज्या विसरता येत नाही .त्यांना विसरावे म्हंटले तरी विसरता येत नाही .मृगजळासारखे असणाऱ्या या गोष्टीचा हव्यास मनाला आवरता येत नाही ,आपल्याला माहित आहे की ती गोष्ट आपल्या साठी नाही, तरी पण आपण त्याच्या मिळवण्याच्या नादात आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी,बरेच सुखद क्षण ,आणि बराच वेळ घालवला असतो ,जो पुन्हा परतून येत नाही .मग अशावेळी घरच्यांच्या ,आपल्या माणसाची आठवण येते,प्रेमासाठी तोडलेली नाती पुन्हा जोडविशी वाटतात ,पण त्यावेळी हाती मात्र निराशाच लाभते . मनात नको ते विचार येतात,संपवून टाकावे जीवन ...
पण का संपवावे जीवन , एकदाच मिळणारे हे जीवन पुन्हा सहजासहजी मिळणार आहे का .पुनर्जन्म मिळण्याइतके वयाच्या तेवीसव्या वर्षी इतके पुण्य खरेतर आपण कमावलेले नसते ,मग का आणि कुणासाठी संपवावे जीवन ,जिच्या विरहासाठी जीवन संपवण्याचा विचार मनात येत आहे ती तर दुसऱ्याच्या बहू पाशात सुखाने जगते , खोट्या आणाभाका कधीच विसरून गेली ती, मी तुझीच म्हणणारी कधीच भातुकलीचा खेळ मोडून गेली, एखादा पूर यावा आणि सगळेच उध्वस्त व्हावे ,अशीच काहीतरी अवस्था असते ना ,कि याहून अजून काही वेगळी, .....
कोकण तसा निसर्ग सौदर्याचा ,विधात्याची देणगी..बऱ्याच कालावधी नंतर आज सगळे काही विसरून नवीन आयुष्य जगायचे म्हणून नवीन आशा मनात बाळगून कोकणचा रस्ता पकडला ,पावसाने नुकतीच सुष्ट्री धुऊन काढली होती ,कदाचित माझ्या पण मनाची अवस्था झाली होती , ती गेली त्याला आता वर्षभराचा काळ गेला असेल ,या कालावधीत सगळ्या आठवणी बऱ्यापैकी पुसून टाकल्या होत्या ,जणू या पावसाने माझ्या पण मनातील विरहाच्या रडन्याने साचलेली घाण धुवून काढली असावी .
निसर्गाच्या कलाकृतीचा आस्वाद घेत माझा कोकणचा प्रवास चालू झाला. नक्की नोकरी करायची कि फक्त मुलखात देऊन यायचे याचाच विचार मनात चालू होता , करावी का नोकरी?आपण तिथल्या वातावरणाशी घेऊ का जुळवून..जुळवून या शब्दावर माझ्या मनातली गाडी थांबली हा शब्द बऱ्याच वेळा कुणाच्या तरी तोंडून ऐकला होता , हा आठवले ! तू प्रत्येक वेळी मला जुळवून घेशील का रे ? कदाचित आपले लग्न झाल्यावर तुझ्या घरचे तरी मला जुळवून घेतील का ? तू तरी माझ्याशी भांडणार नाहीस ना, चुकले तर सांगशील ना समजावून .हि तिची वाक्य पुन्हा डोळ्यासमोर आली.. दादा जरा खिडकीची काच लावून घेता का ? गार वाऱ्याने लेकराला थंडी वाजतेय,मनात नसताना खिडकीची काच खाली केली,त्या आईच्या लेकारासाठीच्या काळजीने माझी तंद्री भंग पावली . बरे झाले त्या माउलीने मला भूतकाळातुन जागे केलं.नाहीतर तसाच भूतकाळात रमलो असतो .
बऱ्याच अंशी तिच्या आठवणी पुसून टाकण्याचा प्रयत्न केला कोकणचा तो निसर्ग रम्य भाग कुणाला आवडणार नाही , तब्बल तीन साडेतीन तासाचा प्रवास करून मी एकदाचा कोकणात पोचलो .आमच्या गावपेक्षा इथलं वातावरण थोडं वेगळंच होत हे उतरल्या उतरल्या मला लगेच जाणवले. तसाच रिक्षा स्टँड कडे गेलो , खिशातून पत्ता काढला आणि एका रिक्षा वाल्याला विचारले ,काका हा पत्ता जरा सांगता का ? थोड्या वेळ घेऊन ते म्हणाले साहेब ,इथून खुप लांब आहे रस्ता तुम्हाला एक तर रिक्षाने तरी किंवा बस ने जावं लागेल.मी म्हंटले मग तुम्हीच चला कि ..चेहऱ्यावर एक स्मित हास्य करून चला साहेब ..वयाने मोठे होते ते काका ,त्यांनी जेव्हा मला साहेब म्हंटले तेव्हा मलाच कसेतरी वाटले . त्या बिचाऱ्या काकांनी मला पत्यावर सोडले ,एव्हाना दुपारचे 1 वाजले आणि माझ्या मुलाखतीचा वेळ होता दुपारी 2 वाजता . पोटात तर भुकेने कावळे ओरडत होते . पण मी मनात ठरवले आधी मुलाखत मग जेवण . नशीब इतके कमजोर होत माझं कि मला हवं तसे कधीच घडत न्हवते . आता चवथ्या मजल्यापर्यंत जायचं म्हणजे उदवाहनाची खूप गरज होती पण पावसाळ्याचे दिवस असल्याने ते पण बंद होते । शेवटी नशिबाला दोष देत मी आपला एक एक पायऱ्या चढू लागलो.ऐन पावसाळ्यात मला घाम येत होता .एकदासा मी माझ्या निश्चित स्थळापर्यंत येऊन पोचलो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राम सर कथा खूप छान आहे,नव्याने केलेल्या सुरुवातीला खूप खूप शुभेच्छा ! ! !
पुढील भाग लवकर टाका......