गुप्तहेर बबन बोंडे

६) गुप्तहेर बबन बोंडे - और खजूर मे लटके

Submitted by सखा on 27 October, 2022 - 08:44

(परंतु या सांस्कृतिक देवाण घेवाणीत झुर्र्याला अजिबात काही कळेना उलट बबन काही तरी अश्लील जोक सांगतो आहे असे वाटून तो गडबडा लोळून हसू लागला. आता हा जर हसून हसून मेला तर या जंगलातून वाट काढणे मुश्किल होईल म्हणून बबनने तो विषय तात्काळ तिथेच थांबविला. आजच्या रात्रीच्या पार्टीत हा देवमाणूस बहार आणणार या खुशीत मग झुर्रा बबन ला घेवून तांड्याच्या दिशेने निघाला.
...आता पुढे )

ही अशक्य चोरी कुणी केली?

Submitted by सखा on 21 February, 2022 - 22:09

गुप्तहेर बबन बोंडे समोर कर्नाटक राज्याचे साक्षात वनमंत्री तोंड पाडून बसले होते पाहून अर्थातच मलाही आश्चर्य वाटले.
बबन माझ्याकडे वळून म्हणाला, "चोरीची केस आहे, माननिय मंत्र्यांचं चंदनाचे ५९९/- रुपयाचे key chain त्यांच्या डेस्कवरून चोरीला गेलेला आहे."
बबन पुढे म्हणाला की एक इसम यांच्याकडे नौकरी मागायला आला होता त्याचंच हे काम असावं.
"सर तुम्ही त्याचं वर्णन करू शकाल का?" बबन मुख्यमंत्र्यांना म्हणाला

गुप्तहेर बबन बोंडेज दिवाळी - अ लाडू टू किल

Submitted by सखा on 13 November, 2020 - 01:49

मित्रांनो ऐन दिवाळीतील या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घ्या. सर जॉनी इंग्लिश, सर ऑस्टिन पॉवर्स आणि माननीय जेम्स बाँड यांना दिवाळीच्या फराळाला आपला लाडका भारतीय गुप्तहेर बबन बोंडे यांनी अर्थातच अत्यंत गुप्तपणे बोलावलेलं नसेल तरच नवल होतं. बबनची माजी गर्लफ्रेंड प्रियांका मस्का, जीने जणू काही भारतात वीर पुरूष नाहीतच अशा अविर्भावात एका बुटक्या अमेरिकन माणसाशी लग्न केले हे तर तुम्हाला माहितीच आहे. असो. तिने आपल्या बबनशी जरी लग्न नाही केलं तरी ती आजही बबनला दिवाळीचे फराळाचे पदार्थ पाठवते याचं कारण म्हणजे तिच्यावर असलेले संस्कार. मुख्य म्हणजे ती स्वतःच्या हातांनी करून पाठवते.

५) गुप्तहेर बबन बोंडे - कोंडासुराचा वध

Submitted by सखा on 30 March, 2017 - 10:18

(पुढच्या टेबलवर एक छानसा गॉगल होता बबन ने घालून पहिला आणि काढणार तोच डॉक्टर म्हणाले उजव्या काडीला फक्त बोटाच्या चिमटीत धर आणि काय आश्चर्य बबन ला भिंतीच्या पलीकडचे आरपार दिसू लागले. डॉक्टर म्हणाले बॉडी हिट सेन्सिटिव्ह क्ष-ray गॉगल. या दिसायला डोकेदुखीच्या गोळ्या आहेत परंतु पाण्यात टाकताच हजारोचा जमाव काबूत आणण्या इतका अश्रू धूर होतो. शेवटी डॉक्टरनी एक टूथपिक दाखवली ते म्हणाले कि हि टूथपिक तुझ्या बोटाचे ठसे ओळखण्या साठी प्रोग्राम केली आहे. हि तू कोणाला टोचल्यास ती व्यक्ती दहातास बेशुध्द पडेल. बी केअर फुल. बबन म्हणाला सर आय मस्ट से आय एम इम्प्रेस्ड! )
(आता पुढे )

विषय: 

४) गुप्तहेर बबन बोंडे - तेरा  बाप चोर है

Submitted by सखा on 2 January, 2017 - 01:44

(>>>अपेक्षे प्रमाणे तिचा तोल गेला आणि बबनने तिला अलगद catch केले. बबनचा जीव  वजनाने कळवळला पण ते त्याने चेहऱ्यावर दाखवले नाही. अर्थात हा अनेक वर्षांच्या ट्रेनिंग चा परिणाम. 
बबन ला पाहून ती मुलगी त्याच्या गळ्यात हात टाकून लटकेच लाजत म्हणाली <<<)

"हाय मी स्वप्न  तर पाहत नाहीये? चक्क आंतरराष्ट्रीय गुप्तहेर मायनस १०१ यांनी माझा कॅच घेतला."
"राष्ट्रीय सौंदर्य जपणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे मिस…"
"किती उदात्त  विचार आहेत तुमचे ...  बनचुकी .. मिस शीला बनचुकी नुकतीच मी इथे लागले आहे"
"फळं नेहमी झाडालाच लागतात"
"हं??"
"काही नाही असु देत"

३) गुप्तहेर बबन बोंडे - मेरा बटू

Submitted by सखा on 30 December, 2016 - 10:32

>>>दोनच मिनिटात विमानाचा स्फोट झाला आणि त्याची वेताळ पंचविशीत कवटीची असतात तशी  पंचवीस हजार शकले होवून आभाळाच्या पायाशी लोळू लागली<<<

(चार दिवस आधी - दिल्ली)

आता जरा आपण चार दिवस मागे जावून घटनाक्रम बघूया.

२) गुप्तहेर बबन बोंडे - सदा सर्वदा योग तुझा असावा!

Submitted by सखा on 29 December, 2016 - 21:16

(ज्याच्या बद्दल आपण हे बोलतो आहोत तो लोकनायक, दिल का बादशाह,यारो का यार,कुदरती चमत्कार  मायनस १०१ आत्ता नेमका आहे तरी कुठे? ढ्याण टे ढ्याण!!!!)

(आकाशात कुठे तरी)

१) गुप्तहेर बबन बोंडे - शानदार सलामी

Submitted by सखा on 29 December, 2016 - 02:58

मित्र आणि मैत्रिणिनो विसाव्या शतकात जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय जासूस बबन बोंडे हे नाव माहित नसेल तर हा दोष बबनचा नाही आपल्या फेसबुक वर कमी टाइमपास करण्याचा आहे हे मला खेदाने नमूद करावे लागेल.
फेसबुक, व्हाटस अेप वर रजनीकांत आणि संस्कारी बाबाच्या दुप्पट जोक्स आज बबनच्या नावावर जमा आहेत हे फेसबुक वरचे कालचे पोर देखील सांगेल.
उदाहरणार्थ आता हे आजचे ताजे जोक्स बघा:

Subscribe to RSS - गुप्तहेर बबन बोंडे