सूर्य डोंगराआड पोचला होता, तिन्हीसांज डोकावत होती, अन् तो भराभर पाय उचलत चालला होता त्याच रुळलेल्या वाटेवरून. कुठे आधार घ्यावा अन् कुठे स्वतःच्याच पावलावर पाऊल ठेवायचे हे त्याच्या हाता-पायांना देखील ठाऊक झालेले होते. चालण्याची गती अतिशय एकसारखी. एकाच तालात त्याची पावले पडत होती. साथीला वारा होताच, तंबोऱ्यावर खर्ज लावल्यासारखा. पण त्याच्या कानांनाही सवयीचे झाले होते हे. मधूनच ओळखीचा रानवेलींचा सुगंध येत होता त्याच्या तीक्ष्ण नाकाला. विचलित न होता तो चालत होता, अंधार पडण्यापूर्वी पोहचायचे होते त्याला तिथे. रातकिडे त्याच्या साथीला येण्याआधी. आज खुशीत होता मात्र तो.
तिथल्या एकटेपणाची त्याला भिती वाटायची, नाही असे नाही, पण ती भिती पण ओळखीची झाली होती त्याच्या. त्यावरचा उपाय ही शोधला होता त्यानेच. वेगात चालत ठिकाणी पोहचणे, एवढेच करू शकत होता तो. नाही म्हणायला ओळखीचे रानगंध सोबतीला असायचे त्याच्या, वळणांवर, चढ-उतारांवर... साथीदार म्हणून.
हळूहळू सकाळी त्यानेच मोकळी केलेली करवंदांची जाळी पार करून खाली आला होता तो. आज तालुक्याला नेलेली सगळीच करवंद दुपारीच संपली होती, हाती वेळ असला बघून ओळखीच्या व्यापाऱ्याकडे थोडी हमाली पण केली, तेवढेच चार पैसे जास्त मिळतील म्हणून. पण त्यातच वेळ कधी सरला कळलं नाही त्याला. लांब झालेल्या सावल्या अंधुक व्हायला लागल्या, तसे याला भान आले अन् मेहनताना घेऊन वेगात सुटला होता. नाही म्हणायला चौकातल्या हलवायाच्या दुकानात थांबला अंमळ, पण तेवढाच.
तिथून निघालेली पायातली भिंगरी डोंगर ओलांडून पायथ्याशी आला तरी थांबली नव्हती. पायथ्याच्या पठारावरून डावीकडे गावातले मिणमिणते दिवे अंधुकसे दिसू लागले तसा हा डावीकडे झटकन वळला अन् आधीपेक्षा भरभर पावले टाकत जाऊ लागला रानाकडे. दोन ऊसाची शेतं ओलांडली. अन् समोर मिणमणता प्रकाश दिसू लागला त्याला. तसं चेहऱ्यावर हसू फुलले त्याच्या. अन् स्वतःच्या वाटणीला आलेल्या अर्धा एकर रानातला ऊसाचा वास नाकपुड्यात शिरला त्याच्या. पळभरात दारात पोचला तो घराच्या, आतून येणारा भाकरीचा वास अन् याला बघून पळत आलेल्या चार वर्षांच्या लेकीचा आवाज त्याच्या दिवसभराच्या कष्टाचे चीज झाल्याची ग्वाही देत होता त्याला.
बसला ओसरीवर, अन् लेक येऊन त्याच्या गुडघ्यांवर हात ठेवून काय खाऊ आणला विचारू लागली. तसा याने नुकताच डोईवरून खाली ठेवल्या डालग्यात हात घातला अन् आणलेली शेव तिच्या हातावर ठेवली. बायकोने पाण्याचा तांब्या दिला हातात. घटागटा पाणी पिऊन म्हणाला बायकोला खुष होत, 'चार पैसे जास्त मिळालेत आज, उद्या घरीच थांबेन म्हणतोय. ते बांधाचं काम पण आहे.'
पण तिलाही कळत होतं, नवऱ्याला आनंद कशाचा झालाय तो. रोज पहिल्या किरणासरशी बाहेर पडताना, सुखाने झोपलेल्या लेकीला बघायचा तो, अन् संध्याकाळी घरी यायचा तेव्हा लेक जागी असूनही, त्याचे रातांधळे डोळे लेकीला बघू नव्हते शकत व्यवस्थित, मन भरायचे नाही त्याचे.
बांध, जास्तीची कमाई ही कारणं फक्त सांगायला होती. उद्या लेकीबरोबर मनसोक्त खेळता, बागडता येणार याची चमक दिसत होती तिला नवऱ्याच्या डोळ्यांमध्ये. ती चमक त्याचा रातांधळेपणाही हिरावून नव्हता घेऊ शकत त्याच्यापासून.
- तो मी नव्हेच
छान आहे कथा. मस्त.
छान आहे कथा. मस्त.
खूपच सुरेख आहे हो.
खूपच सुरेख आहे हो.
सुरेख कथा!
सुरेख कथा!
वा, आवडली.
वा, आवडली.
प्रतिसादासाठी धन्यवाद
प्रतिसादासाठी धन्यवाद
खुप छान कथा!
खुप छान कथा!
आवडली..
आवडली..
छान आहे कथा!
छान आहे कथा!
प्रतिसादासाठी धन्यवाद
प्रतिसादासाठी धन्यवाद
छान कथा
छान कथा
आवडली कथा
आवडली कथा
सुरेख कथा!
सुरेख कथा!
छान कथा. आवडली.
छान कथा. आवडली.
छान आहे कथा. आवडली .
छान आहे कथा. आवडली .
प्रतिसादासाठी धन्यवाद
प्रतिसादासाठी धन्यवाद
छानच.
छानच.
मनाला भिडली कथा....आवडली...
मनाला भिडली कथा....आवडली...
कथा आवडली.
कथा आवडली.
अरे वा छानच
अरे वा
छानच
आवडली
आवडली
छान आहे कथा
छान आहे कथा