नातीगोती

माझ्यात राहुन जगतात बाबा..!

Submitted by अ. अ. जोशी on 17 August, 2014 - 09:24

१७ ऑगस्ट ...! माझ्या वडिलांचा (कै. अनंतराव जोशी यांचा) जन्मदिवस. त्या निमित्ताने....

फोटोमधुनही बघतात बाबा..!
बिनधास्त जग तू, वदतात बाबा..!

नाहीत बाबा, हे मान्य नाही;
माझ्यात राहुन जगतात बाबा..!

झोळी रिकामी माझी तरीही;
प्रेमास हृदयी भरतात बाबा..!

पाठीवरी तेंव्हा हात फिरला...
तो आठवा, मग कळतात बाबा..!

तू मान किंवा मानू नको, पण..
असतेच आई, असतात बाबा..!

करशील का माझ्याशी लग्न ?

Submitted by 'घरटे हरविलेला ... on 14 August, 2014 - 05:18

नेहा,

कुठून आणि कशी सुरवात करू हे कळत नाही. पण विखुरलेला एक एक मोती जसा उचलून हातातल्या धाग्यात अलगदपणे गुंफून माळ तयार करावी तस-काहीस करणार आहे. काही वर्षांपूर्वी (२००५-६ असावे बहुधा) मी तुला खगोल मंडळाच्या कार्यक्रमात प्रथम पहिले तेंव्हाच तुझी हुशारी आणि निरागस हास्य मला आवडले होते. तशी आहेसच तू सुंदर ! कोणालाही आवडशील अशी. पण स्वतःच्या मनाची चलबिचल थांबवण्यसाठी एखद्या निस्तब्ध पाण्यात खडा टाकून ते पाणी ढवळून काढावे असे मला कधीच वाटले नाही. याउलट तिन्ही ऋतूत बहरणाऱ्या रंगीबेरंगी गुलमोहराप्रमाणे तू सदैव बहरत रहावेस अगदी तसाच आदर तुझ्याविषयी नेहमी वाटत राहीला.

शब्दखुणा: 

‘महाराष्ट सोशल ऑलिम्पियाड’

Submitted by हर्पेन on 13 August, 2014 - 02:17

‘महाराष्ट सोशल ऑलिम्पियाड’ हा एक अभिनव कार्यक्रम आहे, ज्यामधून विद्यार्थ्यांच्या सामाजिक बुद्धिमत्ता, नेतृत्वगूण व इतर सामाजिक कौशल्यांचा विकास होईल.

प्रयत्ने स्थळ शोधिता… - भाग १

Submitted by आशयगुणे on 27 July, 2014 - 14:46

" माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलं आहे. मुलगा अमेरिकेचा आहे आणि लवकरच मी देखील 'फ्लाय' करणार आहे", ती मला म्हणाली. हे ऐकताना मी माझा चेहरा शक्य तितका स्थिर ठेवायचा प्रयत्न करीत होतो हे मला जाणवत होते. त्यामुळे बहुतेक वाक्य माझ्या कानीच पडत नव्हती. परंतु जे ऐकायचे ते ऐकले. हिचे लग्न ठरले होते आणि आता माझ्या पुढे पर्याय उरले नव्हते. त्यामुळे आता पुढचे पाउल कुठे आणि कसे टाकायचे ह्याचा विचार करावा लागणार होता. ऑफिस ह्या क्षेत्रा पुरते सारे पर्याय संपुष्टात. आणि आता पर्यायच हवे असतील तर नोकरी बदलायला लागणार होती. पण मी इथे रुजू होऊन वर्ष पण झाले नव्हते.

गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 July, 2014 - 04:02

मध्यंतरी माझ्या वाचनात एक चर्चा आली होती की पालकांनी मुलांचे मोबाईल चेक करावेत का?
एक मतप्रवाह होता की आपला मुलगा / मुलगी काय गुण उधळतोय यावर लक्ष ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे.
दुसरा मतप्रवाह होता की मग सज्ञान झालेल्या मुलांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचे काय?

असाच एक प्रश्न गेले काही दिवस मला अनुभवांतून छळतोय.
गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का?

नवरा-बायको नाते एकवेळ समजू शकतो, तुम्ही एकमेकांचे मोबाईल चेक करा किंवा चुलीत घाला, पण आयुष्यभर एकमेकांनाच झेलायचे आहे.
मात्र प्रेमप्रकरणात आपल्या गर्लफ्रेंडला हा अधिकार देण्यात यावा का?

मराठी चित्रपटांची/मालिकांची मुलगा-सून द्वेष्टी मानसिकता !!!

Submitted by निमिष_सोनार on 18 July, 2014 - 05:01

"सून-मुलगा अति नालायक आणि वाईट असतात पण आई-वडील-नणंद-जावई ही माणसे देवापेक्षाही श्रेष्ठ आणि आदर्श माणसं असतात" असा संदेश देणारे मराठी चित्रपट बंद होत आहेत आणि मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक प्रगल्भ होत आहेत असे मला वाटायला लागले असतांनाच मध्यंतरी एक "स्वातंत्र्याची ऐशी तैशी" हा चित्रपट आला आणि वाटलं की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहाणार म्हणजेच मराठी चित्रपट हे सून-मुलगा द्वेष्टेच राहाणार!! असे हे चित्रपट नाण्याच्या केवळ एकाच बाजू साठी बनवले जाणारे चित्रपट असतात. नाण्याला दुसरी बाजू असते हेच मुळी त्यांना मान्य नसतं.

जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

खऱ्या 'ईशा'च्या लग्नाची गोष्ट

Submitted by आशूडी on 8 July, 2014 - 14:50

माझी एक मैत्रीण आहे. सुस्वरुप आहे, एकत्र कुटूंबात वाढली आहे. एल्.एल्.बी करुन पुण्यात एका चांगल्या वकीलांकडे प्रॅक्टिस करते. शिवाय स्वतः स्वतंत्रपणेही काम करते. म्हणजे अगदी आपल्या एका लग्नाची तिसरी गोष्ट मधल्या ईशासारखीच. तिचे लग्न न ठरण्यात मोठा वाटा तिच्या कार्यक्षेत्राचा आहे. कारण मुलगी 'वकील' आहे म्हणताच ऐकणार्‍याचे तोंड एवढेसे होते. मुलाची आईच असेल तर जणू आता आपल्या घरात रोजच 'जनता की अदालत' भरणार हे भविष्य दिसून तिची घाबरगुंडी उडते. मुलगी कशी आहे, काय करते, तिच्या इतर आवडी निवडी काय आहेत हे जाणून घ्यायच्या आधीच नकार दर्शवला जातो.

शब्दखुणा: 

तू गेल्यावर.....!!

Submitted by दुसरबीडकर on 2 July, 2014 - 12:01

तू गेल्यावर पक्के घर नुसते कोसळते..
आधाराला कोणी नसले की मन छळते..!!

राहू दे ना हात घडीभर स्वप्नांभवती..
'अंगण झाडायाचे आहे' मजला कळते..!!

वापरतो तू कुठले अत्तर सांगत जा रे..
धरतीवर तू कोसळतांना जग दरवळते..!!

मी नसले की वार्यावरती लक्ष असू दे..
आठवणींच्या पानोपानी मी सळसळते..!!

बांधावरचे सुकले होते झाड जरासे..
त्याला कळले जमिनीमधले दुःख तरळते..!!

प्रत्येकाचे 'घर कौलारू' सुंदर नसते..
अंदर गेल्यावर कळते,छप्परही गळते..!!

आयुष्याची भाकर साला चन्द्र नसावा..
ते तर नक्की सुर्याइतके सत्य उजळते..!!

Pages

Subscribe to RSS - नातीगोती