शब्दांचे बुडबुडे..
मी का लिहिते आहे कुठपर्यंत लिहिणार, कधी थांबणार, का आणि कोणत्या विषयावर लिहिणार याचे कोणतेही ठोस उत्तर माझ्याकडे नाही. हि सुरुवात करताना मी सुद्धा स्वताला खूप सगळे प्रश्न विचारते आहे आणि प्रामाणिकपणे उत्तर देते आहे. काही शब्द तर फक्त माझ्याभोवतीच येऊन थबकतात, अडखळतात, रुंजी घालत राहतात...
झालं... निघालास? आत्ता आत्ता तर परवाच्या सोमवारी आला होतास नं? आणि लगेच निघालास हि?
आयुष्यात किती लोकांना भेटतो आपण? जन्माला आल्यापासून सुरू झालेली भेटीगाठींची शृंखला अगदी मरणापर्यंत चालू असते. यातले काही लोक अगदी चटकन आयुष्याचा एक भागच होऊन जातात तर काही तितक्याच सहजपणे विस्मरणात जातात. प्रत्येकाच्या स्वभावाची, विचारांची आणि सहवासाची वेगळी छाप आपल्या मनावर पडून जाते. अशा सुहृदांच्या सहवासात गेलेले अनेक क्षण नंतरच्या आयुष्यात आठवणींच्या रुपाने आपल्याला आनंदी करत असतात, पण इतक्या सहजतेने जगू देईल ते मन कसले!!! ज्ञात-अज्ञाताच्या सीमारेषेला सहज पार करून मन एखाद्या सुप्त आठवणीने अशी हुरहुर लावते की काही केल्या मन शांत होत नाही.
तासाभरात गावाचा काश्मिर झाला
हातभर गारांचा सडा पडला
साहेब गाडीत बसुन आला
शेतात फिरता फिरता घामान निथळला
आन म्हणाला
" कसल ओसाड वाटतय ना ?????"
त्याला कस , अन कोण सांगणार
काल झाडाच पान न पान लढल
आता तर
झाडाच मुळपण गोठल
नक्षत्रापार नक्षत्र सरली
भुई कोरडी ठाक राहीली
हिम्मत नाय हारली
उसणवारीची धुळपेर केली
पालवी नाय त नायच फुटली
साहेब गाडीतच बसला
शेतात न फिरताच म्हणाला
" बाहेर फारच उकडत नाही?????"
त्याला कस , अन कोण सांगणार
पाउस इकड यायचाच विसरला
आता तर
सगळ काही सुकल
भर श्रावणातच अत्यावश्यकची संक्रांत आली
उरली सुरली हिम्मत गणपती बाप्पान सोबत नेली
जीवनाची वाट चालतांना कधी कधी मध्येच थबकावेसे वाटते. वा आपण किती अंतर चाललो, काय मिळविले? काय गमावले, पुढे काय? आपले ध्येय काय? आपल्याला कुठे जायचे आहे? असे प्रश्न मनाला पडतात.
|| श्रीगणेशाय नमः ||
एके दिवशी लॉगिन केल्यावर 'मायबोली गणेशोत्सवासाठी संयोजक हवेत' हा धागा दिसला.
चला, दिल्ली सामुहिक बलात्काराची बळी ठरलेली ती मुलगी अखेर गेली.
सुटलीच, नाही का?
ती ही सुटली अन आता तिचा मृत्यूच झालेला असल्यामुळे कदाचित हा विषय मागे पडून तिचे दोषी असलेले ते काहीजण सुद्धा सुटतील. किंवा होईल त्यांना शिक्षा, ३-७ वर्षांच्या सक्त-मजुरीची. मग ते पुन्हा बाहेर येतील आणि कदाचित एखाद्या अशाच संध्याकाळी आपल्या लिंग-पिसाट वृत्तीसमोर शरणागती पत्करून आणखीन एका "अमानत" वर/मध्ये 'मोकळे' होतील.
मग आपण परत निषेध व्यक्त करू, निदर्शनं करू, सरकारला शिव्या घालू, सरकार हिजडं आहे अशी आपली मौलिक प्रतिक्रिया सुद्धा देऊ. मग काय, बहुधा, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!