नातीगोती

खऱ्या 'ईशा'च्या लग्नाची गोष्ट

Submitted by आशूडी on 8 July, 2014 - 14:50

माझी एक मैत्रीण आहे. सुस्वरुप आहे, एकत्र कुटूंबात वाढली आहे. एल्.एल्.बी करुन पुण्यात एका चांगल्या वकीलांकडे प्रॅक्टिस करते. शिवाय स्वतः स्वतंत्रपणेही काम करते. म्हणजे अगदी आपल्या एका लग्नाची तिसरी गोष्ट मधल्या ईशासारखीच. तिचे लग्न न ठरण्यात मोठा वाटा तिच्या कार्यक्षेत्राचा आहे. कारण मुलगी 'वकील' आहे म्हणताच ऐकणार्‍याचे तोंड एवढेसे होते. मुलाची आईच असेल तर जणू आता आपल्या घरात रोजच 'जनता की अदालत' भरणार हे भविष्य दिसून तिची घाबरगुंडी उडते. मुलगी कशी आहे, काय करते, तिच्या इतर आवडी निवडी काय आहेत हे जाणून घ्यायच्या आधीच नकार दर्शवला जातो.

शब्दखुणा: 

तू गेल्यावर.....!!

Submitted by दुसरबीडकर on 2 July, 2014 - 12:01

तू गेल्यावर पक्के घर नुसते कोसळते..
आधाराला कोणी नसले की मन छळते..!!

राहू दे ना हात घडीभर स्वप्नांभवती..
'अंगण झाडायाचे आहे' मजला कळते..!!

वापरतो तू कुठले अत्तर सांगत जा रे..
धरतीवर तू कोसळतांना जग दरवळते..!!

मी नसले की वार्यावरती लक्ष असू दे..
आठवणींच्या पानोपानी मी सळसळते..!!

बांधावरचे सुकले होते झाड जरासे..
त्याला कळले जमिनीमधले दुःख तरळते..!!

प्रत्येकाचे 'घर कौलारू' सुंदर नसते..
अंदर गेल्यावर कळते,छप्परही गळते..!!

आयुष्याची भाकर साला चन्द्र नसावा..
ते तर नक्की सुर्याइतके सत्य उजळते..!!

माझ्या मनातले घर कोंदट. .

Submitted by दुसरबीडकर on 25 June, 2014 - 06:58

माझ्या मनातले घर कोंदट..
अन तू अख्खे घर धडधाकट...!!

तुझ्या प्रितीचे औषध व्हावे...
मरणावरी उतारा दसपट..!!

मौन तुझे मज बोलत असते..
व्यर्थ कशाला आदळआपट..!!

वसतिगृहावर मला सोडुनी..
हळवा होतो 'बाबा' तापट..!!

सुगी संपली स्वप्नांमधली..
मागे आठवणींचे धसकट..!!

असे जगू की तसे जगू मी...
आयुष्याची नुसती फरपट..!!

विहिर मनाची भरली नाही..
यंदा झाला पाउस हलकट..!!

डोळ्यामधले कळते तुजला..
उगीच का तू म्हटली...'चावट.'.!!

सुखाचीच पडझड झाल्यावर..
डागडुजी दुख करते दणकट...!!

मधुमालतीचा मांडव....

Submitted by झुलेलाल on 18 June, 2014 - 00:37

गेल्या महिन्यात आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचं पहिलं स्नेहसंमेलन झालं. 1948 पासूनचे नाहीत, पण 94 वर्षांचे गोपाळ केतकर मुद्दाम संमेलनाला हजर राहिले होते. म्हणजे, जवळपास सगळ्या माजी तुकड्यांचे प्रतिनिधी. सातआठशे जणांच्या, वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्तुंग नाव कमावलेल्या या संमेलनात मी मुख्य वक्ता होतो.
सहाजिकच, शैक्षणिक दर्जातील कालांतर असा विषय डोळ्यासमोर ठेवून मी बोलत गेलो.
त्यासाठी फार नोंदी कराव्या लागत नाहीत.
आपली विद्यार्थीदशा आणि पालकदशा यांचा आढावा घेताना हा विषय सहज मांडता येणार होता.
त्याच ओघात, एका क्षणी मला वडिलांची असह्य आठवण आली.

ओल .....

Submitted by पुरंदरे शशांक on 16 June, 2014 - 00:38

ओल .....

मनी दाटता सय कोणाची
अंधारुन ते येते सारे
उगाच कुठले कारण नसता
आठवणींची वीज थरारे

चूक-बरोबर होते का ते
जाऊनिया क्षण युगे लोटली
विचार आवर्ती सापडता
मेघगर्जना कानी घुमली

भळभळताना जखम उरींची
खोल वेदना चिरीत गेली
टपटपताना अश्रू सारे
विचित्रशी ती आर्त काहिली

नकोच ओझे आठवणींचे
नको लढा तो मनीमानसी
वाहून गेले पाणी तरी का
ओल रहाते जराजराशी .....

पेटेंटेड मराठी

Submitted by शबाना on 13 June, 2014 - 09:43

प्रत्येक घराची, नात्याची एक वेगळी अशी भाषाशैली असते. एखाद्या सदस्याचा अगदी पेट शब्द असतो, जोक्सची जातकुळी असते आणि कोणावर कशाप्रकारचे जोक्स 'मारले' जातात हेही त्या कुटुंबाच्या कालौघात नक्की झालेले असते. पुढे आपापल्या आयुष्याच्या दिशा बदलल्या, वर्षानुवर्षे सहवास नसला तरी यातले काही शब्द, म्हणी किंवा एखाद्या घटनेच्या संदर्भात निर्माण झालेली वाक्य त्या कुटुंबासाठी अगदी सौ टक्का हसायला लावणारी, त्या त्या व्यक्तीचे स्वभावविशेष दर्शवणारी अशी असतात.

वृद्ध पालकांची काळजी व देखभाल

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 7 June, 2014 - 07:37

आपले वृद्ध पालक आपल्यासोबत राहत असोत किंवा वेगळे राहत असोत, त्यांची काळजी वाटणे हे साहजिक, स्वाभाविक आहे. आपल्या मात्या-पित्यांना त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध हा विनासायास, आनंदाने व निरामय आरोग्याने व्यतीत करता यावा असे बहुतेकांना नक्कीच वाटत असणार! परंतु प्रत्यक्षात ते साध्य होतेच असे नाही. नोकरी-व्यवसायातून सेवानिवृत्त होऊन आपला वेळ उत्तम प्रकारे घालवणारे जसे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत तसेच व्याधी अथवा अन्य काळजी - चिंतांमुळे ह्या काळाचा व्यवस्थित आनंद न घेऊ शकणारेही बरेच वृद्ध आहेत.

जोडप्यांसाठी : परस्पर-नातेसंबंधातील लाल बावटे (सार्वजनिक धागा)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 5 June, 2014 - 07:35

वर्तमानपत्रांमध्ये किंवा टीव्हीवर आपण संशयापोटी, भांडणातून किंवा अन्य काही कारणांतून जोडीदाराचा खून, हल्ला, हिंसा, अ‍ॅसिड अ‍ॅटॅक यांबद्दलच्या बातम्या आजकाल रोजच वाचत व पाहात असतो. काही वेळा त्या क्षणी तोल ढळणे, मानसिक संतुलन बिघडलेले असणे ही कारणे जरी ग्राह्य धरली तरी कित्येकदा अशा घटनेची चाहूल ही हिंसाचार करणार्‍या व्यक्तीच्या इतर वर्तनातून अगोदरच लागलेली असते.

तीन तिघाडा

Submitted by ललिता-प्रीति on 29 May, 2014 - 02:34

वैभवी आणि मुक्ताची मैत्री झाली हे एक आश्चर्यच होतं. मुळात, त्यांच्या ओळखीला मैत्री म्हणणं हेच एक आश्चर्य होतं. पण इतरांना त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. इतरांच्या मते त्या दोघी पंचवीस वर्षांपूर्वीपासूनच्या मैत्रिणी होत्या.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - नातीगोती