नातीगोती

उपाय सुचवा!

Submitted by मी_आर्या on 11 December, 2013 - 01:09

आजकाल घरात नकोसे झालेले, रस्त्यावर विमनस्क अवस्थेत फिरणारे,कुठेतरी वेळ घालवायचा म्हणुन घालवणारे वृद्ध दिसले की मन विषण्ण होते.

नातं …

Submitted by Manasi Brid on 5 December, 2013 - 06:28

नातं म्हणजे नक्की काय ? खरतरं नातं म्हणजे प्रेम आणि विश्वास यांची एकसंध गुंफण . नातं मग ते कोणतेही असू दे,ते सहज असावे . नात्यातील सहजता हा नाती टिकवून ठेवण्यासाठीचा एक महत्वाचा घटक ठरतो . एखादी चूक झालीच जर आपल्याकडून तर ती चूक समजून घेऊन सावरूनही घेत यायला हवी .उद्या कदाचित आपल्याकडून ही हे असं घडू शकत हे लक्षात ठेवून जर समजून घेण्याचा प्रयत्न केला न तर समजून घेणं हि सोपं जातं आणि सावरून घेणं हि …

दुसर्‍या लग्नानंतर अपत्याचे नवीन नाव लावण्याबद्दल कायदेशीर सल्ला हवा आहे.

Submitted by इदं न मम on 3 December, 2013 - 06:12

लोकहो,
माझ्या एका मैत्रीण तिच्या नवर्‍यापासुन गेली ४ वर्ष विभक्त रहाते. कायदेशीररीत्या घटस्फोट झालेला आहे. तिला एक १२-१३ वर्षाचा मुलगा आहे. ती आता दुसर लग्न करतेय. हा नवरा तिच्या मुलाला सांभाळायला तयार आहे. त्याच नावही मुलाला द्यायला त्याची हरकत नाही. माझा प्रश्न हा आहे, की हे अस नाव लावण्यासाठी काय कायदेशीर प्रोसीजर आहे? दत्तकविधान करावे लागते का?सरकारी गॅझेटमधे द्याव लागेल का?
माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीची या बाबतीतली गोष्ट सांगते.

अजून एक लव स्टोरी

Submitted by विद्या भुतकर on 8 November, 2013 - 10:51

ही मी लिहिलेली सर्वात मोठी गोष्ट. ब्लॉगवर एकेक करत भाग टाकले होते. मायबोलीवर इतक्या सगळ्या कथा वाचून आपली पण वाचायला द्यावी असे वाटले. इथल्या अनुभवी लोकान्कडून सुचना मिळतील तर त्या पुढील लिखाणाला उपयोगी पडतील नक्कीच.

----------------------------------भाग पहिला: राहुल--------------------------------

पारसी बावा 'दानू'

Submitted by आशयगुणे on 5 November, 2013 - 10:31

मुंबईच्या 'फ़ाइव गार्डन' ह्या माटुंगा मधील भागात बरीच वर्दळ असते. गार्डन म्हटलं तर टांगे, छोटे पाळणे, भेळवाले, चणे-दाणे वाले आणि तत्सम विक्रेते असतात. लोकं आपल्या पोरांना घेऊन गार्डन मध्ये फिरायला येतात. कुठे दहा-बारा संघ वेगवेगळ्या खेळपट्ट्या पकडून एकाच मैदानात क्रिकेट खेळायची कसरत करीत असतात तर कुठे कुणीतरी संध्याकाळी तिथल्या कट्ट्यांवर योग किंवा कराटेचे 'क्लासेस' घेत असतात! जवळच २-३ कॉलेज असल्यामुळे तिथल्या जोडप्यांनी गार्डन मधील अंधारे कोपरे बऱ्याच चतुराईने शोधलेले असतात.

केनियाच्या आजीबाई

Submitted by medhaa on 22 October, 2013 - 06:46

बसमधे एक अफ्रिकन आजीबाई चढल्या... boycut, skirt, हातात पर्स, बॅग एकदम टापटीप...ड्रायव्हरशी हसुन बोलुन तिकिट घेउन आत आल्या, जागा शोधत माझ्या शेजारी येऊन बसल्या.

माझ्या पलिकडच्या सीटवर माझा नवरा आणि पोरगी खिडकीतून बाहेर बघत, गप्पा मारत होते...
आजी एकदम शांत आणि साध्या वाटत होत्या... सगळी बस शांत होती. एकदम रस्त्याच्या कडेला गर्दी दिसली.. NRI Punjabi लग्न सुरू होत..सजवलेला शुभ्र घोडा, सरदारजी रंगीत पगड्या घातलेले, छान साड्या, ड्रेस घातलेल्या बायका आणि बॅन्ड... बस मधले सगळे लोक गंमत बघत होते. मी खिडकीत बसले होते आणि शेजारच्या आजींनी डोकावुन बाहेर बघीतलं आणि हासल्या.. Indian wedding...

शब्दखुणा: 

मुलं - काही नोंदी

Submitted by मितान on 21 October, 2013 - 03:09

मुलं - काही नोंदी
गेले काही दिवस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हाताळायला मिळतायत. आलिप्त राहून काम करायचे ठरवले तरी मनात अस्वस्थता दाटून राहतेच. लिहिल्याने थोडे बरे वाटेल असं वाटतंय म्ह॑णून हा प्रपंच..लिहिताना अर्थात त्या त्या व्यक्तींच्या खाजगीपणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहे.

अवनी. वय १७.

सल्ला हवा आहे

Submitted by याज्ञी on 3 October, 2013 - 04:15

नमस्कार!
मी इथ खुप दिवसान्पासुन फक्त वाचन करत होते. हे कुठे टाकाव कळल नाही. खर तर सल्ला हवा आहे. मायबोलीवर चान्गले सल्ले मिळतात, हे माही त होत.
माझ्या नात्यातली एक मुलगी तिच्या १२ वर्षाच्या मुलासहीत माहेरी पुण्यात रहाते.विधवा आहे. नोकरी करते. महिना १८००० पगारात काटुनकुटुन १४००० हाती पडतात.

होते

Submitted by ashishcrane on 30 September, 2013 - 07:11

थुंकूनी जे गेले,
ओठ ओळखीचे होते
होते गच्च हात धरलेले,
आतुनी पोकळीचे होते

चंचल भुंगे मनात होते,
रस्ते मनाचे नजरेहून वेगळे,
मृगजळाशी नाव उभी वेडी,
भरलेले घर आमुचे मोकळेच होते

शब्द वचनांचे बाजारात विकले होते,
असतील गळले.. केस आठवणींचे पिकले होते,
कळले...ओठ मी परक्या कपाळी टेकले होते,
पाहीले मी...सरणावरही त्यांनी हात शेकले होते

--आशिष राणे

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - नातीगोती