ऑटीझम

५ रात्रींची कथा

Submitted by Mother Warrior on 17 January, 2016 - 21:14

गेल्या विकेंडला मला थोडे बरे नव्हते. डोकेदुखी, दातदुखी, घसादुखी अशी बरीच दुखणी एकदम आली. शनीवार रात्र अजिबात झोप लागली नाही. रविवारी दिवसा बराच काळ झोप भरून काढण्यात गेला. माझा मुलगा त्या दिवशी सरप्राईझिंगली छान राहीला. एकदाही आईच पाहिजे म्हणून रडला नाही. बाबाबरोबर एकदम व्यवस्थित राहीला. नाहीतर पूर्वी आई दिसली नाही ५ मिनिटं की शोधमोहिम चालू. तसे झाले नाही. मला रविवारी जरा बरे वाटू लागल्यावर ह्या गोष्टीचे फार आश्चर्य वाटले! मनात म्हटले अरेवा! २०१६ ची सुरूवात छानच झाली! लिटल डिड आय नो, ती वादळापूर्वीची शांतता होती.

ऑटीझम कॉन्फर्न्सचा अनुभव, ग्लुटेन आहारात असण्याचे दुष्परिणाम इत्यादी.

Submitted by Mother Warrior on 30 October, 2015 - 21:42

मी नुकतीच एका 'ऑटीझम कॉन्फरन्स'ला जाऊन आले. http://tacaautismconference.com/

विषय: 

काढून टाकला आहे

Submitted by Mother Warrior on 20 July, 2015 - 23:05

काढून टाकला आहे.
काढून टाकला आहे.
काढून टाकला आहे.
काढून टाकला आहे.
काढून टाकला आहे.

... And he 'said' I Love You !

Submitted by Mother Warrior on 8 May, 2015 - 21:58

सर्वांना येऊ घातलेल्या मदर्स डेसाठी शुभेच्छा!! मी जी गोष्ट सांगत आहे ती तशी झाली १५ दिवस जुनी. पण ह्या मदर्स डेच्या निमित्ताने लिहीत आहे. तुम्हा सर्वांना सांगावे असं वाटले. मदर्स डेच काय मला तर आयुष्यभराची गिफ्ट मिळाली!!

शीर्षकात लिहील्याप्रमाणे हो! he 'said' I Love you! हा ही म्हणजे अर्थातच माझा मुलगा. माझा, ऑटीझम असलेला, अजुन एकही शब्द न उच्चारणारा कसा काय म्हणाला आय लव्ह यू?

शब्दखुणा: 

काय करायचे अजून?

Submitted by Mother Warrior on 23 February, 2015 - 15:23

काय करायचे अशा वेळेला?

एक महिना झाला मुलगा आजारी पडून. आता ९५% बरा आहे. पण ५% फारच त्रास देत आहेत.
अधूनम्धून खोकतो. सर्दीने इतका बेजार की चिडचिड करतो. रात्रीबेरात्री किंचाळत रडत बसतो. रात्री झोपतानासुद्धा आयपॅड बरोबर असण्याचा हट्ट करत बसतो. बरं आयपॅड दिला तर शांत होतो का? नाही तरीही रडत बसतो.
तुमचं समजूतीचे एकही वाक्य पोचतच नाही त्याच्यापर्यंत.
तो किती दूरच्या जगात आहे ह्याची जाणीव अशा वेळेस अगदी हमखास होते.
सर्दीने त्याचे डोके दुखत आहे का? ते त्याला सांगता येत नाही म्हणून चिडलाय का?

विषय: 
शब्दखुणा: 

@AutismMarathi followed by @DrTempleGrandin! :)

Submitted by Mother Warrior on 14 January, 2015 - 21:04

मला फार आनंद झाला आहे. तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला. डॉ. टेंपल ग्रांडीन नाव घेतलं की कानाला हात जातो इतके आदरणीय व्यक्तीमत्व. स्वतः १९४९ मध्ये वय वर्षे २ असताना ऑटीझम(ब्रेन डॅमेज) डायग्नोसिस मिळालेल्या टेंपल ग्रांडीन - त्यांना मिळालेल्या चांगल्या शिक्षिकांमुळे त्याच्बरोबर अतिशय जिद्दीच्या, धडाडीच्या आईमुळे पुढे बोलू लागल्या, शिक्षण घेतले,अ‍ॅनिमल सायन्समध्ये पीएचडी देखील केली. ऑटीस्टीक लोकांसाठी हग मशिन त्यांनी डिझाईन केले. व मुख्य म्हणजे ऑटीझमच्या त्या अगदी महत्वाच्या प्रवक्त्या आहेत. ऑटीझमवरील त्यांची भाषणं, कॉन्फरन्सेस प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर पुस्तकं देखील!

Endless to-do list

Submitted by Mother Warrior on 12 January, 2015 - 20:56

ही अशीच गंमत. ही माझी फक्त मुलासंबंधित टूडू लिस्ट. तरी शाळेसंबंधित काहीच आले नाही यात.
नो वंडर, मला मुलाखेरीज दुसरे काहीच सुचत नाही..

autism_to_do_list

विषय: 

How to make Weighted Blanket - जड पांघरूण बनवा

Submitted by Mother Warrior on 8 January, 2015 - 21:14

मी कायम लिहिते त्याप्रमाणे माझा मुलगा नुसता पळत असतो. सतत. खरं सांगायचे तर कितीही प्रयत्न केला तरी मला काही त्यामागचे सायन्स समजू शकत नाही. (कारण माझे सेन्सरी प्रोसेसिंग मुलापेक्षा वेगळे आहे) पण त्याला सतत पळायचे असते हे मात्र खरे. मी तर गमतीत म्हणते, माझा मुलगा चालायला कधी शिकलाच नाही, तो रांगता-रांगता पळायलाच शिकला एकदम. Happy

Son's Drawing and Writing @ Age of 2 to 4

Submitted by Mother Warrior on 6 January, 2015 - 13:53

ही माझ्या मुलाची चित्रकला व लेखनकला. तो साधारण एक सव्वा वर्षाचा असल्यापासून त्याला एबीसीडी, शेप्स, कलर्स ओळखू येऊ लागले. मग हळूहळू २र्या वर्षापासून स्पीच, एबीए थेरपीस्ट यांच्याबरोबर खेळताना चित्रकला हा एक मुख्य पूल झाला संवादाचा. तेव्हापासून मुलाला चित्रकला , लिहायला खूप आवडते. त्याला जेव्हापासून लिहून दाखवले तर आईला कळते लवकर हे समजले, तेव्हापासून तर अजुन मजा येऊ लागली. अर्थात तो खूप लिहीत नाही. तो आठवड्या-२ आठवड्यातून एखादा शब्द लिहीत असेल. मला त्याला कितीही इच्छा झाली तरी लिहीण्यासाठी फोर्स करायचे नाही. तो मनाने, स्वतःहून लिहील तेव्हाच त्याला त्यात मजा वाटेल.

Pages

Subscribe to RSS - ऑटीझम