आठवण

आठवण

Submitted by sangeeta kadam on 26 November, 2020 - 02:54

खूप खूप आठवण येते तुझी रोज
कमी वेळ नव्हता रे आपण एकत्र घालवलेला , तब्बल ३१ वर्षे,
काय नाही केले, एकमेकां सोबत,
खूप बोललो, भांडलो, काळजी घेतली, रुसलो, विरहात राहिलो, प्रवास केला,
पण तू असा अचानक जाशील असा कधी विचार पण नव्हता केला रे, का गेलास असा मला सोडून एकटीला,
खूप आठवण येते रे तुझी, कुठे शोधू तुला, कसा शोधू,
कसा पुढे निभावून नेऊ सगळं.....................
सांग ना , एकदा फक्त सांगायला तरी ये, कि तुला पण माझी आठवण येते म्हणून

विषय: 
शब्दखुणा: 

इयरफोन आठवण

Submitted by राधानिशा on 5 September, 2020 - 14:47

इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स किंवा तत्सम वस्तूंचं आश्चर्य किंवा चकीत होणे असं होणं कमी होत चाललं आहे .. नवी पिढी तर मोबाईल बघतच पाळण्यातून रांगणे आणि पावलं टाकणे या फेज मध्ये पोहोचते आहे .. चिंटूच्या एका स्ट्राईपमध्ये चिंटूचे पप्पा विचारतात नवीन फोन आणला की मला त्यातलं शिकवशील ना ... चिंटू हसू लागतो , म्हणतो त्यात काय शिकायचं असतं ? ज्या मोबाईल कॉम्पुटरसंबंधित गोष्टी आधीच्या पिढीला थोडी शिकून घ्यावी लागतात ती आताची 5 - 7 वर्षांची मुलं सहज करतात जणू काही पोटातूनच शिकून आली आहेत मोबाईल वापरणं ... त्यांना कधी कुठलं गॅझेट चकीत करू शकेल असं वाटत नाही ...

शब्दखुणा: 

आठवणींचा झोपाळा

Submitted by काव्यसखी on 2 September, 2020 - 08:13

आपल्या सगळ्यांना एकत्र आणणारं
असं एक आडनाव
आणि सगळ्यांच्या आठवणीतलं
आपलं घर, आपलं गाव..

कोबा, ओटी, माजघर, स्वैपाकघर
अंधारी बाळंतीणीची खोली
मागच्या अंगणातील गोठा आणि
वकील मास्तराची खिल्लारी जोडी..

आंब्या फणसांनी रसरसलेल्या बागा
माडीवर भरभरून सांडणारी सुपारी
ह्या घरात उठल्या असतील
कितीक असंख्य जेवणावळी...

वादविवादांच्या वादळांनी
हलल्या असतील घराच्या भिंती
तरी जखमेवर फुंकर घालणारी
इथल्याच तुळशीची माती...

फरक पडतो !

Submitted by ध्येयवेडा on 22 May, 2020 - 08:27

मी आपला त्याच एका प्रश्नात अडकलेला - "लग्न करायचं की नाही"?
मग आयुष्यात तू आलीस.
तरीही पूर्वग्रहदूषित ह्या मनाचा प्रश्न कायमच ! पुढे जावं की नाही, जावं तर का जावं? नाही जावं तरी का नाही?

प्रचंड विचार, वाचन आणि चर्चा झाल्यावर निर्णय झाला.
आपलं लग्न झालं.
तूसुद्धा केलाच असशीलच की असा विचार. तुलाही पडले असतील असले प्रश्न.
मला आठवतचं नाही कधी आपण ह्याबद्दल चर्चा केली असेन.

लग्न झाल्यावर सुरुवातीला सगळे किती कौतुक करायचे आपलं. पण सोबत टोमणेही मारायचे. "नवीन लग्न आहे, सुरुवातीला कौतुक होणारच. नंतर आहेच आपलं, सर्वां सारखंच !"

विषय: 
शब्दखुणा: 

मन वढाय वढाय...

Submitted by मन्या ऽ on 5 May, 2020 - 04:51

मन वढाय वढाय...

nimita यांची 'मन वढाय वढाय' ही कथा वाचल्यावर मनात विचारांची रांग लागली होती... तेच विचार कवितेत शब्दबद्ध करायचा माझा केविलवाणा प्रयत्न... Happy

पसारे ते भावनांचे
आवरावे किती?
मनास माझिया मी
सावरावे किती?

ओढ तुझी, कि
धुंदी आठवांची
मनास माझिया मी
समजवावे किती?

ठेहराव मनाचा
हरपत चालला
निष्फळ उसासे
टाकावे किती?

माझी लाडकी ओम्नी!

Submitted by पराग र. लोणकर on 14 April, 2020 - 08:39

(साधारण चौदाएक वर्षांपूर्वी (२००५-०६च्या सुमारास) लिहिलेला हा लेख आहे.)

`आपल्याला मुलगी असती, तर तिच्या लग्नप्रसंगी तिला निरोप देताना, ती सासरी गेल्यावर तुमचं काय झालं असतं?` माझ्या पत्नीचं मला हे असं डिवचणं हल्ली सतत चालूच असतं.

हे असं चालू झालंय साधारण वर्षांपूर्वीपासून!

मी माझी मारुती Van विकल्यापासून...

मी माझी लाडकी मारुती व्हॅन विकल्यापासून...

शब्दखुणा: 

प्रिय बाबा!

Submitted by पराग र. लोणकर on 6 April, 2020 - 00:31

माझे परम दैवत
हरवून बसलोय मी
पाठीशी उभी आधाराची भिंत
ढासळलेली पहातोय मी

माैज-मजेचे दिवस
आता सारे संपलेत
सारे बाल्य माझे
गमावून बसलोय मी

तुमचे ते हास्य
तुमचे ते बोलणे
हवेहवेसे ते सारे
आज शोधत बसलोय मी

आदर्श वडील कसे असावे
याचे मूर्तिमंत रुप तुम्ही
तुमच्या त्या वात्सल्यासाठी
अक्षरश: वेडावलोय मी

तुमच्याशी प्रेमभरा संवाद
क्वचित झालेला वाद
तरीही तुमच्या जवळ बसून
होणारी ती चर्चा आठवतोय मी

शब्दखुणा: 

आठवण (सरूची गोष्ट )

Submitted by _तृप्ती_ on 25 October, 2019 - 07:06

"आई, आई. अगं कुठे आहेस तू? अगं पटकन ये ना बाहेर." सरू शनिवारची सकाळची शाळा संपवून आली तीच मुळी आई, आई करत. अंगणात पायावर पाणी घेताना पण तिला दम निघत नव्हता. एका मागून एक नुसता हाकांचा सपाटा सुरू होता. धावत धावत ओसरीवर आली. तोपर्यन्त आजीचं आली होती ओसरीवर. "अगं, किती वेळा तुला सांगितलं, असं अंगणातून ओरडत येऊ नये ग." " पण, आई कुठे आहे?", "छान. विसरलीस नं. अगं आज सकाळीच जाणार होती नं ती भास्करमामाकडे. तू शाळेत गेलीस की मग ती तुझ्या नंतर गेली. सांगितलं होतं की तुला. नानांची तब्येत बरी नाहीये ना. म्हणून भेटायला गेली आहे. येईल उद्या." सरू विसरूनच गेली होती हे. काय हे?

शब्दखुणा: 

या शेकोटिसवे तुझी आठवण ही जळते आहे..

Submitted by Happyanand on 29 September, 2019 - 23:12

ही रात्र मिठीतुन माझ्या
हळुहळु निसटते आहे.
शुभ्र शुभ्र धूक्यांची
मैफील सजते आहे..
या शेकोटिसवे तुझी आठवण ही जळते आहे.......!
पहाट ही हळवी मजसवे
अश्रु ढाळते आहे.
हे अश्रु सारे डोळ्यातुन
ओघळून गेले.
हिरव्यागार पानांवर
दवबिंदू जमा झाले.
बकुळा नि प्राजक्ताच्या गंधासवे
ही पहाट दर्वळते आहे..
या शेकोटिसवे तुझी आठवण ही जळते आहे.......!
मन पुन्हा नव्याने
प्रेमात पडते आहे.
तुजला सोडुन जग हे सारे
सुंदर सुंदर भासते आहे.
हळवी ही पहाट जरी
निरागस मजसवे बोलते आहे.

शब्दखुणा: 

तुझी आठवण

Submitted by दूरदेशीचा मित्र on 16 September, 2019 - 23:53

मनाच्या फांदीवर आलं तुझ्या विचारांचं पान
माझ्या नकळत त्याचं झालं घनदाट रान 

कसं थांबवू तुझ्या आठवणींचं हे वारं
एक छोटीशी झुळूक तरी सैरावैरा सारं

झालं सुरु हे वादळ, आता ह्याला नाही थारा 
डोळा पावसाची साद, हा नेहेमीचा इशारा

काही खोल जखमा वरच्या वर जगायच्या
काही तरल वेदना पुन्हा पुन्हा भोगायच्या

कधीतरी हा चंद्र जाईलच ढगांच्या मागे
सुटतीलच कधीतरी हे गुंतलेले धागे 

कधीतरी ओसरेल हा मोगऱ्याचा वास 
तेंव्हातरी घेता येईल मला मोकळा श्वास 

तोपर्यंत मला ह्या चंद्रप्रकाशात भिजू दे
तोपर्यंत मला ह्या फुलांजवळ निजू दे

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - आठवण