आठवण

प्राजक्त तुझ्या आठवांचा

Submitted by Meghvalli on 21 March, 2024 - 05:01

प्राजक्त तुझ्या आठवांचा ओघळला मनात।
मंद मंद सुगंध त्याचा दरवळतो मनात ।।
अवचित ह्या सांजवेळी झाली तुझी आठवण ।
त्या सांज छटा पाहुन गहीवरले माझं मन।।
ओंजळीत घेऊन त्या स्मृतिफूलांचा मी सुगंध घेतो।
गोंजारून त्या नाजूक आठवणी हृदयांत जपतो।।
असाच अचानक कोसळला पाऊस नी भिजलिस तू पार चिंब।
डोळ्यांत आजुन साठून आहेत ते केसातुन मोत्यांचे ओघळते थेंब।।
तुझ्या गजऱ्याचा सुगंध अजून माझ्या श्वासांत भरला आहे।
निश्वास अजुनी त्या क्षणा नंतर मी कुठे सोडला आहे।।
खळ्खळ्णाऱ्या हास्याची नी निरागस डोळ्यांची तुझ्या अजून भूल आहे।

आठवणी

Submitted by Meghvalli on 21 March, 2024 - 04:29

तुझ्या प्रिती च्या बकुळ फुलांनी गुंफलेल्या आठवणी ।
त्या जिवलग हळुवार क्षणांनी विणलेल्या आठवणी ।।

हिंदोळ्यावर तु उंच झुलावे, माझे मन ही हिंदोळा व्हावे।
आकाशी तू अलगत झेपतांना टिपलेल्या आठवणी।।

जणू हिरवी पैठणी जेव्हा रानांत मोर नाचे श्रावणी।
ती पैठणी तू नेसतांना हृदयांत साठल्या आठवणी।।

तू यमन आळवावा मी सुरांत तुझ्या सूर मिसळावा।
मावळतीच्या यमन रंगांत मिसळलेल्या आठवणी।।

रात्र सारी जागून सरली पहा उगवला शुक्र तारा ।
मादक स्पर्शांनी तुझ्या गंधाळलेल्या आठवणी।।

अत्तर

Submitted by mi manasi on 1 June, 2023 - 12:40

सांज थांबता दारात
तुझे आठवती बोल
शब्द शब्द सुगंधित
काय अत्तराचे मोल?

दरवळे दरवळ
माझी लवते पापणी
हुरहुर अनिवार
झुरे शुक्राची चांदणी

सांज ढळता ढळता
रात्र उलगडे अशी
होते कावरी बावरी
प्रीत जागते उशाशी

घेते मिटून पापणी
तुझी लागते चाहूल
जरा जडावता डोळे
पांघरते प्रीतभूल

तुझ्या भेटीचे अत्तर
रोज परिमळे इथे
नको विचारुस कधी
"माझी आठवण येते??"

मी मानसी

शब्दखुणा: 

आठवण

Submitted by निखिल मोडक on 10 May, 2023 - 09:59

आली का ही बया
अशीच येते ही अगदी
नेमक्या वेळेस न सांगता
अगदी दारात उभीच राहते
बरं दारातून घालवून द्यायची आपल्यात रीत नाही
निदान या बसा पाणी घ्या तरी म्हणावं लागतं
हिला ते ही म्हणायची सोय नाही
आली की कितीवेळ बसेल सांगता येत नाही
घटका दोन घटका दिवस दोन दिवस
बरे शांत बसेल तर खरी
नुसती आपली भुणभुण भुणभुण
आपण आपले कामात असावे
तरी हिचे आपले चालूच
बरे अगदीच काही वाईट वागत नाही
रिकाम्या हाताने तर कधीच येत नाही
कधी काहीतरी गोड घेऊन येईल
कधी आंबट कैरीची फोड घेऊन येईल

शब्दखुणा: 

आठवण

Submitted by mi manasi on 17 April, 2023 - 20:22

तुझी आठवण
घाली रुजवण
शिंपीत रेशीमवाटा..
क्षणात कहर
क्षणात लहर
नाजूक गुलाबी काटा !!

तुझी आठवण
केवड्याचं बन
ओढाळ पाऊलवाट..
क्षणात विसावा
क्षणात दुरावा
सुगंधाची वहिवाट !!

तुझी आठवण
पाऊस मृगाचा
मनाला लागली आस
क्षणात हवासा
क्षणात नकोसा
सुखाचा बेगडी भास !!

मी मानसी

शब्दखुणा: 

ओस का मोती

Submitted by देवू१५ on 6 August, 2022 - 16:26

अरे तुझी पहीली भजी अजून संपली नाही? आईने गरमागरम कांदाभजीचा दुसरा घाना काढून माझ्या प्लेट मध्ये टाकताना प्रश्न केला. मी प्लेट फ्रिजवर ठेवून कांदाभजीचा एकच तुकडा खाऊन भजांमध्ये बोट फिरवत होतो. अरे कसला विचार करतोय ? तब्येत ठीक आहे ना? आईने विचारले. अगं आई अमिषा सोडून गेली. आई एकदम गोंधळून गेली.
हातातील झारा ताटात ठेवला आणि गॅस बंद केला. काय झालं नेमके तुमच्यात सोडून जाण्यासारखे?

विषय: 
शब्दखुणा: 

आठवण

Submitted by रमेश पुष्पा on 25 July, 2021 - 11:36

कुटुंबावर आणि घरावर येतात मोठी विघ्ने व संकटे,
त्यावेळी आठवण येते देवाची.

कामानिमित्त घराबाहेर भरभर जाताना ठेच लागून रक्त वाहते,
त्यावेळी आठवण येते आईची.

तुटपुंजा पगार, फी भरणे , हप्ता भरणे , घरात पैशाची जरुरी वाढणे,
त्यावेळी आठवण येते वडिलांची.

शाळेच्या आवारात मुले एकत्र येऊन आपल्याला मारहाण करतात,
त्यावेळी आठवण येते मोठ्या भावाची.

रक्षाबंधनच्या दिवशी दुसऱ्या मुलांच्या मनगटावर राखी बघितल्यानंतर,
त्यावेळी आठवण येते बहिणीची.

शब्दखुणा: 

आठवण

Submitted by omkar_keskar on 29 April, 2021 - 06:17

मनास हे पक्के माहीत असते
पण पुन्हा बिचारे तसेच फसते....
उपयोग याचा होणार नाही
हे मनाला जरी कळते का पुन्हा
तिच्या प्रोफाइल वर बोट मात्र वळते.
नात्याचा धागा तुटून गेला जरी,
अधून मधून मनात आठवण जागी होते...
मन काही विसरायला तयार नाही तरी....
अधून मधून सारखी प्रोफाइल स्टॉक होते
कुणीतरी मनाला यातून बाहेर काढायला हवं
आठवण्याच्या ही आधी तिला विसरायला हवं...

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - आठवण