आठवण
काल एक कळी उमलताना पाहिले
तुझ्या गोड हसण्याचे गुपित मला उमजले
पाऊसाच्या रिमझिम खेळात
अजुनही ऐकु येतं मला तुझाच आवाज
ऊफाळणार्या सागराच्या लाटा झेलत असताना
तुझ्याच आलिंगनाचा होतो भास
नभात पुनवेचा चंद्र पाहताना
तुलाच पाहिल्याचा होतो भास.
- संजीव बुलबुले / १४ जानेवारी २०१२
सोनकळ्या दोन
पेटीत ठेवल्या दडवूनी
कधीतरी ऊघडून
तूझ्या आठवणींचा श्वस घेतो
मखमलीचे रूमालाची घडी
ऊशाशी ठेवली जपून
कधीतरी कूरवाळून
तूझ्याा बोटांचा स्पर्श घेतो
आठवणीतील रात्र
ठेवली आहें जपून
कघीतरी ऊघडून
तूझ्या सहवासाचे चंादणे पीतो
पुन्हा, पुन्हा ही तुझी आठवण
अपरिहार्य ही तुझी आठवण
आताशा मी जगतो ज्यावर
श्वास म्हणू, की तुझी आठवण ...?
---------------------
हट्टी असते तुझी आठवण
कधी शहाणी तुझी आठवण
डोळ्यामध्ये कधी थबकते
कधी बरसते तुझी आठवण ...!
-----------------------
सलते काटे तुझी आठवण
मोरपिसांची तुझी आठवण
तु केलेल्या जखमांवरती
हळवी फुंकर तुझी आठवण ...!
----------------------
"अरेऽ मधुऽऽ, उऽठ. ८ वाजलेत. आजपासुन ऑफिस आहे नाऽऽ?"
"काय हे ! लग्नाच्या ८ व्या दिवशी सक्काळ सकाळी ८ वाजता कोणी उठतं का? ते ही ऑफिसला जाण्यासाठी ?" इति अस्मादीक.
"ए कोट्या काय करतोयस? आई येतील इतक्यात ओरडत. उऽऽठ ना रे. बघ, नाष्टा सुद्धा तयार आहे आणि आजपासुन तुझा डब्बा मी करणारे..."
"ओऽह शिट्ट !"
"ओऽऽ.... ठिक आहे मग. उद्यापासुन तुझ्या आईच्याच हातचा डबा घेउन जा. मी नाही बनवणार.." असं फणकारुन ती रागाने पाय आपटत वळून बाहेर जाणार इतक्यात मी तिचा हात धरुन मागे ओढले.
"एऽ लाडाबाई, रागावलीस..?"
तुझ्या फोटोंसारखीच
तुझी सगळी पत्र केव्हाच
फाडून, तुकडे करुन
फेकून दिली
तू माझ्यासाठी घेतलेल्या
पर्फ्युमची पावती मात्र
जीवापाड जपली आहे
त्या पावतीवर
इतरांना दिसते
ती किंमत, दुकानाचं नाव
इतकंच काय
खरेदीची वेळही नोंदवलेली
तुझी सगळी पत्रं
केव्हाच
इतिहासात जमा झाली आहेत
पण मी आजही
ती पावती 'वाचतो'
तुझ्या पत्रांसारखी
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ना मी करतो प्रेम कुनावर.
ना मी झुरतो खास कुनावर
अश्रु नाहीत डोळ्यांमध्ये
कुसळच सलते उगाच सर - सर
ना मी करतो.....
म्हणती मजला उदास का तू
म्हणती मजला भकास का तू
भकास आणि उदास चेहरा
असाच दिसतो पाहता वर - वर
ना मी करतो.....
हसता मी ;" तू उगाच हसतो"
बसता मी ;" का उदास बसतो ?"
खरे बोलता "खोटे" म्हणती
" सांग मला तुज कसली हुर - हुर "
ना मी करतो.....
तु न बोलता, मला समजले
मलाच कळले, मला उमगले.....
आठवल्या मग गोड आठवणी
मन झाले मग पाणी - पाणी
पाहुन हास्य त्या ओठावरचे
तुझ्याबरोबर मनही हसले
तु न बोलता.....
प्रिय सखेगं हसलीस जेंव्हा
बहरले मन तेव्हा - तेव्हा
प्रेम तुझ्या त्या नजरेमधले
तु न खुणवता मलाच दिसले
तु न बोलता.....
वाट पाहिली, आलीच नाहीस.
का गं ? माझी तु झालीच नाहीस.
काय प्रेम ते तुला न कळले
मला समजले मला उमजले.
तु न बोलता.....
---------------------जोतिराम
"एक प्रॉमिस करशील?"
"प्रॉमिस? आज काय हे अचानक?"
"सांग ना रे प्लीज.. करशील प्रॉमिस?"
"ह्मम्म्म.. तुला माहिती आहे ना, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो.."
"माहितीये रे राजा मला, आणि म्हणूनच आज मला प्रॉमिस हवंय तुझ्याकडून.."
"अगं पण आधी सांगशील तरी नक्की काय ते.."
"आधी प्रॉमिस.."
"ओके बाबा.. प्रॉमिस.."
"ह्मम्म्म.. इथून पुढे तू कधीच माझी आठवण काढायची नाहीस.. "
"....."
"....."
"तुला कळतंय का काय मागतेयस तू? आठवण कोणी काढत नसतं, ती आपोआप येत असते आतून.."
"ह्मम्म्म.. म्हणून मग एकदा आली की परत कधीच येऊ द्यायची नाही दिवसभरात.. "
"...."
"आणि कायम लक्षात ठेव, तू प्रॉमिस केलं आहेस.. "
आठवण झरा आनंदाचा
दु:खी मनास आधार
बंद नयनी पहाता
घाली जखमेवर फुंकर
आठवण ठेवा अमुल्य
देता उजाळा लख्ख
नाही कुणाची संपत्ती
राहीला माझाच हक्क
आठवण सडा प्राजक्ताचा
दरवळतो अंतरी गंध
अलगद गुंफते माला
जडला मलाच छंद
आठवण प्रवाही सरीता
आणते लोचनी ओल
आनंदाचे असता अश्रु
त्याला मोत्याचे मोल
''बगड बबं बबं बम लहरी ऽऽ'' कैलाश खेरचा मनमोकळा स्वर कँटीनच्या म्युझिक सिस्टीममधून मदमस्त घुमत होता. चहाच्या पेल्यांच्या तळव्यांनी चिकट झालेल्या टेबलावर ठेवलेल्या काचेच्या पेल्यातील चहामृत प्राशन करत सर्व मित्रमंडळी एकेक लंब्या चवड्या बाता मारण्यात गर्क होती.