सरू

आठवण (सरूची गोष्ट )

Submitted by _तृप्ती_ on 25 October, 2019 - 07:06

"आई, आई. अगं कुठे आहेस तू? अगं पटकन ये ना बाहेर." सरू शनिवारची सकाळची शाळा संपवून आली तीच मुळी आई, आई करत. अंगणात पायावर पाणी घेताना पण तिला दम निघत नव्हता. एका मागून एक नुसता हाकांचा सपाटा सुरू होता. धावत धावत ओसरीवर आली. तोपर्यन्त आजीचं आली होती ओसरीवर. "अगं, किती वेळा तुला सांगितलं, असं अंगणातून ओरडत येऊ नये ग." " पण, आई कुठे आहे?", "छान. विसरलीस नं. अगं आज सकाळीच जाणार होती नं ती भास्करमामाकडे. तू शाळेत गेलीस की मग ती तुझ्या नंतर गेली. सांगितलं होतं की तुला. नानांची तब्येत बरी नाहीये ना. म्हणून भेटायला गेली आहे. येईल उद्या." सरू विसरूनच गेली होती हे. काय हे?

शब्दखुणा: 

पालवी

Submitted by _तृप्ती_ on 16 July, 2019 - 01:57

सरूला आज सगळया जगाचा राग आला होता. तिला कोणाशीच काहीच म्हणजे अगदी काहीच बोलायचं नव्हतं. मग तिने वरच्या माडीतली खिडकी पकडली आणि बाहेर बघत बसून राहिली. तिला आज त्या आभाळात पण काही छान दिसत नव्हतं. शी! काय हे. आज इथे पण काही मजाच नाहीये. रोज कसे तिला ढगांमधे प्राणी दिसायचे, कधी कधी तर भूत पण दिसायचं. आजी म्हणते देवाचं घर आभाळात असतं पण तो काही तिला दिसायचा नाही कधी. आजी इतकी छान गोष्ट सांगते नं रामाची. तिला आठवून पण खुद्कन हसू आलं. आणि मग तिला एकदम रागच आला स्वतःचा. सगळ्यात जास्त राग तर तिला आजीचाच आला होता. कशी वागते आजकाल. गेले काही महिने झाले. सारखी काहीतरी सूचना करत असते.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सरू