प्रिय बाबा!

Submitted by पराग र. लोणकर on 6 April, 2020 - 00:31

माझे परम दैवत
हरवून बसलोय मी
पाठीशी उभी आधाराची भिंत
ढासळलेली पहातोय मी

माैज-मजेचे दिवस
आता सारे संपलेत
सारे बाल्य माझे
गमावून बसलोय मी

तुमचे ते हास्य
तुमचे ते बोलणे
हवेहवेसे ते सारे
आज शोधत बसलोय मी

आदर्श वडील कसे असावे
याचे मूर्तिमंत रुप तुम्ही
तुमच्या त्या वात्सल्यासाठी
अक्षरश: वेडावलोय मी

तुमच्याशी प्रेमभरा संवाद
क्वचित झालेला वाद
तरीही तुमच्या जवळ बसून
होणारी ती चर्चा आठवतोय मी

क्षणोक्षणी आठवण तुमची
बेचैन करते सदाची
जाणुनही अपरिहार्यता मृत्युची
स्वत:ला असहाय्य मानतो मी

सेवा तुमची करण्यात
कमी जर पडलो असेन मी
मृत्युपश्चात ती करण्यास
मृत्युप्रार्थना करतो मी...

***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users