अधांतर.. एक प्रेमकथा

Submitted by कृष्णे on 6 January, 2021 - 23:53

*#@अधांतर. एक प्रेमकथा@#*
लेखिका
सौ.वनिता सतीश भोगील
नवी मुंबई

सुधाकर रोजच्याप्रमाणे लवकर आवरुन निघाला,तेवढ्यात आईने हाक मारली,अरे ऐकलस का?राणे काकांचा फोन आलेला काल. हो का.. मग काय म्हणाले काका? तब्येत बरी आहे न त्यांची. खुप वर्ष झाली न त्यांची भेट झालेली. हो रे अरे पन फोन यासाठी केलेला की त्यांची रमा आठवते का तुला आपल्या सुमा सोबत अभ्यासाला यायची आपल्या घरी. हो ग..आई तिला कसा विसरेन खूपच गोड होती आणि हो माझ्याशी बोलताना नेहमी लाजायची. आई आपण गाव सोडून बाबांच्या नोकरी साठी नागपूरला आलो आणि इकडचेच झालो.. पण गावाकडची मजाच वेगळी...
हो पण काय करणार? सुधाकर..
आई मी कॉलेज ला होतो तेव्हा राणे काका नेहमी म्हणायचे मला जावई म्हणून देऊन टाका याला, अण या त्यांच्या मस्करीला रमा खर समजून लाजायची.
अरे हो ! तीच काय?
अरे तीच लग्न ठरलय.अग चांगलीच बातमी आहे की,कधी आहे लग्न?
येत्या चौदा तारखेला, आपल्या सगळ्यांना अगदी आग्रहाच आमंत्रण दिलय. अग आई मला कस जमेल मला ऑफिस च्या कामासाठी बारा तारखेला च मुंबई ला जायच आहे ,तु आणि बाबा या जाऊन मी तुमची जाण्याची सगळी व्यवस्था करतो.बर चल मी निघतो. बाबा येतो .
सुधाकरला ऑफिस ला पोहचायला थोडा उशीरच झाला.त्याच्या केबिनमधे जातो तोवर च महादु(शिपाई) आला. साहेब तुम्हाला मोठ्या सायबानी बोलावलय..
बर आलोच. म्हणून सुधाकर बॉस च्या केबिनमधे गेला, मी आय कमींग सर! यस कमींग, सॉरी सर आज थोडा लेट झालो. इट्स ओके अरे तुला मुंबई ला जायच आहे, आहे न लक्षात,अफकोर्स सर बारा तारखेला निघनार आहे .गुड... पण सुधाकर तुला बहुतेक प्रोजेक्ट कंप्लीट होईपर्यंत तिकडेच राहावे लागेल. मग तुला कंपनी कडून राहायची व्यवस्था हवी की पर्सनल करशील? नाही सर माझ्या ओळखीचे आहेत मी करेन सोय. ओके मग लागा कामाला, बेस्ट ऑफ लक.थैंक्यू..
संध्याकाळी नेहमीप्रमाणे बाबांची औषध घेतली आईला कॉल केला... हेलो आई काही आनायच का विचारले आईनी काही नाही आनायचे अस सांगून फोन ठेवला.दोन दिवस बाकी होते मुंबई ला निघायला,सुधाकरचा मामेभाऊ मुंबई मधेच राहायला होता. सुधाकरच्या अचानक लक्षात आले, तो करेल आपल्या राहण्याची व्यवस्था.मोबाइल मधे त्याचा नंबर शोधून त्याला कॉल केला... हेलो ... राजेश का? मी सुधाकर बोलताय. अरे सुधाकर.. बोलबोल कशी आठवण काढलीस. काय म्हणतोय बरे आहेत न सगळे. अरे हो हो.. मला तर बोलू देशील? मी मुंबई ला येतोय..ऑफिस च्या कामासाठी माझी काही दिवस राहण्याची व्यवस्था होईल का कुठे?
सुध्या कुठे म्हणून काय विचारतो आपल घर आहे न मग दुसरीकडे कशाला सोय हवी?अरे तस नाही ऑफिस च काम किती दिवस चालेल माहित नाही उगीच तुला त्रास नको. राजेश .. बर आहेत ओळखीचे बाबांच्या त्यांचा फ्लेट सध्या खालीच असतो ते गावीच राहतात विचारुन कळवतो सकाळी. बर चल बाय.... भेटु आल्यावर म्हणून फोन ठेवला.
आईबाबांच्या जाण्याची पण सोय केली, ट्रेवल्स ची तिकीट बुकिंग करून ठेवली.सकाळी राजेश चा कॉल आला राहण्याची सगळी व्यवस्था होईल म्हणून,चला राहण्याची सोय झाली म्हणजे मोठा प्रश्न सुटला.बारा तारखेला सकाळीच आटोपुन सुधाकर पहिल्या ट्रेन ने मुंबई ला निघाला. जवळपास आल्यावर राजेशला कॉल केला. राजेश मी थोड्यावेळात पोहचेल तू स्टेशन लाच भेट तिथून आपण सरळ मला राहायची सोय केली आहेस तिथेच जाऊ.
सुधाकर पोहचायच्या अगोदर राजेश त्याची वाट बघत उभाच होता. भेटल्यावर राजेशने टॅक्सी बोलवली दोघे टॅक्सीने रूम वर गेले.
राजेश चावी घेऊन आलेला, दोघानी सोसायतीत एंट्री केली तस सुधाकर म्हणाला सोसायटी तर खूपच छान आहे. तिसऱ्या मजल्यावर पोहचली, राजेशने दरवाजा उघडला, दोघे आत गेले. सुधाकर म्हणाला घर अगदीच छान आहे सध्या कोणी राहत नाही अस वाटत नाही.
बोलत बोलत ब्यागा बेडरूम मधे ठेवल्या आणि फ्रेश होऊन बाहेर आला,तस राजेश म्हणाला चल मी जातो तुला काही लागले तर सरळ मला कॉल करायचा... ओके बाबा थैंक्यू तुझ्यामुळे छान सोय झाली माझी. बाय म्हणून राजेश निघाला.
प्रवास करून थकल्यामुळे सुधाकर बेड वर पडला,कधी डोळा लागला समजलच नाही.
जाग आली तेव्हा खिडकीतून बाहेर लक्ष गेल अंधार दिसला घड्याळ पाहिले तर सात वाजुन गेलेल्या.
उठून लाइट चालू केली, फ्रेश होऊन खाली निघाला जवळपास जेवनासाठी मेस ची सोय आहे का पहाव म्हणून..
जवळ नाही कुठेच दिसली.मग हॉटेल मधेच जेवायच ठरवले, जेवणाची ऑर्डर देऊन घरी आईला कॉल केला.. व्यवस्थित पोहचलो वगैरे अस बोलून झाल, तुम्ही उदया सकाळीच निघा जरा लवकर,म्हणजे गाडीच्या वेळेत पोहचाल.. पोहचल्यावर मला कॉल करायला विसरु नका बाबा न पण सांग.
औषध सगळी सोबत घ्या. थंडी आहे गरम कपड़े घेऊन जा गावी खुप थंडी असते.काळजी घ्या, आई पण तिकडून तेच सांगत होती. बोलून झाल तोपर्यंत जेवण आल, जेवण करून परत रूम वर आला. उद्याच्या प्रोजेक्ट मीटिंग च प्रिपरेशन लेपटॉप वर करून सुधाकर झोपला.
सकाळी रोजच्या रूटीन प्रमाणे आवरा आवर करून ऑफिस ला निघाला जाताना कुठेतरी नास्ता करु म्हणून,
खाली जाताना दुसऱ्या मजल्यावर पन्नाशिच्या वयाच्या काकू भेटल्या, ओळख नव्हतिच त्यामुळे फक्त स्माइल दिली तस काकू म्हणाल्या नवीन दिसतोस कुणाकडे पाहुणा म्हणून आलास का?
नाही काकू मी वरच्या मजल्यावर राहायला आलो आहे. थोड़े दिवसासाठी ऑफिस च काम संपल की जाणार नागपुरला.
एकटाच आहेस?
हो एकटाच आई बाबा नागपुरला चला बोलू नंतर म्हणून सुधाकर निघाला,काही लागल तर सांग म्हणून काकुनी पन दार बंद केल.
ऑफिस ला जाऊन नवीन ओळखी करून घेतल्या, काम संपल तस येताना च मेस शोधली पत्ता आणि एडवांस देऊन रूमवर आला,मुंबईच्या ऑफिस चा पहिला दिवस छान गेला अस स्वतः शी च बोलत सुधाकर फ्रेश झाला.
जेवन आल मेस मधून तस गरम गरम जेऊन घ्यावे म्हणून जेवायला बसला, तेवढ्यात बाबांचा कॉल आला...
आम्ही गावी पोहचलोत काळजी करु नकोस,सगळ व्यवस्थित आहे, तू स्वतची काळजी घे अस म्हणून बाबानी कॉल ठेऊन पण दिला. बहुतेक पाहुणे असतील खुप दिवसांनी भेटली सगळी मंडळी म्हणून कॉल वर जास्त बोले नाहीत बाबा.जेवण आटोपुन तासभरासाठी प्रोजेक्ट च काम करत होता जेम तेम दहा वाजत आले असतील, आणि.... परत बाबांचा कॉल आला, बघून सुधाकर घाबरला परत का कॉल आला असेल, विचारातच फ़ोन रिसीव केला. हेलो.... बाबा काय झाल अस एवढ्या उशिरा फ़ोन सर्व ठीक आहे न?
बाबा.. काही ठीक नाही रे सगळ गेल. अहो बाबा काय झाल नीट सांगाल का? आई ठीक आहे न?
हो आम्ही ठीकच आहोत पण इकडचे काहीच ठीक नाही.का काय झाल अरे आपली रमा........
बाबा काय झाल रमा ला?
अरे हळद समारंभ पार पडला अन ती तिच्या खोलीत गेली, आणि दहा मिनिट झाली असतील तोवर तिच्या रूमला आग लागली.... ती एकटी होती रूम मधे,
रमा कशी आहे बाबा आता?
हॉस्पिटल ला नेल आहे नव्वद टक्के भाजली आहे अस डॉक्टर म्हणालेत वाचन्याची शक्यता कमी आहे.
हे काय होऊन बसल बाबा, बाकी सगळे ठीक आहेत न?
बाकी ठीक आहेत सगळे.
मी निघू का गावाकडे?
नको तू येऊन काय करशील, आम्ही आहोत सगळे.
काळजी घ्या बाबा, मला कळवा तस काही असेल तरी.
हो कळवतो चल ठेवतो फ़ोन कट झाला,
सुधाकर शांतच बसला, त्याला अगोदरची रमा समोर दिसायला लागली, त्याच्यापेक्षा तीन चार वर्षाने लहान होती, रमा आणि सुधाकरची बहिन सुमा सोबतच शाळेत होत्या. तेव्हा खुप सुंदर दिसायची पण मि पहिलेली खुप वर्ष झाली आता तर खूपच सुंदर दिसत असेल, का घडल अस तिच्या सोबत, देवा लवकर बरी कर तिला, म्हणून सुधाकरन हात जोडून देवास नमस्कार केला.प्रोजेक्ट बघण्यावर लक्ष लागेना रमा, राणे काका ,काकू समोर दिसत होते. लॅपटॉप बाजूला ठेऊन तसाच विचार करत बेड वर पडून राहिला, पहाटचे चार वाजले असतील, पुन्हा फोन वाजला.. बाबांचाच होता. हेलो बोला बाबा ..
अरे सुधाकर रमा गेली रे सगळ्यांना सोडून..
पुढे काय बोलावे काहीच सुचेना. हेलो एकतोयस ना.. हो बाबा पण कस सगळ अचानक..
देवापुढे कुणाच काही चालत नाही बघ.. बर आम्ही आता दशक्रिया होईपर्यंत गावीच थांबतो तू पण काळजी घे...
हो बाबा. फोन कट केला. अस कस झाल सगळ या विचारात पुन्हा झोप येईना. सहा वाजेपर्यंत तसाच बेडवर पडून राहिला. नंतर उठून आवरुन ऑफिस ला जायची तयारी केली. घराला कुलुप लावुन निघाला, तेव्हढ़यात पायऱ्या वरुण विस,बावीस वर्षाची तरुणी येताना दिसली. सुधाकरला पाहुन छान स्माइल दिल, ओळख नसताना ही कस स्माइल या विचारात असताना ती म्हणाली हाय ! सुधाकर पन.. हेलो. मी तुमच्या वरच्या म्हणजे चवथ्या मजल्यावर राहते म्हणजे अजुन सामान शिफ्ट व्हायच बाकी आहे, तुम्ही एकटेच आहात.
सुधाकर.. हो सगळे गावी आहेत. आणि तुम्ही मी पण एकटीच आहे.
माझेपन घरचे सगळे गावी आहेत..
बर चला तुम्हाला उशीर होत असेल न भेटु पुन्हा.. जवळच तर आहोत. अस म्हणून ती तरुणी भरभर पायऱ्या वरुण वर गेली.
नवीन आहे मी,तरी पण ही खुप जूनी ओळख असल्यासारखी कस बोलत होती, अरे एवढं बोली पण तीच नाव ही विचारल नाही मी.
जाउदे भेटेलच न मग वीचारु. या विचारातच टॅक्सीने कधी ऑफिस ला पोहचला हे समजलच नाही.
ऑफिस मधे गेल्यावर रमा चा विचार परत मनात चालू झाला, काका काकू ना एकटी च रमा होती तीच पण अस झाल, काय होऊन बसल सगळ.
या विचारातच काम चालू होत, पाच वाजताची मीटिंग संपवुन घरी निघाला.
वर जाऊन दरवाजा उघडनार तोवर सकाळची तरुणी पायऱ्यावर दिसली, आता सुधाकर स्वतःहुन हाय... म्हणाला तस तीने ही लगेच रिप्लाय दिला, तुमच सकाळी नाव विचारलच नाही मी.
मी सीमा हाय म्हणून तीन हात पुढे केला, तस मी सुधाकर म्हणून त्यानेपण हात मिळवला,
बोलतच त्याने दार उघडले, तेवढ्यात
सीमा म्हणाली चहा घेणार का तुम्ही मी छान चहा बनवते..
अहो नको मी घेईल खाली जाऊन,
अहो त्यात काय एवढे आणते मी चहा.. की घरीच येताय माझ्या चहा ला.. मला आवडेल तुम्ही माझ्या घरी चहा ला आलात तर...
अहो पन कशाला उगीच तुम्हाला त्रास.
त्यात कसला त्रास, मि चहा ठेवते तुम्ही फ्रेश होऊन या . अस म्हणून सीमा घरी गेली.
सुधाकर विचारात पडला एकटी तरुणी आपण तिच्याकड चहा ला गेलेल कस वाटेल, त्यात आजच ओळख झाली आमची.
फ्रेश होऊन बाहेर येऊन विचारातच होता जाव की नको?
तेवढ्यात सीमा ने पायऱ्या वरुण आवाज दिला अहो सुधाकर चहा झाला येताय न तुम्ही.....
हो हो आलोच, म्हणून सुधाकर वरच्या मजल्यावर गेला, तस चवथ्यl मजल्यावरच्या बाकीच्या रूम बंद च होत्या.
सुधाकर रूम मधे गेला. तसा रूम छान च होता, सुधाकरने विचारले कुणाचा आहे रूम?
सीमा म्हणाली आमचाच आहे, खुप वर्ष झाली बाबा नी घेऊन ठेवला होता. पन बाबांची ची कंपनी बंद पडली तस आम्ही सगळे गावी गेलोत, इकडे कुणी लक्षच दिल नाही. म्हणून म्हटल आपण तरी बघाव.
बोलत बोलत चहा बिस्किट घेऊन सुधाकर समोर ठेवले,तिनेही कप उचलून घेतला. सुधाकर विषयी तीने काहीच न विचारल्यामुळे त्याला आश्चर्य वाटत होत.
सुधाकर म्हणाला.. जॉब ला जाता का?
नाही.. मला नाही आवडत घराबाहेर पडायला, बाहेर पडल्यावर घाबरल्या सारखे होते मला.
मग दिवसभर काय करणार की लगेच गावी जाणार तुम्ही?
नाही गावी तर आताच नाही जाणार. तुम्ही किती दिवस आहात इथे?
आय डोन्ट नो! प्रोजेक्ट कम्प्लीट होईपर्यंत तरी आहेच.
सीमा म्हणाली चांगलच आहे न मग मलाही सोबत होईल, म्हणजे मी पण नवीनच आहे तुमची ओळख झाली म्हणून बर झाल.
बर मी काय म्हणते तुम्ही जेवण बाहेरुन मागवता का?
सुधाकर. हो मेस लावली कालच.
उदया पासून तुमच जेवण मी। बनवेन मला ही एकटीसाठी रोज काय बनवू म्हणून टेंशन आहेच, दोघांच बनवल तर काहीतरी सुचेल तुमच्या माझ्या आवड़ीनुसार बनवायला.
सुधाकर नको हो काय हे चहा, जेवण उगीच तुम्ही का त्रास घेता मला येत मेस मधल जेवण.
सीमा म्हणाली अहो त्रास नाही आणि हो फुकट तर अजिबात नाही, कारण मला बाहेर निघायला आवडत नाही म्हणून बाहेरच्या सामान वस्तु तुम्ही आनायच्या जेवण मि बनवेल आणि हो इथेच जेवण करत जाऊ मग तुम्ही तुमच्या रूमवर जात जा.
एवढ हक्काने सीमा बोलत होती त्यापुढे सुधाकरला नाही म्हणणे शक्यच नव्हते.
बर ठीक आहे पण आपण एकमेकांना अहो जाओ बोलायच नाही, एवढ हक्काने बोलतोय आपण खास मैत्री झाली ती पण एका च दिवसात त तू मला तू म्हणूनच बोलायच,काय?
हो मला ही हक्का ची मैत्री आवडते.
मी निघतो जेवण येईल, रात्रिपण झोप नाही आज जरा लवकर झोपेण म्हणतो.

रात्रि का झोप नाही? नवीन ठिकाण म्हणून.
नाही ते आमचे गावी वडिलांचे मित्र आहेत त्यांच्या मुलीच्या लग्नाला आईबाबा गेलेत, पन तिकडे एक अपघात झाला,
हळदी दिवशीच काकांची मुलगी म्हणजे नवरीचा मृत्यु झाला, खुप चांगले आहेत सगळेच, बिचारे काका एकटीच रमा होती त्याना काय अवस्था झाली असेल काका काकुंची देवच जाने.
सीमा हो का वाइट च झाल न. एवढ च बोली.
चल मी येतो भेटु उदया म्हणून सुधाकर निघाला,
तस ती पण म्हणाली बर गुड नाईट.
सुधाकर त्याच्या रूम मधे आला, बाबाना कॉल केला .. बाबा कसे आहेत सगळे?
बाबा... अरे कसे असतील राणे तर खचून गेलाय पूर्ण,
बाबा काळजी करु नका काकाना सांगा . वाटल्यास नागपुरला घेऊन या दोघाना येताना. काका ना देता का फोन मी बोलतो त्यांच्यासोबत.
बर देतो.....
हेलो काका...
राणे काका नुसतेच रडत होते.
अहो काका रडू नका जे व्हायच ते झाल कुणाच्या हातात नव्हत.पण तुम्ही त्रास करून घेऊ नका, मी आहे न तुमचा मुलगा..
काका मी येतो लवकरच ओके. म्हणून सुधाकरने फोन ठेवला तेवढ्यात दार वाजल, बहुतेक मेस वाला असेल. दार उघडून पाहिल तर सीमा दारात उभी होती.
काय ग काही हव आहे का?
नाही काही नाही सहजच आले होते, बर तू तुझ्या काकांच्या मुलीला पाहिलस का कधी?
हो पन बरीच वर्ष झाली तेव्हा ती लहान म्हणजे असेल आठवीत मी फर्स्ट ईयर ला लास्ट टाइम तेव्हाच भेटलो त्यानंतर बाबा आई जायचे गावी पन मला नाही जमल कधी जायला, कॉलेज झाल की जॉब लागला ,पन आता जावच लागणार, काका काकुंसाठी.
पण तू का विचारतेस ?
काही नाही सहजच.
अस म्हणून सीमा निघुन गेली.
सुधाकरला प्रश्न पडला मी एवढा अपघात सांगितला तर सीमा त्यावर काहीच बोली नाही, मग आता रमा ला मी पाहिल का है विचारायला का बर आली असेल?
जाउदे असेल तिच्या मनात काही.
पण सीमा छानच आहे, आजकालच्या मूली लवकर कुणाशी जुळवून घेत नाहीत, पन ही खूपच मनमिळावू आहे, देखनी पण आहे.
काय फालतू विचार करतोय मी पण....
चांगली मैत्री जमली दोघात अन मी काय विचार करतोय.
आता रोज सकाळी सीमा नास्ता, टिफिन सुधाकरला दयायची आणि ऑफिस वरुण येताना सुधाकर घरातील गरजेच्या वस्तु घेऊन यायचा.
सुधाकर ऑफिस ला जाताना सीमा बाल्कनीत उभी असायची आणि सुधाकर खाली गेला की तिला वर पाहुन हात हालवून बाय म्हणायचा.
खालच्या काकु त्यांच्या बाल्कनीत तुळशीला पाणी घालत असत, सुधाकरने वर बघून बाय केल की त्या पन वरती पाहुन म्हणायच्या... कोण नाही वर अन हा कुणाला हात दाखवतो देव जाणे.
अशातच महीना गेला, काका काकु नागपुरला थोडे दिवस राहून परत गावी गेले रोज आई बाबांशी बोलण व्हायच फोन वर,
प्रोजेक्ट कंप्लीट झाल तस नागपुर ऑफिस ला बॉस ला मेल करून सर्व माहिती दिली, दुसऱ्या दिवशी सकाळीच बॉस चा फोन आला.
बॉस.... अभिनंदन सुधाकर तुझ्या काल पाठवलेल्या प्रोजेक्ट च डील फाइनल झाल.
सुधाकर.. थैंक यू सर.
बॉस.. अरे अजून एक गुडन्यूज आहे तुझ्यासाठी
.. अजून काय सर?
अरे तुझ प्रमोशन झाल आणि आता ज्या मुंबई च्या ऑफिस मधेच तुझ ट्रांसफर पण झाल आहे.
तर तुला आता पुढेही तिकडेच राहून काम करायच आहे.
.....ओके सर थैंक्यू सर थैंक्यू व्हेरी मच...
गूडन्यूज़ घरी फोन करून सांगितली, आई बाबा पण खुश झाले.
आता ज्या घरात राहत होता तिकडेच राहण्याचा निर्णय त्याने घेतला. आता कायम स्वरूपी राहायचे म्हणजे फुकट नको, म्हणून त्याने राकेशला भेटून सांगितले, राकेशने पण अभिनदंन केले आणि जे तुला भाड दयायच असेल ते ठरवून दे अस म्हणाला.
सीमाला सांगावी का बातमी, असा विचार करत घरी निघाला.
दारात पोहचनार तेव्हढ़यात सीमा खाली आली,
चल तुझ्यासाठी खीर बनवली आहे मी...
कोणत्या खुशीत खीर?
अरे बातमी गोड असेल तर खायला पण गोड च हव न?
तुला कस माहित गोड बातमी आहे म्हणून?
अरे ते तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहे, बर चल खीर थंड होईल.
कधी कधी सीमा जे वागायची ते सुधाकर साठी अनपेक्षित असायच.
अस च दोघांच चालू होत आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले दोघानाही समजल नाही.
सीमा दिसयला खूपच सुंदर होती, तिच्या सुंदरतेत नावाप्रमाने काहीच सिमा नव्हती.
सहा सात महीने उलटून गेले, घरी कस सांगव आताच नको बघू नंतर असच सुधाकर विचार करत होता. एक दिवस बाबांचा फोन आला. तुझ्या लग्नासाठी आम्ही मुलगी पाहतोय, आपल्या नातलगातली आहे एक, तू पण बघून घे म्हणजे आम्हाला बोलनी साठी बर.
सुधाकरला काय बोलाव कळेना, सीमा बददल सांगव का बाबांना,समजून घेतील का ते?
अरे बोलशील का काही?
समोरून बाबांचा आवाज आला तस धाडस करून सुधाकर म्हणाला,
बाबा माझ एका मुलीवर प्रेम आहे, खुप सुंदर सुशील आहे, तुम्ही पण तिला पाहून पसंत कराल. सॉरी बाबा मी निर्णय तुम्हाला न सांगता घेतला.
अरे आम्हाला पण असच काही वाटत होत तुझ्याबद्दल, म्हणूनच लग्नाचा विषय काढला.
म्हणजे ओ बाबा?
म्हणजे हल्ली तुझ फोन करन खुप कमी झालय, तुझ्या आईला शंका आली कुठल्या मुलीच्या तर प्रेमात नाही पडला म्हणून आम्ही सहजच लग्नाचा विषय काढला आणी तुझ्या आईची शंका खरी ठरली.
बर कधी भेटवतोस? आमच्या होणाऱ्या सुनबाईला,
काय बाबा तुम्हीपण,
विचार करून सांगतो अस म्हणून लाजुन सुधाकरने फोन ठेवला.
तसाच उठून सीमा कडे गेला,
सीमा सीमा... गोड बातमी सांगायची तुला.
काय आहे गोड बातमी...
बाबानी तुला भेटायला घेऊन यायला सांगीतल आहे, आपल्या बद्दल मी त्याना सर्व सांगितले ते आपल्या लग्नाला तयार आहेत.
सीमा खुश होण्याऐवजी नाराज दिसत होती,
का ग तुला न्यूज़ ऐकून आनंद नाही का झाला?
तस नाही पण मी कधी लग्नाचा विचार केला नाही..
मग आता कर, तुझ माझ्यावर प्रेम आहे न..
अरे हे काय विचारण झाल का?
सात जन्म प्रेम करते तुझ्यावर मी..
बर बाई तू विचार करायला जेवढा वेळ हवाय तेवढा घे, मी बोलेन घरच्यांशी.
हं ठीक आहे.
आता दोघे अगदी मनमोकळी पणे राहत होते. अगदी एकमेकांसाठीच आहेत दोघे असच.
दोघांच्या ओळखिला आणी प्रेमाला एक वर्ष होत आली. सीमा कडून लग्नाचा काहीच विषय नसायचा.
सुधाकरला वाटे बहुतेक घरचे तयार नसतील तिच्या म्हणून तो ही कधी विचारुन तिला डिस्टर्ब करत नसे.
एक दिवस आईचा फोन आला,
हा बोल आई कशी आहेस?
मी बरी आहे. तू कसा आहेस आणि आमची होणारी सुन कशी आहे?
हो आई आम्ही दोघेपण चांगले आहोत.
मी काय म्हणते सुधाकर तू येत्या पौर्णिमेला इकडे येतोस का?
का ग काही खास आहे का?
आई... हो खास च आहे आपल्या रमाला जाऊन वर्ष होतय तीच प्रथम वर्षश्राद्ध आहे पौर्णिमेला तू कोणत्याच विधिला नव्हतास म्हणून आता तू आलास तर बर होईल, राणे भाऊजिना पण बर वाटेल, आणि येताना दोघेपण या तुमच्या लग्नाच पण फिक्स करून टाकू..
बर बर आई नक्की येतो तू नको काळजी करु काका पण मला बाबांन पेक्षा कमी नाहीत, आता त्याना बघण्याची जिम्मेदारी माझिच न.
बोलून झाल फोन ठेवला तस केलेंडर कडे पाहिल तर फक्त चार दिवसावर पौर्णिमा होती,
सीमाला सांगायला हव म्हणून सीमाच्या रूम मधे गेला.
सीमा झोपली होती अंग गरम होत,
सीमा काय ग काय झाल झोपलीस का?
अरे काही नाही थोडी कनकनी आलिय बाकी काही नाही.
चल डॉक्टर कडे जाऊ.
नको आता थोड्या वेळात बर वाटेल.
थांब मी मेडिकल मधून गोळ्या घेऊन येतो म्हणून सुधाकर बाहेर पडला, मेडिकल मधून गोळ्या घेतल्या,घरी आला सीमा ला गोळी दिली. चहा बनवून देतो म्हणाला पन सीमा नको म्हणाली.
बर एक न सीमा तुला काही संगायच आहे,
सांग न मग त्यात काय.
आईचा फोन आलेला रमा बद्दल तुला आपली ओळख झाली तेव्हा सांगीतल होत न तीच प्रथम वर्षश्राद्ध आहे चार दिवसाने मला जाव लागेल आणि तुला पण आईनी घेऊन यायला सांगीतल आहे.
येशील न?
मला नाही बर वाटत तू जाऊन ये न तोपर्यंत बर वाटलच तर येईल मी पन.
ठीक आहे आराम कर आता म्हणून सुधाकर बाहेर आला.
तीन दिवस झाले पण सीमा फ्रेश नव्हतिच, सुधाकरला काय कराव समजेना आजारी सीमाला सोडून जायची इच्छा नव्हती आणि न जाऊन चालणार नव्हते.
त्याची द्विधा मनस्तिथि पाहुन सीमा म्हणाली एक दिवसाचा प्रश्न आहे जेऊन ये तू.
आता सुधाकरला थोड हायस वाटल. पौर्णिमेच्या एक दिवस अगोदरच सुधाकरला निघायच होत, कारण पौर्णिमेला निघुन विधी वेळेपर्यंत पोहचन शक्य नव्हत.
दोन दिवसाची कपडे बैग त टाकून निघायची तयारी झाली.
सीमा ला भेटन्यासाठी तिच्या रूम वर गेला ति जणू त्याचीच वाट बघत होती.
आलास का मी वाटच बघत होते, अस म्हणून त्याला मीठी मारली आणि रडायला लागली जणू पुन्हा परत भेटनारच नाही.
सुधाकर.. आग सीमा काय झाल दोनच दिवसा साठी चालो आहे, तू म्हणत अशील तर नाही जात, तस तीन डोळे पुसले आणी म्हणाली नाही नाही तू जा मी ठीक आहे..
बर चल निघतो पोहचलो की कॉल करेन तुला, काळजी घे.
हो तू ही नीट जा, काळजी घे.
सीमाचा निरोप देताना सुधाकर कडे अशी पहात होती की पुन्हा कधीच भेटणार नाही.
ते सुधाकरला स्पष्ट जाणवत होत.
येतो म्हणून सुधाकर निघाला, स्टेशन वरुन गाडी पकडली सीमाचा चेहरा काही केल्या नजरे समोरून जात नव्हता,
कॉल करू का?
नको आता आराम करत असेल उगिच माझ्या फोन मुळे डिस्टर्ब होईल.
पहाटे पाच वाजता गावी पोहचला, गाडीतुन उतरल्या बरोबर सीमाला कॉल केला पण पण "नंबर चुकीचा आहे तपासून पहा" असच उत्तर येऊ लागल. अस कस शक्य आहे? बघु नंतर म्हणून बैग घेऊन राणे काकांच्या घरी निघाला.
घरी सगळे दुःखद वातावरण होते. आईबाबा कालच गेले होते, राणे काका काकु सुधाकरला बघून रडू लागले त्याना समजावून सांगून शांत केले.
आंघोळ करून विधिची तयारी चालू झाली.
ब्राम्हण आले पुजेच, नैवेद्य सगळ व्यवस्थित केल होत, ब्राम्हणानि विधी ला सुरवात केली.
पिंडदान करून तस्वीर पुजेला फोटो मागितला, काकु फोटो घेऊन आल्या, सुधाकर पुढे बसला होता त्याच्या हातात दिला.
सुधाकरने फोटो वरील पेपर काढला ब्राम्हण कडे देण्यासाठी फोटो सरळ केला. आणी काय एका क्षणात सुधाकर ला चक्क घाम फुटला, फोटो मधील तरुणी दूसरी तीसरी कुणी नसुन सीमा होती.
हे कस शक्य आहे अस तोंडातुन निघाले तस बाजूला बसलेले बाबा म्हणाले , शक्य नव्हत तेच झाल काय करणार नाशिबापुढे कुणाचे काही चालत नाही.
तेवढ्यातुन उठून सुधाकर बाजूला जाऊन सीमाला कॉल करू लागला पण काहीच उपयोग नव्हता नंबर लागतच नव्हता. काहीच सूचत नव्हत, मग थोड शांत डोक्याने विचार केला की सेम दिसनारी व्यव्क्ति असतात म्हणे तसेच काही असेल, रमा आणी सीमा सारख्याच दिसत असतील.
मनाची उगीच समजूत घालून परत विधिला येऊन बसला , पन मनात वेगळच चालू होत.
दोन तासात विधी पूर्ण झाला.लगेच बैग घेऊन सगळ्या ना सांगीतल ऑफिस मधून ताबडतोब बोलावल आहे, मला लगेच निघाव लागेल. कुणाच्याही परवानगी ची वाट न बघता तडक निघाला, मिळेल त्या गाडीने मुंबई ला लवकरात लवकर पोहचुन काय प्रकार आहे हे जाणून घ्यायचे होते.
मिळेल त्या गाडीने एकदाचा मुंबई त पोहचला टॅक्सी करून घरी आला. सरळ चवथ्या मजल्यावर गेला दाराला कुलुप होत, परत सीमाचा फोन ट्राय केला पन तेच.
आज तेच दार वेगळ वाटत होत, अस वाटत होत खुप वर्ष तिथ कोनी राहत नसल्यासारख. काय प्रकार आहे काही समजत नव्हत.
मग आठवल खालच्या काकुना माहित असेल सीमा कुठे ते,म्हणून कधी नव्हे ते काकुचा दरवाजा वाजवला, काकू बाहेर आल्या का रे सुधाकर काही हवय का? नाही काकु, वरती सीमा राहते ति कुठे गेली माहित आहे का?

काकु.. कोण सीमा? आणी तुझ्या रूमच्या वरच्या मजल्यावरचे सगळे फ्लैट बंद आहेत ते एकाच मालकाचे आहेत, तिनही रूम, तो म्हणे गावीच असतो,
मग सीमा?
अरे कोण सीमा? आपल्या बिल्डिंग मधे सीमा नावाची कुणी राहात नाही.
सुधाकरला काय बोलाव काहीच सूचत नव्हत, जिच्यासोबत गेली एक वर्ष राहात होता ती इथ राहातच नाही? कस शक्य आहे.
स्वतःच्या रूमचा दरवाजा उघडला एक न अनेक विचार डोक्यात चालू होते.
घामाघुम झाला होता, डोक काम करायच बंद झाल होत.
तसाच बेडवर बसून राहिला, तेवढ्यात कपाटावर ठेवलेल्या डायरी कड लक्ष गेल.
कसली डायरी मी तर नाही ठेवली बघू तरी कसली डायरी ते म्हणून सुधाकरने डायरी काढली,
उघडून बघनार तेवढ्यात लाइट गेली. गरम होत होत म्हणून बालकनिचे दार उघडली तेवढ्यात एवढ जोराच वार आल की अस वाटल वादळ घरात शिरतय की काय.
डायरी काढून बघायला सुरवात केली अन सुधाकरला चक्कर यायला लागली " प्रिय सुधाकर मी रमा म्हणजेच तुझी 'सीमा' तू मला ओळखले नाहीस, कसा ओळखशील आपन भेटूनच खुप वर्ष झालेली, तुझ्या आठवणीत पन नव्हते मी कशी दिसते ते, तुला आठवत आपल्या सोसायटीत नाटक झाल होत आपल मुलांच तेव्हा मी आठवीत होते, त्याच वर्षी तुम्ही नागपुरला आलात, त्या नाटकात तू नवरा आणि मी तुझी बायको झाले होते, आणी त्या दिवसांपासून मी कधीच दुसऱ्या कुणाचा विचार देखील केला नाही, कॉलेज मधे पण मूली बोलायच्या अस कुठे प्रेम असत का? पण मी म्हणायचे माझ प्रेम कधीतरी तुझ्यापर्यंत पोहचेल, मग कॉलेज संपल्यावर बाबानी स्थळ पाहायला सुरवात केली तेव्हा पण माझ धाडस नाही झाल, विचार केला तू तर मला विसरला पण असशील मग कुणाला सांगून काय उपयोग, मुलगा चांगल्या हुद्द्यावर आहे आपण असे गरीब, कस जमेल, त्यांनी मलाच समजवल, आमच्याच नात्यातील स्थळ शोधून माझ लग्न जमवल पण... मला मान्य नव्हत, मी तुझ्या व्यतिरिक्त कुणाचाहि विचार केला नव्हता, मग काय त्याच्या नावची हळद लागली पण कुंकु नाही लावायच म्हणून हळदी दिवशी मीच माझ्या खोलीला आग लावून घेतली आणी समाधनाने डोळे मिटले, पण तुला भेटन्या ची इच्छा अधुरिच होती म्हणून सीमा बनून तुझ्या आयुष्यात आले मला माफ कर मि तुझ्याशी खोट बोले पन माझ प्रेम खर होत, मला तुझ प्रेम हव होत मला तुझा सहवास हवा होता, म्हणून सगळ केल.
तुला आठवत मी आंघोळ करून बाहेर आले होते माझ्या माथ्यावर काहीच नव्हत ते बघून तू तुझ्या हाताने मला कुंकु लावलस आणि मी पूर्णतवाने तुझी झाले,
मला एक क्षण पुरेसा होता तुझ्या प्रेमाचा तू तर मला पूर्ण एक वर्ष दिल मी खुप भाग्यवान होते म्हणून तू मला भेटलास, आणी हो मी आता निघते कारण वर्षश्रद्धाचा विधी सुधा बरयापैकी तुझ्याच हाताने पार पडला आणि मला शेवटची मुक्ति मिळाली"
#तुझीच फक्त तुझी#
रमा
~~~~
सुधाकरच्या डोळ्यातून अश्रु धारा वाहत होत्या, मनाशिच बोलत होता तु तुझ साध्य केलस आणी मला मात्र अधांतरी सोडून गेलीस...........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults