. . .ना चि

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 7 September, 2019 - 12:30

. . .ना चि
**********
त्याचे प्रश्न तिला
तिचे प्रश्न त्याला
उत्तर कोणाला
सुचेनाचि

आवडला खेळ
निसटली वेळ
परी ताळमेळ
लागेनाचि

काही देहावरी
काही मनावरही
सुखाच्या लहरी
थांबेनाचि

कळेल जगाला
घराला दाराला
शब्द बोलण्याला
धजेनाचि

इतकाच काळ
इतकाच वेळ
मन रानोमाळ
थांबेनाचि

निरोपी भिजले
शब्द ओठातले
हात हातातले
सुटेनाचि

आजचा उद्याला
देऊन हवाला
प्रश्न जडावला
मिटेनाचि

०००००००
©डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

akku thanks

सुंदर कविता..

निरोपी भिजले
शब्द ओठातले
हात हातातले
सुटेनाचि>> हे खास! खुप आवडलं.. Happy