Submitted by जगदिश ढोरे SJ on 1 October, 2019 - 16:16
माझ्या ऐकेरी जीवनातील तु दुहेरी किरण,
आज पुन्हा झाले मला तुझे गं स्मरण...
स्मरणात होती तु आणी तुझ्या त्या आठवणी,
सांग ना सखे का केलीस तु मला शिकवणी..
तुझ्या शिकवणीत शिकतांना स्वतः ला विसरुन गेलो,
सांग ना सखे कशामुळे मि तुझा नाही झालो...
कितीही केला मि प्रयत्न तरी तुझा नकार,
का नाही समजला सखे तुला माझ्या जगन्याचा होकर..
आज पुन्हा आठवलीस वर्गात झुरतांना,
खुप एकट वाटत होत गं मंदिरासमोर फिरतांना...
आज मंदिरासमोरच्यांना पण अश्चर्य झाल होत,
घरटं बनण्याआधी आपलं तुटत होत...
मैञी की प्रेम काहिच सुचत नव्हत,
सांग ना सखे तुझ नं माझ काय नातं होत...
नात्याला तुला आपल्या नाव देता आलं नाही,
का गं सखे तुला माझ प्रेम समजल नाही..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानेय कविता.. तिची द्विधा
छानेय कविता.. तिची द्विधा मनस्थिती छान मांडलीये कवितेत...
कळेल एकदा तरी नक्कीच कळेल
कळेल एकदा तरी नक्कीच कळेल प्रयत्न करत रहा..........
पुलेशु!!! भापो.
पुलेशु!!! भापो.
धन्यवाद मित्रांनो
धन्यवाद मित्रांनो