पहिलं प्रेम

Submitted by @गजानन बाठे on 4 October, 2019 - 11:14

पहिलं प्रेम

तुझा निष्पाप चेहरा
ते खळखळून हसणं
अघोरी वाटतं मनाला
क्षणभरही तुझं नसनं

कळतं का तुला
चोरून का मी बघतो?
आठवणीत रोज तूझ्या
तारे मोजीत का निजतो?

कधी कधी मी तुला
उगीच टाळतो
न भेटण्याची शपथ
प्रत्येक वेळी मीच का मोडतो?

एकदा तरी विचार मला
काय आपलं नातं?
टोकावरचे दोन ध्रुव
मग तुझं माझंच का जुळतं

नातं नसून तुझ्याशी
का मी असा वागतो?
कारण तुझ्यात कुठे तरी
मी मलाच शोधतो ***

गजानन बाठे..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults