विडंबन

गातेस का तू घोरताना भैरवी !

Submitted by A M I T on 31 July, 2012 - 06:37

सुप्रियाताईंची क्षमा मागून...

गातेस का तू घोरताना भैरवी
हे प्रिये मज सोसवेना रात्रपाळी

माहेरी जाईन म्हणतेस, भांडताना
फोनवर तुझी मी पुसेन खुशाली

काल तू त्या उंदराला मारताना
येऊन बसले लाटणे माझ्या कपाळी

माझ्या परीने मी गायली जी गज़ल
जज म्हणाले, मज भावली कवाली

शेजारच्या ज्युलीस सहजच पाहता
नाक मुरडूनी, मला म्हणाली मवाली

दावली कितींदा तुला चिंचपोकळी
तरी म्हणते, दाखवा ना कुलू-मनाली

लाडवांना भेदताना हाल ऐसे जाहले !
हरसाल दात पाडण्या येते दिवाळी

* * *

गुलमोहर: 

गझल ना झिंगते हल्ली

Submitted by Kiran.. on 29 July, 2012 - 15:08

आमचे प्रेरणास्थान - वैवकु
( गुरुजी क्षमा असावी )

अर्ध्या जळालेल्या गझलेस माझ्या रंग का नाही
सरण ओले चिता जाळावयला ओंडका नाही

तुझी रद्दी खपत नाही नि करतो शायरी खोटी
कुत्रे जरि चावले तुला , गळ्याला हुंदका नाही

नशेची बाटली फुटली, तिथे घसरायच्या रांगा
तुझ्या या देवळास विट्ठला रे रांग का नाही

कुणाची पायरी कुठली, कसे ठरवायचे सांगा
कुणी विकली कुणी लुटली, लज्जेची नोंद का नाही

गझल ना झिंगते हल्ली, अता प्रत्येक पेगाला
नशील्या किरणदा इथल्या, गल्लीतच व्होडका नाही

- Kiran..

गुलमोहर: 

म्हणतात लोक काही, लिहितोस छान 'अमित'

Submitted by A M I T on 23 July, 2012 - 07:37

कळपातले माणूस नाहिद नालबंद यांची जाहीर माफी मागून

काहीतरी आहेच ! ही रात्र जागतो मी
चादरीत पांघरूणाच्या ढेकूण शोधतो मी

तोंडात पान माझ्या, गुटखा असो वा खैनी
सुचना असेल जेथे, तेथेच थुंकतो मी

नाही अता भरोसा, पोटाच्या सुटण्याचा
शर्टात झाकताना, पॅन्टीत कोंबतो मी

मी सांगतो बॉसला, आहे खरेखुरे जे
टॉमी असतो दारी, उशिरा पोचतो मी

परिणाम होत नाही, पत्नीवरी कशाचा
तिच्यासवे का मग, उगाच भांडतो मी ?

रस्त्यावरी कधीचा फिरतो उदासवाणा
दिसता कुणी तरूणी, आपसुक थांबतो मी

म्हणतात लोक काही, लिहितोस छान 'अमित'

गुलमोहर: 

(अजून किती दिवस पैसे देऊन टाकाऊ धागे बघणार?)

Submitted by मुरारी on 13 July, 2012 - 05:08

नमस्कार दोस्तांनो,

कधीतरी, कुठेतरी, कोणत्यातरी, अशाच विषयाची वाचली - ऐकलेली चर्चा माबोवर का होऊ नये म्हणून हा धागा सूरू करतो आहे..

तर मुद्दा असा आहे की,

आपण इंटरनेट चे दरमहा बील स्वतःच्या कमाईने भरतो (अपवाद क्षम्य)
बील याचा अर्थच असा आहे की आपण उपभोगलेल्या सुविधेची किंमत अदा करणे.

अपेक्षा निव्वळ मनोरंजनाची(?) असते मात्र कुठल्याही दिवशी उत्तम लेखांइतकेच अनेक फालतू धागे बघणॅ आपल्याला बंधन कारक बनते..

गुलमोहर: 

जाहिरातींची विनोदी "वाट"!!

Submitted by निमिष_सोनार on 7 July, 2012 - 02:25

प्रस्तुत आहेत, काही जुन्या प्रसिद्ध जाहिराती ....
माझ्या ("व्यंगचित्रकाराच्या") मिस्कील तिरकस नजरेतून...
वाचतांना मूऴ जाहिराती आठवल्यास वाचनाचा आनंद आणखी वाढेल यात शंका नाही....
अशा प्रकारचा माझा हा पहिलाच प्रयोग....मूळ जाहिराती मुद्दाम येथे सांगत नाही... तो तुमच्यासाठी होमवर्क समजा! जागोजागी हिन्ट दिल्या आहेतच.
(१)
'रोहते' या गावी एक 'वीर' खेळाडू , 'उसने' अवसान चेहेऱ्यावर आणून ऊस खाणाऱ्या एका 'पायल' वाजवत असलेल्या अभिनेत्रीला म्हणतो :
"काय गं, तुझ्या मजबूत दातांचे रहस्य मला सांगतेस का?"

गुलमोहर: 

कसे शक्य नाही वाचकाला झुकवणे?

Submitted by मंदार-जोशी on 3 July, 2012 - 02:03

मूळ रचना इथे आहे. हलके घ्यावे.
------------------------------------------------------------------------

कसे शक्य नाही वाचकाला झुकवणे?
नित्य पाडून गझला तयाला पकवणे

लपू मी कुठे अन् कसा मी कधी रे?
पहिलेच पान शक्य नाही चुकवणे

उसासे टाकून टंकली ही गझल मी
शक्य नाही अता तिरके प्रतिसाद पचवणे

कुजकट शेरे रिचवले मी मदाने
टोमण्यांचे मला तेच होते खिजवणे

गझल निर्मुनी मी कुठे अदृष्य होऊ
थांबेल का मतले-काफिये जिरवणे

गुलमोहर: 

प्रेमाचं सोंग

Submitted by सुधाकर.. on 1 July, 2012 - 02:15

तुझ्यासाठी भोगतो दुरावं मी किती
सांग तुझ्या प्रेमात झुरावं मी किती.

सांगतेस नड तुझी रोज एक नवी
दिसामाजी दिस गेले उरावं मी किती.

आठवांत रोज तुझ्या मुरावं मी किती
जगण्यात माझ्या तरी नुरावं मी किती.

काय बये प्रेम तुझं सोंगाड्याच्या गती
तुझा हात म्हणुन फूल चुरावं मी किती.

कासवाची चाल तुला लावू कशी गती?
तुझ्यासाठी आणू आता पुरावं मी किती?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

फटके अफाट होते

Submitted by Kiran.. on 25 June, 2012 - 23:08

प्रा. देवपूरकर सर, माफ करा.. राहवलं नाही. एका विबासित पतीची करुण कथा !
आमची प्रेरणा http://www.maayboli.com/node/35934

का वाटते पतीला, पत्नी जुनाट होते!
स्टेफनित गुंतले की, जगणे सुसाट होते!!

घन केशकुंतलांनी, नव-यास हे शिकवले....
पाऊल वाकडे कर, पाऊलवाट होते!

असते किती जणांना, अवगत कला जिन्याची ?
अंगास वस्त्र त्यांचे, जगणे विराट होते!

तेव्हां उभे दुतर्फा, मेहुणे खवळलेले ;
ओठांस ओठ होते, तेही अचाट होते!

यावे न आता कोणी जन्मास माणसाच्या!
कण्हतो जिथे जिथे तो, दुखरीच पाठ होते!!

कोड्यासमान माझे सासर खाष्ट होते;
मोजून आठ होते, फटके अफाट होते!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

व्हाय धिस माबोवरी, माबोवरी, माबोवरी डी!

Submitted by शोभा१ on 15 June, 2012 - 06:48

आमचे प्रेरणा स्थान : व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी

व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,

सगळ्याना मुक्क्त प्रवेश माबोवरी ,
डुआयडींची गर्दी फ़ार माबोवरी ,
ओआयडींना त्रास भारी माबोवरी ,
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,

नि.ग.च फ़्युचर ब्राईट, ब्राईट,
फ़ोटो, माहिती, राईट राईट
नसते तिथे फ़ाईट, फ़ाईट
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,

गगोचा ब्रेक, ब्रेक.
कॉहाचा, मेक, मेक.
अ‍ॅडमीनचा धाक, धाक.
व्हाय धिस माबोवरी माबोवरी माबोवरी डी,

मा.बो. भारी साईट साईट
डुआयडीशी फ़ाईट, फ़ाईट
गगोवरी, गगोवरी, गगोवरी.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विडंबन