विडंबन

विडंबन-बघ माझी आठवण येते का?

Submitted by प्रसाद पासे on 19 April, 2012 - 03:57

(कवी सौमित्र यांची जाहीर माफी मागून)

बघ तुला काही सुचतंय का?

शांत मनाने जरा विचार करून पहा
बघ तुला काही सुचतंय का?

हात लांबव, उचल ती टेबलावरची लेखणी
आलेला विचार लिहून टाक
बघ तुला काही सुचतंय का?

मनात आलेलं विचारांचं काहूर थोडं सावरून घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच सावरलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभा रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ तुला काही सुचतंय का?

मग चालू लाग, प्रवासाला निघालेल्या रवीचा निरोप घे
चालत रहा वाट संपेपर्यंत, ती संपणार नाहीच, परत घरी ये
गोंधळून जाऊ नकोस, शांत चित्ताने एका ठिकाणी बस

गुलमोहर: 

दिसला गं बाई दिसला!

Submitted by अन्नू on 17 April, 2012 - 12:35

(जगदीश खेबूडकर यांची मनस्वी क्षमा मागून.)

दिसला गं बाई दिसला महीला मुक्ती (क्रांती) सॉंग स्पेशल
प्रथम, गाण्याची चाल नीट समजण्यासाठी ते ओरिजनल गाणे येथे पहा व ऐकून घ्या.
http://www.youtube.com/watch?v=lCiUi_LKkoM

गाणे:- दिसला गं बाई दिसला (रिमेक)
चाल:- दिसला गं बाई दिसला मुख्य गाणे (पिंजरा सिनेमा)
नाईका गायकः- गावचीच एक सर्वसामान्य धाडसी बाई
कोरसः- गावातील पाच सहा शोधून काढलेल्या तोंडच्या फटकळ बाया!

अग बयोs गंsssssssssssss

गुलमोहर: 

उलाला उलाला उलाला बाई माझी करंगळी मोडली ...........

Submitted by भुंगा on 14 April, 2012 - 01:23

हे विडंबन की फ्यूजन ते माहित नाही.... तुम्हीच ठरवा Happy

गदिमांची क्षमा मागून.........

********************************************************************************************************

आह्हाहा... ओहोहो......आह्हाहा... ओहोहो......आह्हाहा... ओहोहो......आह्हाहा... ओहोहो......
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स.......

चुटकी जो तुने काटी है, जोरी से काटी है यहां वहां
रूठी हुं मै तुझसे रूठी हूं मुझे मनाले तू....... ओ जानेजा
छेडेंsssगे हम तुझको लडकी तू है बडी बाँबार्ड...... आहा आहा आहा आहा

उलाला उलाला उलाला उलाला खोडी कुणी काढली

गुलमोहर: 

एवढंच ना?

Submitted by रीया on 11 April, 2012 - 14:08

त्यादिवशी हापिसला सुट्टी घेतली म्हणुन आमच्या आऊसाहेब माझ्यावर स्वयंपाकाची जबाबदारी टाकुन शाळेत निघुन गेल्या. मी आपलं सगळं साग्रसुंदर जेवण तयार केलं खर पण माझ्याकडुन ना स्वयंपाकात थोडीशी चुक झाली आणि काही काही (काहीकाहीच हं!) पदार्थ बिघडले Sad
आता कधीतरी स्वयंपाक करणार म्हणल्यावर बिघडणारच ना?
पण......! Sad

गुलमोहर: 

तो आणि मी - पुन्हा IT

Submitted by रीया on 8 April, 2012 - 07:23

तो आणि मी

पुन्हा एकदा संदीप खरेची क्षमा मागुन ....माझे IT अनुभव...

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो bugzilla उघडतो अन शीळ वाजवतो

मी जुनाट पास्कलपरी झेली सारा राग
तो नविन डॉटनेट फक्त ड्रॉप अ‍ॅण्ड ड्रॅग
मी GUIसाठी जीव गंजवित बसतो
तो त्यातही एक अ‍ॅडिशन सांगुन जातो

डोक्यात माझिया Requirements अन जावा
रोज मागतो client रिझल्ट नव नवा
तो त्याच रिझल्टचे बनवतो Document
अन टास्क म्हणुनी SVN update करतो

मी कधी बापड्या DB वरती चिडतो
तो त्यातही डेटाटाईप एरर काढतो
मी गुगलुन एकदाचा कोड लिहीतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने बग शोधतो

गुलमोहर: 

खराखुरा Developer

Submitted by रीया on 3 April, 2012 - 05:38

Developer

पुन्हा एकदा संदीप खरेची क्षमा मागुन...नास्तिकचे IT Version ....

एक खराखुरा Developer जेंव्हा Computer on करतो
तेंव्हा खरंतर Clientside लाच भर पडत असते
की कुणीतरी नुसतंच का होईना
पण प्रामाणिकपणे आजही Login केलयं या विचाराची !

एक खराखुरा Developer जेंव्हा Computer on करतो
तेंव्हा शक्यता होते निर्माण
Client नी आपल्या requirements नव्याने पुन्हा बदलण्याची !

एक खराखुरा Developer जेंव्हा Computer on करतो
तेंव्हा कोर्‍या नजरेने पाहत रहातो
कालचा अर्धवट सोडलेला कोड, आज बदलेलं DB Structure.....
काहीतरी का होईना पण आज Bugzilla वर raise करता येईल

गुलमोहर: 

शिळ्या पोळ्यांचे थालीपीठ : एक फर्मास पाककृती

Submitted by भुंगा on 22 March, 2012 - 04:05

लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
शिळ्या पोळ्यांचा कुस्कर
कांदा
हिरव्या मिरच्या
बारीक चिरलेली कोथिंबीर
दाण्याचे कूट
मीठ

क्रमवार पाककृती:
१) शिळ्या पोळ्यांचा कुस्कर थोडा पाण्याचा हबकारा मारून नरम होऊ द्यावा .
२) हिरव्या मिरच्या मिक्सरवर वाटून घ्याव्यात.
३) पोळ्यांचा नरम कुस्कर + बारीक चिरलेला कांदा + मिरचीचे वाटण + मीठ + दाण्याचे कूट + बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करून थालीपीठासाठी गोळा मळून घ्यावा.
४) तेल सोडून मस्त पातळ व खरपूस थालीपीठे भाजावीत.
५) उलटताना मोडण्याचा संभव असल्याने खूप मोठी थालीपीठे लावू नयेत.

गुलमोहर: 

घरे....(चरे वरून)

Submitted by उमेश कोठीकर on 20 March, 2012 - 00:29

प्रेरणा- चरे(http://www.maayboli.com/node/33470)-मिल्या

"बापरे किती खराब झालायंस?" मी हृदयात डोकावत म्हणालो

"तुझ्या कवितेवरील प्रतिसादांमुळेच की रे, पाहतोयस ना किती घरे पाडलीस तू मला?" ते विषण्ण होऊन उत्तरले

"खरेच की आता मला आठवत सुद्धा नाही ... कधी अन केव्हा इतकी घरे पडली ते... " मी खांद्यावरची झोळी सावरत उद्गारलो
"हा पण तो बघ ते पहिलं घर पडलेलं आठवतंय...
’आईविना पोर....गुरख्याविना ढोर......चोरीविना चोर.....बायकोविना जोर’ या यमक जुळवून केलेल्या पहिल्या कवितेच्याच्या वेळचेच ना ते... अरे पण केवढ्या टाळ्या, केवढे कौतुक..."

"तुला नाही कळणार ते...

गुलमोहर: 

बाथरुमात शिरताना...

Submitted by निंबुडा on 14 March, 2012 - 05:11

प्रेरणा : भांडणात शिरताना
आणि हाथरुणात शिरताना

बाथरुमात शिरताना झाला कसा हो घात
उंबर्‍याला अडखळले, घसरून पडले, मी दारात
दारा SSSSS त
बाथरुमात शिरताना झाला कसा हो घात

सगळे गेले कामावर घरात मी एकटीच
हाडन् हाड मोडले पाठीची तिंबली कणीक
सुदैवाने धड आहेत जसेच्या तसे पाय हात
पाय हाSSSSS त
बाथरुमात शिरताना झाला कसा हो घात

सणकून बसला मार वेदनेचा महापूर
आयोडेक्स सापडेना मूव्ह ही झाले फितूर
बाथरुमात शिरायची भीती दाटली मनात
हो मनाSSSSSत

गुलमोहर: 

"रागावली ती !"

Submitted by निमिष_सोनार on 13 March, 2012 - 22:22

सूचना: हे गाणे घ्या तुम्ही गमतीवरी गमतीवरी जी !!
-----
का अशी रागावली रागावली रागावली ती ?

दूर वर बसला चंद्र चंद्र..
चंद्राचा रंग पंधरा फट्ट !
शुभ्र शुभ्र प्रकाशात ..
रात्र मात्र काळीकुट्ट !

का अशी रागावली रागावली रागावली ती ?

मुलगी मुलगी गोरी गोरी..
माझे हृदय केले तीने चोरी !
डोळे डोळे भिडले भिडले ..
माझे भविष्य अंधारले !

का अशी रागावली रागावली रागावली ती ?

हातात पेला, दारूने भरला..
डोळे रडून रडुन ओले !
जीवन एक्काकी , पोरगी आल्ली ..
जीवनात मज्जा आली !

प्रेम प्रेम, तुझे-माझे प्रेम..
ओल्या पावसात आपण न्हाऊअ !
जाऊअ जाऊअ आपण जाऊअ ..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - विडंबन