विडंबन

(का? का? का?)

Submitted by पाषाणभेद on 7 March, 2012 - 19:06

(का? का? का?)

(मुळ भांडवल आमचेच, म्हणजे हे!)

अवेळीही कुणी का लिहीत जाती
दिवसा रातीही का जागे राहती

का न त्यांचे कॉम्पुटर जळती
का न त्यांचे किबोर्ड तुटती

प्रतिसाद नच का कुणी देती
वेळेवर का सारेच झोपती

प्रतिसाद देण्या तुम्ही का थांबले
गिनीपिग उगा का प्रथम धजावले

कंपुबाज सारे का जमून येती
येथे येवूनी कट्ट्यावर का जाती

का संपादक उगाच येथे असती
"की, आम्ही येथे आहो" असे सांगती

गुलमोहर: 

भांडणात पडतांना...

Submitted by गोगो on 7 March, 2012 - 10:53

नमस्कार,
विडंबनाचा पहिलाच प्रयत्न आहे तेव्हा अभिप्राय नक्की कळवा.
स्फुर्ती: (अर्थातच http://www.maayboli.com/node/33279)

भांडणात पडतांना
माझा धरलास हात
गधड्या घर आवर रे सावर रे
धड वाग......

थकलेल्या डोळ्याना
अरे आवरेना नीज
दूर कामे खुणावत
पडली सारी कितीक
ह्या इथल्या कामवाल्या दांड्या किती मारतात

सांग कशी तिजविनाच
कामे करू भारंभार
कशी तारांबळ होई
अन नवरा कामचोर
घर-ऑफिस मीच बघते, मीच जाते बाजारात

गुलमोहर: 

लाटणे रिटर्न्स ! (भांडणात शिरताना)

Submitted by A M I T on 7 March, 2012 - 00:05

भांडणात शिरताना तुझा धरला मी हात !
सखये गं आवर ही लाटण्याची नको बात !

भरलेल्या लोकलला आलो मी लटकून
चार जिने चढल्यावर गेलो पुरता थकून
त्या तिथल्या म्हणे आणा वाण्याकडून अंडी सात !

सांग कसे चावू मी लाडू हे मोतीचुर
शेजारील बघ काका झाले किती चतूर
डाळ इतकी पातळ नि शिजला नाही कधी भात !

मुळ गीत इथे पहा.

* * *

http://kolaantudya.blogspot.in/

गुलमोहर: 

फटका..

Submitted by -शाम on 5 March, 2012 - 23:46

महासत्तेचं सपानं पडलं अवई मोठी उठली
आता तुम्हीच सांगा पाव्हणं इथं प्रगती आहे कुठली..||

दहाच आले करून गेले अब्रुच्या चिंध्या
दारी कुणाच्या चालून आल्या सत्तेच्या संध्या
वजीर राजे बदली झाले... हौस कुणाची फिटली....||

दौर्‍यावरती दौरे आता होतील हो पुन्हा
हात जोडूनी मते मागण्या येतील ते पुन्हा
निवडून येतील तेच पुढारी... नोट जयांची वटली...||

तांदूळ खातो पोरांचा तो गुरुजी आवडीने
सचिव येतो ग्रामसभेचा त्याच्या सवडीने
सरपंचाने किती घरांची... सिमेंट्-वाळू लुटली...||

कर्ज फेडुनी शेतकरी तो कंटाळून गेला
फास घेऊनी मृत्यू त्याने आपुलासा केला

गुलमोहर: 

कशाला हव्यात गंगा नि काशी?

Submitted by A M I T on 1 March, 2012 - 00:44

सुप्रियाताईंच्या 'चांदणे ह्रदयात माझ्या' या गझलेचे स्वैर विडंबन.

विदेशी जर कुणी फुकटात पाजी
का पिऊ मी ती स्वस्त देशी?

वांगं केलयसं की कालचीच शेपू
कशाला करता उगा चौकशी?

परवा म्हणाली, "कामवाली ठेवू."
कळेना कुठे शिंकली माशी

तुमच्या हाती जादू असता
कशाला हव्यात गंगा नि काशी?

आणण्यास साखर कंटाळा केला
म्हणे, पहा ते शेजारचे जोशी..!

कशी मिळाली ही बायको नशीबा
कुठला गण हिचा नि कुठली राशी?

ज्योतिष्यास पुसला उपाय जेव्हा
म्हणाला, तुज आहे तुजपाशी..!

संतापाचा आता उद्रेक झाला
भोसकावी हिला की लावावी फाशी?

* * *

गुलमोहर: 

मुस्काडफोड

Submitted by दक्षिणा on 21 February, 2012 - 02:45

एखाद्याच्या लाईफच्या सुराची वलये,
छान अशी स़ळसळली की
थेट (त्यांना) गॉसिपिंगला घेवून जातात........ Sad

अशी वलये... त्यांनी कधिच सोडली नाहीत.
कारण ते नाही सुसंस्कृत, पांढरपेशी समाजाचे (खरे) प्रतिनिधी
त्यांना चविष्ट वाटतात असले विधि Uhoh

काडी घालायची ...
री ओढायची ..
सभ्यतेचा आव
छचोरतेला वाव Angry

जोराचा संवाद
फालतू प्रतिसाद Sad

दिवसभर रोमात राहायचे
पाना-पानातून डोकावयाचे

कोण कुणाचा शत्रू-संगी Uhoh
कुठे बाफ पेटता जंगी

कोण कुठे काय करतो ते चावावे
नाक खुपसावे, कांदे सोलावे Sad

हेच यांच जगणं आहे. हुं...... (नाक उडवणारी बाहुली)

गुलमोहर: 

मी पोहे खाल्ले नाही..

Submitted by रीया on 16 February, 2012 - 01:35

मी पोहे खाल्ले नाही

संदीप खरे ची क्षमा मागून .....माझे केरळ मधले अनुभव

मी पोहे खाल्ले नाही,शिरा ही खाल्ला नाही
किती दिवस झाले, साधा चहा ही प्याले नाही

भवताली पार्टी चाले, ती विस्फारून बघताना
कुणी इडली कुस्करताना कुणी रस्सम ओरपताना
मी ताट घेऊन बसले जेवणाकरीता जेंव्हा
एका पोळीसाठी देखील कुणी मला विचारले नाही

भुकेला माझा चेहरा, सुटलेली घाबरगुंडी
सांबार न् भात पाहता भर उन्हात वाजे थंडी
मी coconut oil खाल्ले, काही उपाय नव्हता तेंव्हा
पण उपीट-केळे खाणे मला कधीच जमले नाही

अव्यक्त फार मी आहे मूळ लुंगी जिथल्या तेथे

गुलमोहर: 

थन्डी..............

Submitted by वैवकु on 11 February, 2012 - 01:11

सन्दर्भः http://www.maayboli.com/node/32543#comment-1886275

थंडीच्या पल्याड तुझे गर्म श्वास
लाजरे उच्छ्वास थंडीतून

कॅन्डीवरी तुझे टेकतात ओठ
जाणवते थन्डी इथे मला

मांडीवरी वरी तुझे फिरतात हात
मला पोचतात स्पर्श सारे

ब्रँडीतून तुझे सांडतात डोळे
माझेही हुंदके ब्रँडीमधे

मावलो दोघेही एकाच बंडीत
फाटणार थन्डी. फाटणार

गुलमोहर: 

तू ही त्यातला एक शहाणा आहे कौतुका

Submitted by कौतुक शिरोडकर on 5 February, 2012 - 08:57

’मीच बरोबर’ असले दावे करताय का फ़ुका
कधी कुपाच्या बाहेर सुद्धा यावे मंडुका

जरा पेटता माबोवर लेख, ललित वा गझला
काडी घालून तिथे लावती वैचारिक थुका

किती करी आवाज रिक्षाचा प्रतिसादापूर्वी
पुन्हा धाग्याला वर आणती होऊनिया मुका

डुआय होऊन नांदती बाफाबाफांवरती
दुजा येता डुआय कुणी... त्यास सोडेना सुका

माझी कविता सदा ग्रेट... आहे मीच सम्राट
उर्मट अधिकाराने दाखवी दुसर्‍यांच्या चुका

सदा तयारी जमीनदोस्त करण्यास इतरांना
कशा शमाव्या मायाजाली प्रसिद्धीच्या भुका

कुणास ठावे कधी कुणाच्या निशाण्यावर कोण
कैक शिकारी सज्ज खडे सरसावून बंदुका

('माय'बोली वर काढशी 'आय माय' दुसर्‍याची

गुलमोहर: 

(पहा मोकळा तो जिरेटोप आता )

Submitted by जागोमोहनप्यारे on 31 January, 2012 - 01:35

पहा मोकळा तो जिरेटोप आता

कुठे तो शिवाजी कुठे तो शहाजी.
पहा मोकळा तो जिरेटोप आता ... Proud

पुन्हा तोच खड्डा पुन्हा तीच झारी
वृक्षारोपणाला नवे रोप आता..

दिवा मालवूनी घड्याळा गजर द्या
किती साचली नेत्रि ही झोप आता

किती राबतो तो गवंडी फुकाचा
दुज्या राजवाडा तया खोप आता

जळा निर्मळालाच दुर्गंध आला
कशाला सुगंधी हवा सोप आता

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विडंबन