फटके अफाट होते

Submitted by Kiran.. on 25 June, 2012 - 23:08

प्रा. देवपूरकर सर, माफ करा.. राहवलं नाही. एका विबासित पतीची करुण कथा !
आमची प्रेरणा http://www.maayboli.com/node/35934

का वाटते पतीला, पत्नी जुनाट होते!
स्टेफनित गुंतले की, जगणे सुसाट होते!!

घन केशकुंतलांनी, नव-यास हे शिकवले....
पाऊल वाकडे कर, पाऊलवाट होते!

असते किती जणांना, अवगत कला जिन्याची ?
अंगास वस्त्र त्यांचे, जगणे विराट होते!

तेव्हां उभे दुतर्फा, मेहुणे खवळलेले ;
ओठांस ओठ होते, तेही अचाट होते!

यावे न आता कोणी जन्मास माणसाच्या!
कण्हतो जिथे जिथे तो, दुखरीच पाठ होते!!

कोड्यासमान माझे सासर खाष्ट होते;
मोजून आठ होते, फटके अफाट होते!

काढून घेतले हो, होते...खिशात नव्हते;
माझेच लक्ष नव्हते...समदे पिसाट होते!

माझ्या घरीच झाली, धुलाइ दांडक्याने;
हातात फक्त माझे, अवयव सपाट होते!

- Kiran..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Happy ---^---

विडंबनातही ह्या अर्थपूर्ण ओळी...
यावे न आता कोणी जन्मास माणसाच्या!
कण्हतो जिथे जिथे तो, दुखरीच पाठ होते!!
>> सही आहेस Happy

अवयव सपाट>> फूल टू बदडलंय Lol

साष्टांग दंडवत......!!!!!!>>>>
शिरसाष्टांग दंडवत......!!!!!!

माझ्या घरीच झाली, धुलाइ दांडक्याने;
हातात फक्त माझे, अवयव सपाट होते!>>>>>>>>>>>>>>>>>>> गरीब बिच्चारे पुरुष.......:हाहा:

सगळेच शेर झाले जणु बायकोकृपेने.....................(आमद के शेर ;))
सरसकट शेर सगळे "लावली वाट!!" होते

मित्र / मैत्रिणींनो
आभारी आहे सर्वांचा. अशीच आपली मजा Happy

@ रतन जाधव - Rofl ( ऑफीस ते घर आणि घर ते ऑफीस अस्स आयुष्य आहे बघ Wink

वैविकु - आप वही हो जिनके फॅन हम हुवा करते थे Biggrin आज पता चला Wink थँक्स रे !

धम्माल Rofl Rofl

माझा हातभार

दारूच्या नशेत काल, ज्या घरात शिरलो
कळाले जरा उशीरा, ते एक कपाट होते !

____/\_____
Biggrin Biggrin Biggrin Biggrin

महान आहे................हहपुवा.......

कालपासून सर्च देतोय. या आयडीचा .

पण काही म्हणा, ए -१ आयडी आहे.
तुमचे भाग्यच याच्या हातून धुलाई झाली (असेल तर), सारखी आठवण येते म्हणून म्हटलं हो

तुमचा फोन नंबर मिळालाय बरं का संगीता बै. लिहीतो सावकाश काळजी नसावी Wink

अस्काय कर्तोस रे किरणदादा स्वतःच्याच आयडीचा कसला शोध
बर नसेल वाटत तर एखाद्या चांगल्या डॉक्टरना दाखवना रे किरणदादा

Pages