(मुळ गाण॑...माहेर माझ॑ वसल॑ बाई ...वाहे ग॑गा पलिकडे)
सासर माझ॑ वसल बाई
वाहे गटार पलिकडे..
रोज सकाळी उठल्यावरती
मामा॑जी शिवीगाळ करती
लक्ष सर्॑..येता जाता सुनेकडे...
वाहे गटार पलीकडे...
उठल्या आत्या , सातचा ठोका
पूरा करती अपुलाच हेका
बोल बोलती, सदा वकडे...
वाहे गटार पलीकडे...
"हे" आमुचे भरीच छान
आई बापाच॑ लडक ध्यान
वदवीती मजला तेच धडे
वाहे गटार पलीकडे...
एकीन॑तर दुसरी येते
बदनमीची खन्तच नसते
अस॑ सासर कुणा असे का?
हाचि मजाला प्रश्न पडे..
वाहे गटार पलीकडे...
जेवणात ही कढी अशीच राहू दे
ताटातल्या भातावरी अखंड वाहू दे
गंडविले लोणच्यातील तेल वाढूनि
कळले ना त्यात नसे फोड काहूनि?
फोडीसहीत लोणचं जिभेस लाभू दे
रोज डाळ शोधण्याचा छंद आगळा
पोळी अन पापडाचा ना अर्थ वेगळा
आमटीत मीठ नित्यनेम असू दे
घासात ह्या केस तुझा नित्य भेटतो
तोंडातुन ओढूनि मग त्यास काढतो
जेवणातील हे प्रकार बंद होऊ दे
मुळ गीत इथे पहा.
* * *
' आदर्श ' दाखवणारे !
स्वतःही चुकू लागले !
काळ्या खाणीत तेंव्हा !
' कमळ' फुलू लागले !!!
-----------------------------------
आज परत आपण !
मुळ अस्तित्व दाखवले !
पाच दिवसाच्या कसोटीला !
चार दिवसात गमावले !!
----------------------------------
( आरोळी कार ) अमोल केळकर 
सलिल आणि संदिपची माफी मागुन.. दुर देशी गेला बाबा....
यू ट्युब मधील ह्या गाण्याच्या विडीओ मध्ये सलिल म्हणतो...
"अशीच एक गोष्ट आहे जी आपल्याला कळत नाही पण लहान मुलांना जाणवते."
अशीच बापाची व्यथा कळलेल्या मुलाचे मनोदय सांगणारं, मन पिळवटुन टकणार हे विडंबन आहे.
हॅप्पी गटारी...."
थर्रा देशी, आला बाबा, घेई फैलावर आई
अख्खी बाटली पोटात, तरी घरी आला बाई
असा चकणा बेचव कसाबसा पचवला
बार भिंतीत बसुन अख्खा खंबा रिचवला
"आता पुरे रे बेवड्या" कुणी म्हणतच नाही
कशासाठी कोण जाणे देती ड्राय डेला सुट्टी ?
कोणी ढोसायाला नाही…कशी व्हावी कट्टी-बट्टी ?
कोणीही निवडून आले तरी हे असेच होईल
तो येता
( चाल---- जन पळभर म्हणतील हाय हाय )
तो येता होइल कार्य काय
जन दिनभर रडतील धाय धाय ....
महाला वरती महाल उठतील
शेतकर्यांची घरे खंगतील
मोह फुलांच्या बागा फुलतील
ज्वारी बाजरी रोज भरडतील
मदिरेचे ते पाट वाहतील ... तो येता ....
नाजुक पायी चाळ बांधतील
शृन्गारिक अती लावणी गातील
वदनांमध्ये विडे रंगतील
रतन मंच की शैय्या सजतील
असहाय्य जन मग त्यात पोळतील .... तो येता ....
झोपडवासी माता भगिनी
कार्ड घेऊनी रांग लवतील
कार्डावरती काय मिळवतील
(चाल: रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी...)
लाचखोर लोकांनी, भ्रष्ट साऱ्या मार्गांनी
स्वार्थासाठी कायदाही तोडीला
पायबंद घालू त्यांच्या खोडीला |धृ|
नवी कोरी गाडी काळ्या पैशाची
भरली ती भेसळीच्या मालाची
गुंड आले तडीपार, तडीपार जोडीला |१| पायबंद घालू..
जात येत विमानानं देशात, परदेशात
दलालीत डल्ला मारी देशात, मायदेशात
त्यांनी मायदेशाचा टॅक्स का हो बुडविला |२| पायबंद घालू..
(मूळ कविता: जडतो तो जीव.... आभाळमाया)
जळते ती पोळी करपतो भात
खारटे ती भाजी जाईना पोटात
मिळे हेच अन्न नशिबात खोट
गिळतो मी घास भरतो हे पोट
पाणीदार कढी मिळे त्यात केस
अशी का रे देवा मिळे मला मेस?
बेचव का अन्न बनवते बाई?
मेसवाली बाई ... मेसवाली बाई
प्रेरणा..(http://www.maayboli.com/node/27286#new)
पोळी
शहरातल्या पोळीसारखी
लुसलुशीत वाटते का मी?
अस्सं?
हा तळहात बघितलास?
गावाकडच्या चुलीवरच्या भाकरीसारखा
नक्कीच आहे ना?
एक झापड खाऊन बघ
नाचशील तनतनतन!
**********************************************
भाजी
मान्य आहे लग्नाच्यावेळी
भोपळा असलेली मी
आता भोपळ्यावर भोपळा झालीय
मला भोपळा मार्केट म्हणतांना
जवळ असतांना पाहिलेस
तर तूही भोपळ्यात खोचलेल्या
उदबत्तीसारखा दिसशील!
****************************************************
ठेचा
कधीतरी लग्नाकार्याला
मेकअप छान वाटतो
मेकअपशिवाय माझ्यातल्या चुडैलला
प्रेरणा..(http://www.maayboli.com/node/27293)
लक्तरलेल्या बनियनसारखी, पानं
आमच्या फाटक्यातुटक्या कवितांची
तुझ्यासमोर काय उघडली
तू जणू सुपारीच घेतलीस
आमचे
विडंबन करण्याची
मोठा चुना लागल्यावर
(संपर्कातून मेलमधे)
आमच्या लक्षात आली
आमची चूक
आता आम्हीही कात टाकलीय
आम्हीच विडंबन करायला शिकलो
(आमच्याच कवितांचे)
शेवटी तुझ्यामुळे
विडंबनाचा किडा लागलाच!
प्रेरणा...(http://www.maayboli.com/node/27190#new)..
तशी तुझी जुनीच सवय
खुंट ओढायची; दाढीचे(माझ्या)
आणि पुसत बसायची (व्रण उमटलेले)
फरक एव्हढाच
मोठी झालीस तसे
चिमटीऐवजी मुठी आल्या
आणि दाढीऐवजी जटा
पण आता तर जटाही संपल्यावर
माझ्या टकलावरच
सुरूवात केलीस
ओरखडे ओढायला
आता ओरखड्यांतूनही (बचावलेले)
उरलेसुरले केस
काढता येतील
असे razor कुठून आणशील?