प्रेमाचं सोंग

Submitted by सुधाकर.. on 1 July, 2012 - 02:15

तुझ्यासाठी भोगतो दुरावं मी किती
सांग तुझ्या प्रेमात झुरावं मी किती.

सांगतेस नड तुझी रोज एक नवी
दिसामाजी दिस गेले उरावं मी किती.

आठवांत रोज तुझ्या मुरावं मी किती
जगण्यात माझ्या तरी नुरावं मी किती.

काय बये प्रेम तुझं सोंगाड्याच्या गती
तुझा हात म्हणुन फूल चुरावं मी किती.

कासवाची चाल तुला लावू कशी गती?
तुझ्यासाठी आणू आता पुरावं मी किती?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तन्त्र झकास जमले आहे

शेर छान आहेत ....मला आवडले ...मक्ता तेवढा खास नाही वाटला.
फुल =फूल... करा
मनःपूर्वक अभिनन्दन