विडंबन

सोकावलीय पत्नी अन् मी हताशलेला..!

Submitted by A M I T on 21 September, 2011 - 01:45

मुटेसरांच्या बत्तीस तारखेला आमच्या घरात हे असं घडतं..!

कालच्याच मध्यरात्री हटकून तोल गेला
अट्टल मद्यप्यांनी अवसानघात केला

जागून रात्र सारी उपयोग काय झाला?
मी शोधण्यास जाता, ढेकूण लुप्त झाला

वाढू नकोस कोबी नि ताटात तू वटाणे
भरलेय पोट अंमळ, वर ताक आंबलेला

नेमाने लक्ष्य केले हाफ चड्डीस माझ्या
टॉमीने जीव नित्य, माझा हराम केला

सदरा फाटतो का? समजून आज आले
ठोकून आज काढू, खुर्चीतल्या चुकेला

लोंढेच पाहुण्यांचे सासरहून आले
होई खिसा रिकामा, बुक्की न साखरेला

घासून भांडी झाली, पुसतोय फरशी अजूनी
घसरून का बरे मग, माझाच तोल गेला?

गुलमोहर: 

सख्खे शेजारिणी..!

Submitted by A M I T on 20 September, 2011 - 08:20

सख्खे शेजारिणी तू हसत रहा
दात पिवळे दावीत रहा

तीव्र तिरळे पाहून डोळे
भाव निराळे त्यातून कळले
डोळ्यांतूनि तव बुब्बुळ खेळे
तू नजर तुझी झुकवून पहा

सहज विकट तू हसता वळूनी
दोर अंगणी धरि त्वरे मी तोलूनी
समज मनीचा जाय उधळूनी
तू दात स्वच्छ तरी घाशीत रहा

उभी जेव्हा खिडकीत होतसे
खिडकीमागील होई दिसेनासे
स्विमिंगपुलासही पूर येतसे
नित्य कोसभर धावून पहा

मुळ गीत इथे पहा.

* * *

गुलमोहर: 

जेव्हा तुझ्या कटांना.

Submitted by A M I T on 13 September, 2011 - 02:17

जेव्हा तुझ्या कटांना उधळी हुशार नवरा
माझा न राहिलो मी हरवून हा निवारा

परात ढाल होते, हाती लाटणे घेशी
बदलून टाकते ही चेहर्‍यावरील नक्षी
दातांस मालकीच्या नाही मुखात थारा

चोरून अंग घेतो, नेम हा तरी चुकेना
ही वेळ वाचण्याची कळते तरी वळेना
देशील का कधी तू थोडा तरी सहारा ?

कुत्र्यांस ह्या गल्लीच्या का सांग त्रास होतो
लांबून भोजनाचा नुसताच वास घेतो
केव्हा या मस्तकीचा उतरेल सांग पारा ?

मुळ गीत इथे पहा.

* * *

गुलमोहर: 

(माझे लेख दान केले)

Submitted by निनाद on 9 September, 2011 - 19:55

गंगाधर मुटे यांची अस्तित्त्व दान केले ही सुंदर गझल पाहिली आणि आमच्या अस्तित्त्वाची आठवण झाली.
मुटे साहेबांची क्षमा मागून...

असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच बायकोने माझे लेख दान केले

मागेच विसरलेल्या एकाच आयडीने
अकाऊंट आज माझे, डुआयमान केले

हळवा नकोस होऊ, मित्र मला म्हणाले
संतप्त बायकोनी, जरी उपटून कान नेले

चंचूप्रवेश होता घरी हळुवार पावलांनी
तो वास येता, बायकोनी त्रस्त आज केले

वाचाळ बायकोला वैतागलो पुरेसा
सेक्रेटरीसह जाणारै, बुक विमान केले

ठेचल्या शरिराला मी चाचपतो अजूनी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

(आता ...! )

Submitted by निनाद on 8 September, 2011 - 21:07

मिलन टोपकर यांनी सुरेख गझल रचली आहे आता ...! ते पाहून आमची प्रतिभाही उसवली आणि ही प्रसवली.
अर्थातच टोपकर यांची क्षमा मागून!

पँट शर्ट टाकले शिवुनी, असता
कसे मागतो माप "तू" आता?

व्यर्थ मी कापड शिवाया दिले
बायको हसली बटने मी लावता!

ही धरा लंगोटी, उसवली
त्या हौदातून बादल्या काढाता!

मी दिली कात्रणे होती शिंप्या
दोर्‍याचा रंग कसा हा भलता!

शोधुनी थकली बायको मला
बसलो येथे जरा कापडे शोधता!

कार्टाही यावा न मज बोलवाया?
सिरियलही हुकली बोल लावता!

चहा पडतो का, कसा, शर्टावरी
नेमकी बटने ही लावता लावता!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

(तंबाखु पसरली आहे)

Submitted by निनाद on 8 September, 2011 - 01:08

प्रसादशेटच्या पसरलेल्या गझलेची क्षमा मागून...

पेटता पेटता विडी निसटली आहे
या हवेत आता तंबाखु पसरली आहे

आठवे न आता विडी कुणाची होती
अन काडी कुणाची कोठे लागली आहे

घाईने इतक्या धूर कुणी सोडला
पाहतो आपुलीच रेघ उमटली आहे

गेली विडी आता तिमिरात भोवतीच्या
सोबतीस ठिणगी असली नसली आहे

माझाच खोकतो मी... जरा खाकरतो
कोणी दिसता पुसतो.. विडी आणली आहे?

या बोटात त्याने निजतानाही बहुधा
मी दिलेली विडी अजूनी पकडली आहे.

आठवे न कितवे बंडल मागे पडले
अन मी कोणाची चंची धरली आहे?

शोधतो आतले नवे पाकिट सस्ते
सिगारेटींनी ही जागा अडवली आहे

गुलमोहर: 

पाठिंबा

Submitted by bnlele on 22 August, 2011 - 08:53

पाठिंबा

अण्णांच्या आन्दोलनाला निम्नस्तराच्या सामान्यांचा पाठिंबा सुरवाती पासून.
मध्यम वर्गीय हळू-ह्स्ळू आले थोडे भिऊन हातात पेटती मेणबत्ति घेऊन.
सुशिक्षित,विचारवंत, कलावंत त्यांच्या मागून- निश्चय ठाम करून;पंथाची भीड चेपून.
तृतिय पंथी सुद्धा आले खुल्या दिलाने - भेद सगळे विसरून.
आता राजकारणी येताहेत- निवडणुकीचे वारे ओळखून !
मग त्यांचा "पंथ" कोणचा ? सांगा विचार करून !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रगडा पॅटिस पाणीपुरीवर फरसाणही दिसले -

Submitted by विदेश on 20 August, 2011 - 14:08

(चाल: ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले-)

रगडा पॅटिस पाणीपुरीवर फरसाणही दिसले
मनीं हे ' फस्त करू ' म्हटले .. |धृ|

जाय उभी ही गाडी करुनी
पुढ्यात, भैया पाहे वळुनी -
हॉटेलवाले शांत बिचारे गल्ल्यावर सुकले .. |१|

पाणी भयंकर सुटता तोंडी
खमंग बनते शेव पापडी
रिक्षामधले प्रणयपाखरू खुषीत का हसले .. |२|

तुमची ' माया ' - माझी किमया
कृतार्थ झालो , म्हणतो भैया -
भेळकचोरीसाठी गिऱ्हाईक खोळंबुन बसले .. |३|

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तरूण आहे मात्र अजुनी..!

Submitted by A M I T on 16 August, 2011 - 07:46

तरूण आहे मात्र अजूनी, राजसा विटलास का रे?
एवढ्यातच त्या घुशीवर तू असा भाळलास का रे?

अजूनही जाहले ना नयनी मोतीबिंदूही विशाला
अजून मी पडले कुठे रे? हाय! तू चिडलास का रे?

सांग, ह्या शेजारणीच्या कारट्याला काय सांगू?
सटकले लाटणे माझे.. आणि तू सुजलास का रे?

बघ मला पुसतोच आहे संशयी समाज सारा
कामवालीच्या शीलाचा भंग तू केलास का रे?

उसळती पोटात तुझीया हरभर्‍याच्या मंद लाटा
तू पचवाया अताशा भोजने शिकलास का रे?

कपाळ फुटलेले का रे? डोळे ही लालबुंद का रे?
बोल, पिऊनी त्या गटारी तू असा पडलास का रे?

गुलमोहर: 

पहाटे पहाटे मला झोप आली.

Submitted by A M I T on 12 August, 2011 - 06:39

पहाटे पहाटे मला झोप आली
कशी ढेकणांची दिशाभूल झाली?

मलाही कळेना, तूलाही कळेना
कसे चिरडावे मुठी ढेकणांना
भिंतीस आली पुरेशी न लाली

चल झोपूया, रहा जागे कशाला?
सुरू जाहल्या हालचाली उशाला
अशी का घडावी पुन्हा रात्रपाळी

कसा वाचवू रक्त माझ्या शरीरा
रिता सर्व झाला कळाले उशिरा
असे चुंबिले तू मला भोवताली

तुला आण शाकाहारी पुर्वजांची
तुला आण बदललेल्या कुसांची
तुझ्या जिंकण्याची मला कीव आली

मुळ गीत इथे पहा.

* * *

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विडंबन