गातेस का तू घोरताना भैरवी !

Submitted by A M I T on 31 July, 2012 - 06:37

सुप्रियाताईंची क्षमा मागून...

गातेस का तू घोरताना भैरवी
हे प्रिये मज सोसवेना रात्रपाळी

माहेरी जाईन म्हणतेस, भांडताना
फोनवर तुझी मी पुसेन खुशाली

काल तू त्या उंदराला मारताना
येऊन बसले लाटणे माझ्या कपाळी

माझ्या परीने मी गायली जी गज़ल
जज म्हणाले, मज भावली कवाली

शेजारच्या ज्युलीस सहजच पाहता
नाक मुरडूनी, मला म्हणाली मवाली

दावली कितींदा तुला चिंचपोकळी
तरी म्हणते, दाखवा ना कुलू-मनाली

लाडवांना भेदताना हाल ऐसे जाहले !
हरसाल दात पाडण्या येते दिवाळी

* * *

http://kolaantudya.blogspot.in/

गुलमोहर: 

शेजारच्या ज्युलीस सहज पाहता
नाक मुरडूनी म्हणे ती मज मवाली

दावली कित्येकदा चिंचपोकळी
तरी म्हणते, दाखवा कुलू-मनाली

लाडवांना भेदताना हाल ऐसे जाहले
हरसाल दात पाडण्या येते दिवाळी

>>>>
Rofl
विडंबन सम्राट _/\_ Lol

आमट्या सगळे शेर एकदम मस्त आहेत Lol Rofl

पहिला शेर अर्थ लावायचा झाला जरासा गंडलाय.
ती जर का घोरताना भैरवी गात असेल तर रात्रपाळी बरीच नाही का?