एक काहीच्या काही विडंबन

कसे शक्य नाही वाचकाला झुकवणे?

Submitted by मंदार-जोशी on 3 July, 2012 - 02:03

मूळ रचना इथे आहे. हलके घ्यावे.
------------------------------------------------------------------------

कसे शक्य नाही वाचकाला झुकवणे?
नित्य पाडून गझला तयाला पकवणे

लपू मी कुठे अन् कसा मी कधी रे?
पहिलेच पान शक्य नाही चुकवणे

उसासे टाकून टंकली ही गझल मी
शक्य नाही अता तिरके प्रतिसाद पचवणे

कुजकट शेरे रिचवले मी मदाने
टोमण्यांचे मला तेच होते खिजवणे

गझल निर्मुनी मी कुठे अदृष्य होऊ
थांबेल का मतले-काफिये जिरवणे

गुलमोहर: 
Subscribe to RSS - एक काहीच्या काही विडंबन