विडंबन

इतनी मुष्किल नहीं किताबत (द्विभाषिक विडंबन)

Submitted by खोड_साळ on 10 June, 2012 - 08:39

प्रेरणास्रोत : निशिकांत यांची द्विभाषिक गझल "रूखी सूखी दावत ( द्विभाषिक ग़ज़ल )"

टिचभर गझला लिहिण्यासाठी रोज कशाला हवी कवायत?
खून पसीना छोडो, भैया, इतनी मुष्किल नहीं किताबत

पहा दीन वाचकांस देतो तत्परतेने गझल द्विभाषिक
सवाल मेरा आज कवी से, "गयी तुम्हारी कहाँ रिवायत?"

शेर सांगता दुसर्‍यांना आनंदित होतो कवी परंतू
कहनेवालें यहाँ हज़ारों, सुननेवाला मिले, गनीमत

दिवे लागले, अतिथी गेले, तूच उबारा माझा आता
सोनेसे जागना है बेहतर, तनहाईमें करें शरारत

मला न चिंता, न काळजीही, ज़नानखान्यामध्ये सुखी मी

गुलमोहर: 

पावसाळा सुरु झाला....

Submitted by यःकश्चित on 8 June, 2012 - 05:41

पावसाळा

( चाल : दूर देशी गेला बाबा )

-------------------------------------------------------------------------

पावसाळा सुरु झाला झाली आकाशात गर्दी
पाणी दाटले नभात तरी पाऊस येत नाही...
पावसाला सुरु झाला...

एक पावसाचा थेंब
ढगाआड लपवला
चंबू चोचीचा करूनी
चातकही वेडावला
आता पुरे रोष थेंबा कुणी म्हणतच नाही
पाणी दाटले नभात तरी पाऊस येत नाही...
पावसाला सुरु झाला...

कशासाठी कोणजाणे
जून पावसाळी म्हणती
जून संपता तरीही
भेगाळली काळी धरती
मन आशावादी ठेवून बळी आकाशात पाही
पाणी दाटले नभात तरी पाऊस येत नाही...
पावसाला सुरु झाला...

जसे नेते देती खोटी
आश्वासने मोठी मोठी

गुलमोहर: 

गाळ..

Submitted by Kiran.. on 19 May, 2012 - 23:43

कमलाकर देसले साहेबांची क्षमा मागून..
http://www.maayboli.com/node/35075

सोडला पाण्यात चाळ ;
लागला पायास गाळ ..

पेटवुनी गॅस बत्या ;
रातच्याला फुटते कपाळ

फुंकणीने फुंकताना
शेगडीला येतो न जाळ ..

नायिका साडीत तरी का ;
गाळतो पाहून लाळ ..

नासलेले दूध होते -
त्यात थोडा गूळ घाल ..

पाव तो का बेकरीचा -
खाउनी होतो विटाळ

धावतांना थांब थोडा ;
न्यूटना सिग्नल पाळ .

वाहिन्यांना सापडावी -
रोज लवंगी न्यूज माळ

Kiran..

गुलमोहर: 

बीग बीं चे अप्पा बेलवलकर स्टाईल स्वगत

Submitted by Sanjeev.B on 19 May, 2012 - 05:53

हिंदी सिनेमा चा शहंशहा म्हणुन ज्याची ख्याती आहे आणि ज्यांचा मी वर सारेच चाहते आहोत असे सर्वांचे लाडके बीग बी श्री. अमिताब बच्चन हे नटसम्राट मधील अप्पा बेलवलकरांची अजरामर भुमिका साकारणार आहेत असे ऐकण्यात आले आहे.

त्या निमीत्ताने अप्पा बेलवलकर ईस्टाईल बीग बींचे हे स्वगत.

कुणी चांगले रोल देता का हो चांगले रोल.
तेच तेच अँग्री ओल्ड मॅन चे अभिनय करुन वीट आला हो
कुणी चांगले रोल देता का हो चांगले रोल.

वय झाले आहे तरी चांगले अभिनय करु शकतो
हे तुम्हा मायबापांना पा मध्ये दाखवलंय
कुणी चांगले रोल देता का हो चांगले रोल.

म्हातारा झालो तरी ही अजुन चलनी नाणं आहे हो

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

त्या वासंतिक श्वासांची वर्दळ अजून आहे - विडंबन

Submitted by बेफ़िकीर on 10 May, 2012 - 07:19

http://www.maayboli.com/node/34875 चे विडंबन

त्या आत्यंतिक वासांची मळमळ अजून आहे!
गझलोत्सव कधीच सरला; भळभळ अजून आहे!!

रोखले मोठमोठाल्ले पर्यायी शेर परंतू
इस्लाह द्यायची त्यांची, चळवळ अजून आहे!

धुगधुगीच केवळ उरली गुलमोहरावरी यांची
पण गप्पांच्या पानांवर वळवळ अजून आहे!

आई, वडील दोघांची तकदीर चांगली नव्हती
मी त्यांना झालो याची हळहळ अजून आहे

काळजात माझ्या होते धडधड घडीघडीला;
प्रत्येक पोरगी म्हणते सारे निष्फळ आहे

ते वीर मुक्तछंदाचे गेले कुठे कळेना;
पण त्यांचे लिखाण सारे बाष्कळ अजून आहे

कर्जे फेडत हा नवरा गतप्राण जाहला पण
पत्नीचे भारीमधले पातळ अजून आहे!

गुलमोहर: 

बंडलावर बंडले

Submitted by कौतुक शिरोडकर on 3 May, 2012 - 02:56

मुळ गझल http://www.maayboli.com/node/34583
(इच्छा असल्यास) पहा. गझलकाराची 'कणभर'ही क्षमा अर्थातच मागितलेली नाही. Proud

प्यायलो ताडी तसे उठले किडे रक्तातले
आपल्या गोठ्यात जावे हेच आता चांगले

फ़ार मोठी झेप हल्ली सोसते कोठे मला
पचवली पुर्वी कितीदा बंडलावर बंडले

का अघोरी एवढी 'कर्तव्य' ही संकल्पना
या महागाईस भिडता श्वास सारे कुंथले

गुलमोहर: 

( नको देव राया , राज्यसभा पाहू )

Submitted by अमोल केळकर on 27 April, 2012 - 04:52

आमच्या देवाला , राज्यसभेवर न जाण्यासाठी ही प्रेमळ विनंती Happy
---------------------------------------------------------------------------

नको देव राया , राज्यसभा पाहू
खेळ हा सर्वथा , जाऊ पाहे !

विश्वकप पुढचं, बाकी आहे येणे
तूला काय जाहले, अरे देवा !

तुजविण कोण न दिसे संघातुनी !
पळू लागे धोनी, घरीबाई !

गुलमोहर: 

जास्त कटकटीची पोकळ वांगी

Submitted by बेफ़िकीर on 24 April, 2012 - 16:12

लागणारा वेळ:

खायला की करायला?

करायला दोन तास, वांगी फुटून खाऊ शकण्यास तीन तास! (प्रत्येकाच्या शारीर सामर्थ्यानुसार सापेक्ष) (ए हसू नका हं) (संपे विपू बघ)

लागणारे जिन्नस:

गुलमोहर: 

कविमती

Submitted by स्मितू on 21 April, 2012 - 04:10

आमचे प्रेरणा स्थान http://www.maayboli.com/node/32251
कविमती...

कविंचे आपले बरं असतं
सुचले शब्द की कविता करुन मोकळे होतात..

मग मी ही ठरवलं
आपण ही कविता करायची
दु:ख, वेदना, राग, संताप
सगळ्या सगळ्याचा रस एकाच कवितेत घुसडायचा!

पण एखादा चांगला कवि असतोच ना
तो नाही प्रतिसाद देत माझ्या कवितेवर
झुरत राहतो आपला निर्व्याज पणे

गुलमोहर: 

नामंजूर! (विडंबन)

Submitted by प्रसाद पासे on 19 April, 2012 - 05:47

संदीप खरेंची जाहीर माफी मागून

समस्त विरहात असणाऱ्या मुलांना

सतत मुलींचा मूड जपणे - नामंजूर!
अन् त्यांची मनधरणी करणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा माझ्या जगण्याची
अन् त्यांच्या बोटावर डुलणे - नामंजूर!

मला कोणाची साथ नको अन् कौल नको
मला कोठल्या मुलीचे ते प्रेम नको
नको मला, तिचे शाप अन् सदिच्छा
प्रेमाचा तो खेळ मांडणे - नामंजूर!

आयुष्याचा विनाश माझ्या! कारण ती!
तिच्याकडे हृदय ठेवले तारण मी!
सुंदरतेवर झाले जगणे चक्काचूर
अन् मुलींचे थिटे बहाणे - नामंजूर!

रुसवे - फ़ुगवे... भांडणतंटे... लाख कळा
तिच्यासाठी सहन केला त्रास सगळा
चोख उत्तर तिथेच द्यावे अन् बोलावे

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विडंबन