विडंबन

श्रावण

Submitted by किश्या on 5 November, 2011 - 03:09

ओरीजन कवीता http://www.maayboli.com/node/30334

माठाच्या कपारीत खेकडे होते
टाक्यात कोंडलेले मासे होते

कुणी जाणले ना मम वेदनांना
कशाला श्रावण मासे आले होते?

झिंग्यांनी बहरले आयुष्य माझे
पापलेट मात्र आभास होते

ग्रहण लागले जे खाण्यास माझ्या
तेही सखे गं श्रावनात होते!

------------------------ खोकु

गुलमोहर: 

चपटीसत्व

Submitted by किश्या on 21 October, 2011 - 03:23

प्रथमत: मी क्षमा मागतो ओरीजन कविताकाराची .. मला त्याचा भावना दुखवायच्या नाहीत..
सहज सुचलं म्हणुन मी हे विडंबन केलं.....
ओरीजन कवीता तुम्ही बघा इथे फक्त त्याचे विडंबण वाचा

आज रात्री जेव्हा
तु चपटी बघशील
तेव्हा माझी आठवण काढ
नाही रे
मला प्यायची म्हणुन नाही
तर अश्या साठी
कि जसा तु असंख्य बेवड्यांमधे
असुनही एकलाच
तसाच सार्‍यांत असलेला मीही

तुझ्याकडुन उसन्या घेतलेल्या
अमर्याद खंब्याच्या साथीने
जगतो आहे रे
माझ्या चपटीची मालकी
तुझ्याकडे सोपवून
निर्धास्त

तुझी सिगरेट
आसमंतात पसरवते आहे
लांबूनच धुराडे काढुन
गुडगुडे काढनार्‍या
त्या हुक्या सारखी

तरीही...

गुलमोहर: 

आणले पापलेट बोंबिल......

Submitted by विभाग्रज on 16 October, 2011 - 08:07

कविवर्य निशिकांत यांची"आणले तारे नभीचे" ही गझल वाचताना डोक्यात घुसलेली कल्पना................
निशिकांत यांची प्रामाणिकपणे क्षमा मागुन लिहित आहे.

आणले पापलेट बोंबिल , ये घरी जेवून जा
आमटीतील शिंपल्याना भसाभसा चोखून खा !!

तू मला औसानघातकी का म्हणावे नाकळे
गत रविवारी नच मिळाले,हा माझा रे दोष का!!

तूला मासे खावू घालण्या पैसे खर्चावे किती
कर्ज काढूनी आणितो रे, खायला तू येत जा !!

पापलेट नासके आहे, बोंबिल नाहि भाजले
असे म्हणुनी सर्व काही फस्त तू करित जा !!

कुठून हा राक्षस येतो, बायको माझी भांडते
पोरे बापडी पाहती रे शिव्याशाप खाऊन जा!!

आज खाल्ले पुन्हा नाही हे मनी जाणून घे

गुलमोहर: 

बायको घरात जंग छेडते खरी.

Submitted by A M I T on 11 October, 2011 - 05:06

(चाल : आज गोकुळात रंग खेळतो हरी )

बायको घरात जंग छेडते खरी
सैनिका जरा जपून जा तुझ्या घरी !

ऑफीसातूनी येता चहा टाकते
घोट घेता त्याचा, विष बरे वाटते
बद्धकोष्ट नाही तरी, उगाच छळते
कॅन्टीनातला चहा बेश्ट त्यापरी !

सुप बनवून असा डाव साधला
पाटणकरांचा काढा नसे वेगळा
वाईट करून तोंड, गप्प ढोसला
सोस तू हिला, प्राण आहे तोवरी !

काल शेजारिणीला काय पाहीले !
खिडकीस आज नवे पडदे लागले
लाटण्याने बिनचुक कपाळ भेदले
सुजले कपाळ, लेप लाव त्यावरी !

बायको घरात जंग छेडते खरी
सैनिका जरा जपून जा तुझ्या घरी !

गुलमोहर: 

तूझं झिंगणं

Submitted by वर्षा_म on 5 October, 2011 - 01:01

स्वतःची क्षमा मागुन Proud
http://www.maayboli.com/node/29417

=================================

आपलं भांडण मिटवायला
तू आलास....कालचं!

अगदी काल आणि परवा,
ज्यावरचे विचार मी
मनातुन काढुन दिले,
तेच पुन्हा पांघरून...

पटकन तोंड दाबुन
उभा झालास पाठमोरा,
पण दारुचा उग्र वास,
आजही आलाच... तुझ्या तोंडातून
भपकन....

गुलमोहर: 

आम्ही दोघं लोळत पडलो होतो.....(नव्याने)

Submitted by एम्बी on 4 October, 2011 - 01:54

मूळ कवयित्री घुमा यांची माफी मागून

मूळ कलाकृती:
http://www.maayboli.com/node/29454

विडंबनः

आम्ही दोघ लोळत पडलो होतो गटारात,
डोक्याला डोक टेकवुन, हातात हात घेऊन
ऐकत होतो एकमेकांच्या हृदयाचे ठोके.
जणू त्याचे ठोके चेष्टेने मला म्हणत होते,
"जिन चांगलीच चढलेली दिसतेय तुला. चांगलीच तर्र झालीयेस!"
आणि माझे ठोके काळजीनी म्हणत होते,
"मला तरी एक कारण आहे. तू का न पिता झिंगला आहेस?"
त्यानी ते खरेच ऐकले की काय? म्हणाला,
"बिल भरतो आहे तुझ्या दारवांचे."
किती गंमत ना?
मी पडले त्याने पाजलेली जिन पिऊन
आणि तो पडला माझे बिल पाहून.
मी आणि माझा झिंगलेला क्षण मग

गुलमोहर: 

दिवसास माझे.....

Submitted by विशाल कुलकर्णी on 4 October, 2011 - 00:00

आमची प्रेरणा : दिवसास माझे

दिवसास माझे किती हे दिलासे
संध्याकाळ माझी करते खुलासे
तुझा विरह का हा दाटून येतो
होतात सिगरेटचे, 'कश' माझे उसासे

तशी फारशी ही नसे आर्तता
तू जाता उदरी, सरते व्यर्थता
दिव्यांचे 'बार'च्या होई चांदणे
तूझा स्पर्श ओठा, तिच सार्थता

घेऊन फिरतो सिगरेटी कुणाच्या
बहरतात गात्री आठवा कधींच्या
हलकेच ग्लासात तिज ओततो मी
चुकवुन नजरा अधाशी सोबत्यांच्या

थेंब पाण्याचे घसा जाळतात
अखेरचे घोट का मला टाळतात?
हरवून जाते कधी शुद्ध माझी,
इशारे साकिचे तसेही पाळतात

आता सांज होईल गडे 'चांदणी'

गुलमोहर: 

माझं भुंकणं!!

Submitted by खारीक on 3 October, 2011 - 07:44

बागीची क्षमा मागून.. Happy
मूळ कविता इथे आहे - http://www.maayboli.com/node/29384

आज वहाण मागायला
तू दारी आलास.... बाटाचं!

अगदी काल-परवा,
जी वहाण मी चावून
चघळून फेकून दिली,
तिचीच जोड एका पायात घालून....

जोरात कर्कश भुंकून,
उभा होतो तुला सामोरा,
भुंकण्याच्या आवाजाचा
प्रतिध्वनीही आला... चाळीच्या कानाकोपर्‍यातून
घुमत...

तू रस्त्यावर एकाच चपलेत उभा असल्याची जाणीव
होत राहिली कितीतरी वेळ....

पोटातून नाकापर्यंत आलीच
ढेकर तुझ्या वहाणेची,
मनमुराद रेंगाळू दिली चव जिभेवर....

आज मी भुंकलो होतो....
पण;
गळणार्‍या लाळेचं कारण मात्र

अनाकलनीयच!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माझं शिंकणं?

Submitted by वर्षा_म on 29 September, 2011 - 08:16

बागेश्रीची क्षमा मागुन Happy
http://www.maayboli.com/node/29384

=================================

तुझा रुमाल मागायला
तू आलास....कालचं!

अगदी काल आणि परवा,
ज्यावरची अस्वच्छता मी
धूउन टाकून दिली,
तोच पुन्हा पांघरून...

पटकन नाक दाबुन
उभी झाले पाठमोरी,
पण शिंकल्याचा आवाज
आजही झालाच... कानाच्या पडद्यातून
घुमत....

गुलमोहर: 

जाहले बघ लग्न जेव्हा..!

Submitted by A M I T on 29 September, 2011 - 08:04

सुप्रियाताईंनी आपल्या लेखणीला बोल लावलेले पाहून आम्ही आमच्या दू:खास आवरू शकलो नाही.

मीच माझ्या बायकोला फोन होते लावले
पण तिने या याचकाचे एक नाही ऐकले

वाढदिवसाला तुझ्या मी, आणली साडी तरी
सांगते शेजारिणीला काय नव्हते आणले!

चादरीत शोधताना कैक राती जागल्या
बघ तरीही ढेकणाला ठार नव्हते मारले.

फोडणी देवून बघ तू, डाळ जेव्हा रांधली
चिरताना आज वांगी बोट माझे कापले

त्या तुझ्या डोळ्यांत लाल, रोखूनी मी पाहता
कोथळा काढील माझा आज ऐसे वाटले

जाहले बघ लग्न जेव्हा, हाय ती अशुभ घडी!
मीच माझ्या पायांवर दगड तेव्हा मारले

* * *

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विडंबन