कसे शक्य नाही नभाला झुकवणे?

Submitted by कु. कमला सोनटक्के on 2 July, 2012 - 13:20

कसे शक्य नाही नभाला झुकवणे?
नशीबास निधड्या मनाने झुलवणे

लपू मी कुठे अन कसा मी कधी रे?
मला शक्य नाही स्वतःला लपवणे

उसासे गिळुन काढली जिंदगी मी
अता शक्य नाही सुखाला पचवणे

सुरेला रिचवले किती मी मदाने
सुरेचे मला तेच होते रिचवणे

जगा निर्मुनी तो कुठे गप्प झाला
खुदाई म्हणवते तयाचे फसवणे

गुलमोहर: 

छान

छान आहे.
शीर्षक शक्यतो छोटं असू द्या. "शक्य नाही" वगैरे... ( वै. मत आहे. गझल या प्रकाराला शीर्षक कसं द्यावं हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे Happy )

उसासे गिळुन काढली जिंदगी मी
अता शक्य नाही सुखाला पचवणे>>>

वा

(मतल्यात झुकवणे, तुकवणे आल्यानंतर इतर काफियेही तसे असावे लागतात असे गझलतंत्र म्हणते) Happy

काफिया हा एक पूर्ण शब्द असल्यामुळे त्यातील काही भाग 'काफिया' म्हणून घेतला जात नाही Happy

ओके.

कसे शक्य नाही नभाला झुकवणे?
नशीबास निधड्या मनाने तुकवणे

लपू मी कुठे अन कसा मी कधी रे?
मला शक्य नाही स्वतःला मुरवणे

उसासे गिळुन काढली जिंदगी मी
अता शक्य नाही सुखाला खुलवणे

सुरेला रिचवले किती मी मदाने
सुरेचे मला तेच होते झुलवणे

जगा निर्मुनी तो कुठे गप्प झाला
खुदाई म्हणवते तयाचे भुलवणे

हे चालेल का?

नशीबास निधड्या मनाने झुलवणे

असे केले की होईल

काय होईल? कलले नाही... झुकवणे चालते, तुकवणे का नाही? ( जरा डिटेल सांगा प्लीज)

झुकवणे, तुकवणे, सुकवणे, हुकवणे असे काफिये लागतील

चालेल.

पण मग खयालच बदलावे लागती.ल

मस्त खयाल आहेत सगळेच.

भूषणदांच्या सूचना अगदी पटल्या. (क्षमा करा. मला ते 'जी' लावणं फारसं आवडत नाही.)

आणि 'दा' बंगाली वाटते, म्हणून मी दिनेशदांना दिनेशराव नाहीतर दिनेश म्हणतो

बाकी मला बेफी म्हणालात तरी चालेल

Proud

कु. कमळाक्का :
झुकवणे, मुरवणे , खुलवणे यात अ ही अलामत अपेक्षित असल्यास ही कवाफी बिनचूकच आहे..
यासाठी बेफीजी असे सुचवतायत की मतल्यातच (गझलेची जमीन)...असे करा म्हणून,
झुकवणे तुकवणे असे केलेत तर उ ही अलामत ठरेल.... मग अख्ख्या गझलेत ती पाळावी लागेलच

असो
गझल छान आहे .आवडली

__________

रणजित :बरोबरय तुझं ........मलाही तेच वाटतं अरे , म्हणूनच मी ही सरच म्हणतो नेहमी ...

छान