म्हणतात लोक काही, लिहितोस छान 'अमित'

Submitted by A M I T on 23 July, 2012 - 07:37

कळपातले माणूस नाहिद नालबंद यांची जाहीर माफी मागून

काहीतरी आहेच ! ही रात्र जागतो मी
चादरीत पांघरूणाच्या ढेकूण शोधतो मी

तोंडात पान माझ्या, गुटखा असो वा खैनी
सुचना असेल जेथे, तेथेच थुंकतो मी

नाही अता भरोसा, पोटाच्या सुटण्याचा
शर्टात झाकताना, पॅन्टीत कोंबतो मी

मी सांगतो बॉसला, आहे खरेखुरे जे
टॉमी असतो दारी, उशिरा पोचतो मी

परिणाम होत नाही, पत्नीवरी कशाचा
तिच्यासवे का मग, उगाच भांडतो मी ?

रस्त्यावरी कधीचा फिरतो उदासवाणा
दिसता कुणी तरूणी, आपसुक थांबतो मी

म्हणतात लोक काही, लिहितोस छान 'अमित'
लिंका विपूत जाऊनी, बिनधास्त डकवतो मी

* * *

http://kolaantudya.blogspot.in/

गुलमोहर: 

तोंडात पान माझ्या, गुटखा असो वा खैनी
सुचना असेल जेथे, तेथेच थुंकतो मी...............छीईईईईए

अम्या , खरे सांगाय्चे तर मजा नाही आली Happy

अमितजी,सुंदर गझल आहे (गझल>>?????) !! आवडली! खयाल सर्व छान आहेत!...

पण काही ठिकाणी अभिव्यक्ती अजून जोरकस होवू शकली असती.

खालील मुद्दा सुचवावासा वाटतो...........

'पॅन्टी'त या शब्दामुळे तिसर्‍या शेराचा अर्थ चित्र विचित्र व अत्यन्त अश्लील घेतला जाण्याची शक्यता आहे
म्हणून मी आपला हा शेर (शेर >>???) मी असा लिहून/वाचून पाहिला ...................

नाही अता भरोसा, पोटाच्या सुटण्याचा
शर्टात झाकताना, चड्डीत कोंबतो मी

टीप: आपली प्रांजळ मते जरूर कळवावीत, वाचायला आवडतील!

महाराष्ट्रातील एकमेव 'पर्यायीगझल' गुरु- प्रा. स.दे . यांचा ,
एकमेव एकलव्य (पर्यायी अर्जुन !!)
...........वैवकु
____________________
अमित खूप दिवसान्नी..........

असो
खूप मज्जा आली
Biggrin Biggrin Biggrin