गझल विडंबन

एवढे मी टंकले की, वाचणेही शक्य नाही

Submitted by शायर पैलवान on 9 January, 2013 - 01:06

गझल विडंबन
----------------------------------------------------------------------------

एवढे मी टंकले की, वाचणेही शक्य नाही!
बेगडी आंतरजालावरी ह्या मज थांबणेही शक्य नाही!!

वैवकुंनी आजवर त्याच्या परीने खूप केले....
आज पर्यायी परंतू शेर देणेही शक्य नाही!

एकटे गाठून मजला घेरले सा-या वाचकांनी....
या बिचार्‍यांना तसे समजावणेही शक्य नाही!

जे तिन्हीत्रीकाळ असती चोवीशीत वेढलेले;
हुंदके ललितातले त्यांचे टाळणेही शक्य नाही!

वाचक नाहीत, मते पिंकणारे थुंकबंधू!
संकेतस्थळाबाहेर त्यांना गाठणेही शक्य नाही!!

गाणी

Submitted by शायर पैलवान on 5 December, 2012 - 05:24

गझल विडंबनाचा तिसरा प्रयत्न
---------------------------------------------

अशी अचानक तंबोर्‍यासह आली ऐकू गाणी
थरथरली धरणी मानला खेद ऐकून ती गाणी

घाबरलेले कान फाटले शिरली त्यात गाणी
थांबायाचे नाव घेत नाही शेजार्‍याची गाणी

तुझ्या शिवारी वादकांचा ताफा आसुसलेला
अखंड बेसूर सिंचन करून गेली तुझी गाणी

बाहेर पडताच शेजारी ओळख दाखवेना
सबंध गावास चालली त्रासून तुझी गाणी

मुशायर्‍यात तुम्हाला नाही कधीच नाही भेटायचे
आणखी अत्याचार नको पुरेत तुमची पेटी आणिक् गाणी

विषय: 

अभ्यास केला पाहिजे?

Submitted by शायर पैलवान on 26 November, 2012 - 05:11

गझल विडंबनाचा दुसरा प्रयत्न
----------------------------------------------------------------------------------------------------------

आता युक्तीवाद मी हमखास केला पाहिजे
आरोपात राहून शांत, मी त्रास काढला पाहिजे

फ़ार नाही भावलेली ही तुझी रचना जरी
खोटा चेहरा हसरा तरी गप्पांत केला पाहिजे

आजवर नाही वाचलेले हे असले लेखन जरी
पिंक टाकण्या मताची का अभ्यास केला पाहिजे?

इतरांचे यश पाहूनी पोटात माझ्या का दुखे?
अशांत पित्ताने मला काढा घेतला पाहिजे

बास कर ही दीर्घ ललिते भासते व्याधी जशी
निमिषार्धात गझलेचा रतीब घातला पाहिजे

बुरख्याआडचे वाढले वार हल्ली

Submitted by शायर पैलवान on 7 November, 2012 - 09:14

गझल विडंबनाचा हा पहिलाच प्रयत्न
----------------------------------------------

ना राहिला मोहब्बत-प्यार हल्ली
बुरख्याआडचे वाढले वार हल्ली

होती जयांची कधी मुक्त ओळख
त्यांच्यावरच करतो मी वार हल्ली

बरकतीसाठी ऊर माझा फाटतो
बघवत नाही छंदिष्ट भरभराट हल्ली

सांगण्या शहाणपणा ना कुणी उरला
कानामधे ओतती सारे विष हल्ली

चाललो लाऊन घेण्या फास मी
हाय! दोर मिळेना कुठे अस्सल हल्ली

दिल्लीत ना विचारे आज कुणी मजला
गल्ली गाजवतो शायर पैलवान हल्ली

फटके अफाट होते

Submitted by Kiran.. on 25 June, 2012 - 23:08

प्रा. देवपूरकर सर, माफ करा.. राहवलं नाही. एका विबासित पतीची करुण कथा !
आमची प्रेरणा http://www.maayboli.com/node/35934

का वाटते पतीला, पत्नी जुनाट होते!
स्टेफनित गुंतले की, जगणे सुसाट होते!!

घन केशकुंतलांनी, नव-यास हे शिकवले....
पाऊल वाकडे कर, पाऊलवाट होते!

असते किती जणांना, अवगत कला जिन्याची ?
अंगास वस्त्र त्यांचे, जगणे विराट होते!

तेव्हां उभे दुतर्फा, मेहुणे खवळलेले ;
ओठांस ओठ होते, तेही अचाट होते!

यावे न आता कोणी जन्मास माणसाच्या!
कण्हतो जिथे जिथे तो, दुखरीच पाठ होते!!

कोड्यासमान माझे सासर खाष्ट होते;
मोजून आठ होते, फटके अफाट होते!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

क्लब

Submitted by मामी on 25 October, 2010 - 12:52

आधीच सांगू इच्छिते की, मी ना तळ्यात ना मळ्यात. कुठलीही बाजू न घेऊ शकणार्‍या काही limited edition अभाग्यांपैकी मी आहे. 'मी स्टँड घेतला' याचा अर्थ मी कुंपणावर बसले होते ती उभी राहिले असा होतो.

खालील गझलगुच्छ हा उच्च आहे की तुच्छ आहे हे तुम्ही कुंपणाच्या कोणत्या बाजूकडून पाहता यावर सापेक्षी अवलंबून आहे. माझ्यामते माझ्या प्रतिभाश्वानाचे ते पुच्छ आहे. मला खरंतर कवितेतले जामच काही कळत नाही, पण विडंबन म्हटले की डोक्यात शब्द टणाटण उडायला लागतात. हे सुध्दा कधीकधीच होते. केस अजून अगदिच हाताबाहेर गेली नाहीये. Happy

(सुरेश भटांची क्षमा मागून)

क्लबातल्या क्लबात मी तुझ्यासमीप राहते

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गझल विडंबन