(अजून किती दिवस पैसे देऊन टाकाऊ धागे बघणार?)

Submitted by मुरारी on 13 July, 2012 - 05:08

नमस्कार दोस्तांनो,

कधीतरी, कुठेतरी, कोणत्यातरी, अशाच विषयाची वाचली - ऐकलेली चर्चा माबोवर का होऊ नये म्हणून हा धागा सूरू करतो आहे..

तर मुद्दा असा आहे की,

आपण इंटरनेट चे दरमहा बील स्वतःच्या कमाईने भरतो (अपवाद क्षम्य)
बील याचा अर्थच असा आहे की आपण उपभोगलेल्या सुविधेची किंमत अदा करणे.

अपेक्षा निव्वळ मनोरंजनाची(?) असते मात्र कुठल्याही दिवशी उत्तम लेखांइतकेच अनेक फालतू धागे बघणॅ आपल्याला बंधन कारक बनते..

खरे तर बेफाम सुटलेले गझलाकार, नव कवी ,उगाच स्वतःच्या कंपूच्या मुलाखती, उठसूट ब्रेकिंग न्यूस च्या लिंक्स, वांझोट्या चर्चा, भावनिक लेखांच्या (मला पुणे आवडत नाही -अरुणा, मी का फिकीर करावी?-करुणा, पाऊस पडला का? -वरुणा .. छाप ) जिलब्या (सभासद स्वखर्चाने टायपत असला तरी ते पाहण्याचे अनौपचारीक बंधन इतर सभासदांवर का यावे?

यात लेखकाऐवजी वाचकाचा वेळ खर्ची का पडावा?

हितगुज या नावाखाली अनावश्यक वाचन माथी मारणे आपण का स्विकारतो आहोत...
हे म्हणजे न खाल्लेल्या जेवणाचे बील भरल्या सारखे नाही आहे का ?
जगात सगळीकडे अशीच व्यवस्था आहे का?

याला काही पर्याय आहे की नाही?

........... आपली मते कदाचित भविष्याची क्रांतीकारक पाऊले असू शकतात.

--राधेशाम

गुलमोहर: 

__/\__

>>>>मला पुणे आवडत नाही -अरुणा, मी का फिकीर करावी?-करुणा, पाऊस पडला का? -वरुणा .. छाप ) जिलब्या>>>>>

अशक्य मेलोय हसून
अरारारा बाजार पार उठीव्लात कि दाद्यानू

>>आपली चित्रपट परिक्षणं वाचून माझं उगाच वेगळं मत बनलं होतं.
जेमतेम दीड दोन परीक्षणं लिहिली आहेत हो मी..
वेगळ मत म्हणजे नक्की.. काय मत होतं ?
आणि आता काय झालंय? Proud

प्रसन्न, दर दहा पोष्टींमागे सगळ्यांचे आभार माना. मग सगळ्यांचे आभार मानल्याबद्दल तुमचे आभार मानतो Proud

हॅहॅहॅ... मस्तच हो प्रसन्न अ, जमलय विडंबन पण विषय तसा मराठी आंतरजालावर जुना असल्याने तुम्ही काही प्रश्न विचारलेत, त्यांची प्रामाणिपणे उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो..

>>हितगुज या नावाखाली अनावश्यक वाचन माथी मारणे आपण का स्विकारतो आहोत...
पर्याय नाही हो.. सरकार च्या नावाखाली आपण पांढरा हत्ती नाही का पाळत आहोत, स्वतः उपाशी राहुन. तिथे काही पर्याय नाही मग इथे कुठुन येणार? लोकशाही यालाच म्हणत असावेत Wink

>>हे म्हणजे न खाल्लेल्या जेवणाचे बील भरल्या सारखे नाही आहे का ?
नक्कीच आहे बुवा.. आता खानावळीत गेल्यावर ताटात जे वाढलय ते घास तोंडात गेला की मगच कळतं, भाजीत केस आलाय आणि चटणीत मीठ जास्त झालंय.. कधी कधी भातात खडा लागतो.. मग काय जे आवडलय तेच जास्त खाऊन बाकीचं पानात तसंच पडू देतो की नाही..

जगात सगळीकडे अशीच व्यवस्था आहे का?
कदाचित अशीच असावी. वर्गात ढं मुलं असली तरच हुशारांच कौतुक होणार, भिकार चित्रपट येत राहिले तरच एखादा ऑस्कर/लोकांच प्रेम मिळवणार.

याला काही पर्याय आहे की नाही?
बरेच पर्याय आहेत.
१. डोक्याला शॉट करुन न घेणे
२. कविता, गझला, लेख वाचाय्ला मिळणार आहे अशी अपेक्षा न धरता काहीतरी टुकार वाचायला मिळणार आहे असे समजून धागा उघडावा, म्हणजे खरंच टुकार वाटलं तर त्रास होणार नाही आणि चांगलं निघालं तर आनंद दुप्प्ट होईल.
३. थोडे दिवस आंतरजालापासून दूर रहाणे (फार अवघड आहे) Wink
४. आवडत्या लेखकांचेच लेख/धागे उघडणे (यात थोडे नुकसान होऊ शकते)

आपला,
मराठमोळा