कविता

प्रिय मित्रा!

Submitted by नीधप on 13 April, 2011 - 22:08

ही कविताही जुनीच आहे. क्षिप्राच्या ब्लॉगवरच्या तिच्या प्रिय या कवितेतल्या
तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे
मी कधी फुशारुन गेले नाही

या पहिल्या दोन ओळींच्यावरून सुचलेली..

-----------------------------------------
तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे
मी कधी फुशारुन गेले नाही
मी मोहरले नक्कीच

हे तात्कालिकच आहे
अशी समजूत घातली स्वतःची
तगमग शांतवण्यासाठी
'का होईना! ओढ तर आहे'
अशीही समजूत घातली मनाची
सुखावून जाण्यासाठी..

या तात्कालिक प्रेमाआड नक्की काय आहे
मी कधीच पाह्यलं नाही.
गरज वाटली नाही
भीतीही वाटली.

प्रिय मित्रा,
मला सांग रे

गुलमोहर: 

हल्ली नसतात रात्री न दिवसही पहिल्यासारखे

Submitted by निनाव on 13 April, 2011 - 17:32

बेफिकिर जी आणिक इतर तज्ञ मंडळी: ही गझल आहे कि नाही, हे मी तुम्हा वर सोडतो! मी केवळ एक प्रयत्न करतो आहे. सध्या कविता मधे प्रकाशित करतो आहे. मार्गदर्शन लाभावे - विनंती.
***

हल्ली नसतात रात्री न दिवसही पहिल्यासारखे
पाहे वाट मज साठी न जागे कुणी पहिल्यासारखे

वाटा ओसाड घरे उजाड न बंध पहिल्यासारखे
मने गार न काळजी फार कुणाची पहिल्यासारखे

वाळवतो आहे दुख्ख घरातल्या घरात न पहिल्यासारखे
आहेच कोठे आता अंगणी झाड लिंबाचे पहिल्यासारखे

मयखान्यातही हल्ली असते गर्दी न पहिल्यासारखे
लपुनच पितात लोक, न दर्द त्यांचे पहिल्यासारखे

लिहितो आहे मी आज तर नाव ठेवतात पहिल्यासारखे

गुलमोहर: 

सावली

Submitted by कौतुक शिरोडकर on 13 April, 2011 - 06:08

आधीच एकटेपणाची भीती...
त्यात 'गर्द अंधारात सावलीसुद्धा सोबत सोडते'
म्हणूनच..
प्रकाशाचा ध्यास घेतला.
असंख्य प्रकाशझोतात
बहुविध सावल्यांनी भोवताली फेर धरला,
सगळ्या सावल्या माझ्याच असूनही
एकही माझी वाटेना.
मग प्रकाशाची प्रखरता वाढवत गेलो....
...
....
आता मी पुन्हा
'माझ्या सावली'च्या शोधात आहे.

गुलमोहर: 

खुळ्या भिंगोर्‍या

Submitted by नीधप on 12 April, 2011 - 23:08

sh87_0_0.jpg

चळ लागल्या झुळझुळ रेषा
त्यावरून नजर फिरवताना
मी चित्रमित्राला विचारलं
'सांग की कुठून आणल्यास ह्या वाटा
एकातएक मिसळणार्‍या
आणि एकातून एक फुटणार्‍या?
सांग ना कुठून आणलास
लख्ख पिवळा रंग
आणि पिवळट पाचोळा?'

उत्तरादाखल तो स्वचित्रातून
केवळ रोखून बघत राह्यला.
आणि चित्रागणिक अजूनच
विस्कटत, उसवत, पेटत गेला.
त्याचे लाल केस भुरूभुरू जळत होते
नजरेमधे ठिणग्या होत्या
आणि उजव्या बाजूला कानाच्या जागी जखम होती.

मग वाटत राह्यलं
आपल्याला त्याच्या वाटा कळल्यात,
पिवळट जाणीवांचा उगम हातीच आलाय..

गुलमोहर: 

अशीच एक सायंकाळ !

Submitted by किंकर on 12 April, 2011 - 21:06

एक शहर थोडे वाढलेले. थोडे पसरलेले. नात्याचे गुंते फुललेले,
कधी नदी काठी,कधी किल्यापाठी,
कधी बाईक वरील लाँग राईड,
कधी गावाबाहेरील रस्त्यावरून चालतच पकडलेली एक साइड.
अशाच जातात अनेक संध्याकाळी.
माहित नसते पुढे काय लिहलेय भाळी.
त्या दिवशी एका संध्याकाळी, हवेत असाच थोडा गारवा थोडी शिरशिरी.
रोजचा रस्ता रोजची वाट,
पण तिने माळली नाही, नेत्र् कटाक्षातून ओसंडणारी हसरी वहिवाट.
तिला विचारले काय झाले?तर म्हणते सारे संपले.....
खूप बोललो, मनातून हललो. पण उत्तरादाखल मौनच बोलले.
ती संध्याकाळ खूपच लांबली. जणू उन्हे परतायची थांबली.
मला आठवल्या सगळ्याच संध्याकाळी
माहित नव्हते हेच आहे कपाळी.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

फाटलेलं झुंबर

Submitted by सकाळ on 12 April, 2011 - 13:58

दिसलं आहे का तुम्हाला कधी फाटलेलं झुंबर ?
मला दिसलं होतं एकदा - काळजाचा ठोका चुकवून तेंव्हा निघून गेलं .
पण आता लटकलेलं असतं अधांतरी माझ्या मनावर
तेच फाटलेलं झुंबर ..

तुम्हालाही नक्की दिसलं असेल कधी ते फाटलेलं झुंबर
कधी आईने टाकलेल्या बाळाची बातमी वाचून
कधी आई -बापाने केलेला पोटच्या गोळ्याचा खून वाचून
कधी आईने मुलांसह केलेली आत्महत्या वाचून

कधी माणुस म्हणून जन्माला आल्याची खरीखुरी लाज वाटली आहे का ?
कधी पाशवी बातम्या वाचून देवाची, मानवजातीतर्फे माफी मागितली आहे का ?

गुलमोहर: 

कातिल डोळे...!

Submitted by चैतन्य दीक्षित on 12 April, 2011 - 09:46

पुण्यातल्या ओढणी बांधलेल्या अनेक अतिरेक्यांकडून घायाळ झाल्यानंतर सुचलेली कविता!!

कातिल डोळे शिकार होते हृदयांची
मुखचंद्रावर खुले पौर्णिमा विजयाची !

डोळे बाणच,धनुष्य आणिक भुवयांचे
रुते जिव्हारी टोक अनोख्या किमयांचे !

शिकार कसली? सावज म्हणते अतृप्त मी
निघेच ना का भात्यामधुनी शर हुकुमी?

असे म्हणेतो रुते कटाक्षाचा बाणऽ
सावज हरते,तृप्त जिंकते तरीपणऽ! (अवग्रह वाचनाच्या सोयीसाठीचे आहेत)

युद्ध संपते,निरोप होतो वळणांचा
जखमी सावज हिशेब करते बाणांचा

नंतर होते सुरू तयारी मलमांची,
पुन्हा लढाई हीच दवा त्या जखमांची!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अमर्याद प्रदेशात

Submitted by छाया देसाई on 12 April, 2011 - 07:44

धीराने प्राप्त परीस्थितीशी
नीमूट झुंज देणारा तू
चंचल अधीर वयात
उमजला असतास तर
माझ्या स्वप्नांचे पदर
तुझ्या पुढ्यात उलगडले नसते

सगळ्या स्वप्नाना तुझ्यासाठी
मूठमाती देण्याची ताकद
तेव्हाही होती अन आताही आहे
दोघांच अशरीरी नात
पण ते न लादायचा तुझा अट्टाहास
माझ्यावर शेवटी लादलासच

आज सांजवेळी मला अन मलाच घेरून
तू जेव्हा बावरतोस तेव्हा मी अजूनही
लाख चैतन्य एकत्रीत करत असते
फक्त तुला अन तुलाच घेरण्यासाठी
अन तू मात्र तसाच माझी मान मर्यादा जपत
अमर्याद प्रदेशात

गुलमोहर: 

............ न्याय तुमचा खास आहे

Submitted by डॉ अशोक on 12 April, 2011 - 05:08

............ न्याय तुमचा खास आहे

तक्रार तुमची, पोलीस तुम्ही, न्याय तुमचा खास आहे
सीता असो वा द्रौपदी, नशिबात अमुच्या वनवास आहे.

आले किती, गेले किती, यात सारे गर्क झाले
बागेतल्या फुलांनाही, येथे गणिताचा तास आहे.

कोण वेडा, कोण नाही, वेडेच ठरविती सर्व काही
लाट आहे बारकी पण, मज सुनामीचा भास आहे.

भाट यांचे गाऊन गेले, ढोल यांचे बडवून झाले
बंद करतो कान माझा, इतुकाच मजला त्रास आहे.

पेरले मी, राखले मी. चातकासम थांबलो मी
काही म्हणा भगवन परि, मज फळाची आस आहे

-अशोक

गुलमोहर: 

लग्न म्हणजे

Submitted by शाबुत on 11 April, 2011 - 16:59

लग्न म्हणजे,

तसं लग्न म्हणजे
दोन जिवांचा मेळ
दोन भावनांच बंधन
दोन मनाचं मिलन जन्मभराचं

एकानं पसरलं तर दुसर्‍यानं आवरायचं
एकाचा तोल गेला तर दुसर्‍यानं सावरायचं
एक कोलमडला तर दुसर्‍यानं उभं करायचं

दोघांच्या घामानं संसाराची बाग फुलवायची
तिच्या सुगंधानं सभोवतालच्यांना आनंदीत करायचं

तेव्हाच, कधीतरी निर्माण होईल एक बंध
दोघांमधल्या विश्वासाचा
तो विश्वासच पोलादी गज
संसारच्या सोनेरी इमारतीमधले

बाहेरच्या वार्‍या, वादळाशी झुंजण्यासाठी
कितीही भार पडला तरी न वाकण्याची
इमारतीला मानानं उभं ठेवण्याची
ताकद फक्त त्याच्यातच

बाहेरुन ते गज कधी नजरेत पडत नाहीत

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता