कविता

वास्तव.. ?

Submitted by पुरंदरे शशांक on 18 April, 2011 - 01:19

वास्तव...?

इंद्रधनुचे रंग रेखण्या येथ जाहले कुणी सज्ज
तलम झुळुक वार्‍याची हाती तरल प्रतिभेची समज

सागरतळ शोधित कुणी गेले गगनभरार्‍या मारी कुणी
सरस्वतीचा आशिष कोणा प्रासादिक इतुकी वाणी

निसर्गातले कुतुहल कोणा जनमानस शोधे कोणी
वैश्विकतेशी नाळ जोडण्या उत्सुकसे झाले कोणी

कौतुक वाटे प्रतिभेचे अन् कलागुणादी सकलांचे
वास्तव नजरेआड न होते पाय सकळचि मातीचे
..........................पाय परि ते मातीचे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

असंबद्ध..

Submitted by भानुप्रिया on 18 April, 2011 - 00:43

ह्या कवितेला एक premise आहे..अर्थात, सूज्ञ वाचकांच्या तो लक्षात येइलच..
आपल्या प्रतिक्रियांची वाट बघतेय..
--
आज झोपू नकोस रात्री..
म्हणजे झोपलास तरी जागासा रहा..
रात्र आळसावली की मग
दाराची चाहूल घे जरा..
कधीतरी आडनिड्या वेळी
तुझ्या अंगणात पैंजण रुणझुणतील..
दचकू नकोस तेव्हा..
हळूच नादणारी ती पावलं माझीच असतील..
तुझ्या अंगणातली शांतशी ती तुळस
थरारेल क्षणभर..
गाढ झोपलेला पाचोळाही कूस बदलेल..
रातकिड्यांच्या किरकिरेला भेदून जाईल
माझा एक रोखलेला हुंदका..
तू इतक्यात उठू नकोस..
अजून तुझ्या बागेतल्या गुलाबाशी बोलायचंय मला..
त्या फुलांचं आणि माझं नातं असं नाहीचे..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तुझे सुखाचे गाव लागले.

Submitted by कमलेश पाटील on 17 April, 2011 - 12:55

त्या मोकळ्या वार्‍याने सभोवती;
तुझ्या क्षणांचे आकाश आणले,
अन् या दुखाच्या वाटेवरती;
तुझे सुखाचे गाव लागले.

कसे आता तुझ्यात जगणे;
असे अचानक रिते वाटणे,
हरवुन जाता डोळ्यांमध्ये,
अश्रूंना जरासे बांध घातले.

खोट्या सुखाचा उगाच झोका;
मनास वेड्या साद घालतो,
समजून जाता प्रमाद माझे ;
तुझे खुळे हे भास दाटले.

गुलमोहर: 

तुरळक काही

Submitted by उमेश वैद्य on 17 April, 2011 - 12:19

तुरळक काही
.
हा ही गाव मागे पडला
राहिले जे तुरळक काही
एवढ्यातच ते ही जाईल
पुढल्याचा मज सोस नाही
.
कुठेच नाही थांबायाचे
आता कुणास भेटायाचे?
दूर कुठेसे दिवे दिसले
तरी पाऊल नाही वळवायाचे
.
जे आहे काही चिकटले
ते ईथेच म्हणतो देईन टाकून
शुष्क आड हा बरा भेटला
टाकण्या हे त्यात एकूण
.
माग कशाला काढील कोणी
पण पाउले ही विस्कटवावी
घ्यावी इतुकी आता काळजी
कुणास ना ही वाट कळावी
.
सावल्यांचे काय सांगु
मने त्यांची कशी कळावी
जरी घेतला शोध माझा
त्यांस केवळ पिसे मिळावी
.
आता सारे हलके हलके
रिकामे ही रिक्त खरोखर
बजावले मी आठवणींना
घ्यायचे ना काही बरोबर

असेलही जरी कुठे बरीशी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुंदर बाग ...!!

Submitted by प्रकाश१११ on 17 April, 2011 - 11:54

एक सुंदर बाग तयार केलीय त्याने
भरपूर मेहनत नि मशागत करून
त्याच्या मनात त्याने बाग फुलवली आहे
मस्त आभाळ नि उडणारी पाखरे
कोकीळेचां आवाज
नि कधी कधी ढग
नि इंद्रधनुष्य बांधून ठेवलेय
त्याने मनाच्या आभाळात
संनइचे सूर झिरपत येतील
जेव्हा तुम्ही हलकेच पावले टाकाल तेव्हा..!!

किती प्रकारची झाडे
निरनिराळ्या सुवासाची फुले
डोलताना दिसतील झाडा झुडपावर ,
चिमुकल्या रोपावर
फुलपाखरे झुलताना दिसतील
फुले डुलताना दिसतील

एक छानसे तळे नि हिरवागार काठ
त्यात पोहणारी बदके
नि राजहंस
रंगीत पाखरांची भीरी दिसेल आभाळात विहरताना
नि थंड हवा असेल अंगावर काटा फुलवायला

गुलमोहर: 

गारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं

Submitted by पाषाणभेद on 17 April, 2011 - 11:11

गारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं

या गारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं
उंच फना काढून पुंगीवर डोलतोय रं ||धृ||

मी बाई भित्री नाजूक माझी काया
डसला तर जाईल जीव माझा वाया
त्येला बघून मला भ्येव वाटतंय रं ||१||

त्याला नागपंचमीला दुध मी देते
त्याला लांबून नमस्कार करते
त्याला देवासमान मी मानते रं ||२||

त्याचा खेळ लई मजेदार असतो
पुंगी वाजवूनी नागोबा डोलतो
खेळ झाला की पैकं गोळा तू करतोय रं ||३||

बघ एक सांगते मी आता तुला
मुका प्राणी हा जर का मेला

गुलमोहर: 

मला वाटते

Submitted by ऋतुजा घाटगे on 17 April, 2011 - 09:54

मला वाटते मी व्हावे, सागराची एक लाट
जी तुझ्या पदस्पर्शाने पावन व्हावी.

मला वाटते मी व्हावे, चंद्राची एक शलाका
जी तुझ्यापर्यंत खुशाल पोहचू शकेल.

मला वाटते मी व्हावे, एक रेशमी वस्त्र
ज्याच्या पायघड्या तुझ्या पायाशी घातल्या जाव्यात.

मला वाटते मी व्हावे, शेकोटीतला एक नि़खारा
ज्याने तुझ्या गारठलेल्या हातांना ऊब द्यावी.

मला वाटते मी व्हावे, एक चंदनी खोड
ज्याने स्वतः झिजून तुला सुगंध द्यावा.

मला वाटते मी व्हावे, वार्‍याची एक अवखळ झुळूक
जिने तुझ्या केसांशी मुक्तपणे खेळावे.

मला वाटते मी व्हावे, एक पेटती मशाल
जिने अंधारात तुला मार्ग दाखवावा.

मला वाटते मी व्हावे, एक खारट आसू

गुलमोहर: 

क्षण क्षण!

Submitted by नीधप on 17 April, 2011 - 07:54

जुनीच कविता. २००६ मधे 'आतल्यासहित माणूस' हा कवितांचा नाट्याविष्कार असा प्रयोग मी दिग्दर्शित केला होता. मायबोलीवर मला भेटलेल्या काही कवींच्या(बेटी, हेम्स, परागकण, पेशवा, शुमा, क्षिप्रा, गिरीराज, दिपक) आणि माझ्याही काही कवितांचा समावेश या प्रयोगात होता. २००५ मधे लिहिलेली ही खालची माझी कविता या प्रयोगात वापरली होती.
---------------------------------------------------------------------------------
क्षण क्षण ठिबकतो घड्याळातून
मातीत मिळतो.
शोधू पहाता सापडत नाही.

खरंतर प्रत्येक क्षणाचीच मागणी असते
सोन्याच्या अक्षरांची.
एखादाच ते भाग्य घेऊन येतो.
बाकीचे लिहितात

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कविता माझी

Submitted by निनाव on 17 April, 2011 - 07:45

वय धावते आहे तरी,
कधी वेळ थांबतेच
मग कितीही ठरविले लिहायचे नाही,
तरी पेन उचलले जाते
धडपडच सुरु होते माझ्या मनी मग
असंख्य लाटांची
आणि उतरते मग त्यातून
सावरत..
नाजुक कविता माझी ..

सुंदर मउ पायांनी ..
अलगद पाउले टाकत
उघडून दार मनाचे
बाहेर डोकावत
थांबते, थोडी लाजते
मग पुन्हा नजर उचलून बघते
माझ्या डोळ्यात
स्पर्शते मन माझे..
अन ऐकते
स्पंदन माझ्या हृदयातले

गुलमोहर: 

पुन्हा सोसण्या सोशिक होते

Submitted by कल्पी on 17 April, 2011 - 05:51

अडले पाऊल ऊंब-यातले
दोन डोरली मनी काळे
हात गळ्याशी येता येता
आठवती मज झुलती वाळॆ

उभी बाभळी त्या रानातील
ताठर कणा ,भक्कम पाठ
मला सांगते जगुन घेना
अजुन होउदे मन ताठ

मी शरमले मी वरमले
बाभळीस मी गुरु मानीले
हातातील ते औषध फ़ेकुन
घाव सोसण्या उभी राहीले

जगुन घेते जगुन बघते
आता मी पण बाभुळ होते
जखमा व्रण विसरुन सारे
पुन्हा सोसण्या सोशिक होते
कल्पी जोशी
१७/०४/२०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता