माझी ही कविता......
ज्यांचे नवरे कुणालाही न कळ्वता वर्षानुवर्ष परागंदा झालेले आहे.......
आणि केवळ त्यांच्या मरणाची खबर नाही या एका आशेवर त्यांची वाट पहाणार्या त्यांच्या बायकांना समर्पित.....
गेला दिस वेशीपार
ना चांदण्याला जाग आहे
सख्या ये बिगीने घरा
आज अवसेची रात आहे..................
भोवतालच्या सावल्या
गेल्या परतुनी घरा
मागे उरली एकटी
मीच माझ्या संगतीला
भिवलेल्या माझ्या मना
तुझ्या आठवांची साथ आहे
सख्या ये बिगीने घरा
आज अवसेची रात आहे..................
वारा सुटला मोकाट
नावे साद मला घाली
तुला पाहता ना घरे
वैरी अंगचटीस लागी
घडु नये काही भलते
आठवणींच्या मृदू हातांनी
अलगद डोळे असे पुसावे
टाहो फोडून नेत्र हजारो
रंध्रारंध्रातून फुटावे
स्पर्श तुझा हा आठवणींचा
रोम रोम व्याकुळ निरंतर
असशील तेथून जवळ असा घे
मिठी बनावी सगळे अंतर
आठवणींच्या लाख कळ्यांनी
रात्र अशी ही बहरून यावी
सहवासाची स्वप्ननिळाई
तनामनातून विखरून जावी
आठवणींचे हात हजारो
तुझ्या मिठीचे, क्षणाक्षणाला
ये नं राजसा, चुंबून घे ना
आत्म्यामधल्या कणाकणाला
आठवणींचा गंध परिचित
मिटून डोळे तुला बघावे
हळूच डोळे उघडून बघता
बाहू पसरून तूच दिसावे
तुझ्या माझ्यातील आदिम बंधावर
कुठलेही संस्कार होण्याआधी
मला तुला खोल मिठीत घेऊ दे...
ओठांना ओठांनीच जाणवू देत
आत उसळणा-या रक्ताचे उष्ण प्रवाह,
हळूहळू नष्ट होऊ देत सभोवतालचं समग्र अवकाश...
रक्तात उतरलेल्या उत्क्रांतीच्या सर्वच खूणा
नाहीशा होऊन रक्त पुन्हा पोचू दे
त्या आदिम बिंदूपाशी जिथून ते पहिल्यांदा
वाहू लागलं स्पर्शांच्या चुंबकीय धमन्यांतून...
दोन जीवांना एकजीव करणा-या लिपीचा
सृष्टीत शोध लागला
त्या बिंदूवरून ओसरत खाली येताना
मग ठरवू सावकाश
या नात्याचं नाव काय?
या नात्यातले शिष्टाचार कोणते?
या नात्याची संस्कृती कुठली?
तुझ्या माझ्यातील आदिम बंधावर
मी जाताना उरेल काही
काही अधिक ,काही उणे
नकोस धुवु धुणे वेडे
दु:खाचे ते रडरड गाणे
तप्त निखारे डोक्यावरती
घेउन जेव्हा मी चाललो
राख त्याची तु अंगावरती
घे असे ,मी नाही बोललो
बागेमधली फ़ुले सुगंधी
फ़ुलली झुलली या फ़ांदीवरती
येउ दे ना हास्य "लकेरी"
गोड लोभस चेह-यावरती
जरी चाललो मी येथुनी
श्वास तुझाच मी बनलो आहे
बंध रेशमी युगायुगाचे
तुझ्याय रुजले , विणले आहे
कल्पी जोशी
मायबोलीकरांची वर्गवारी आणि आत्मपरिक्षण हा सानी यांचा लेख वाचला आणि
मन विशण्ण झाल. त्या वर हे सुचल...
म्हणे 'मायबोलीकर'
जरी येथ असती कुत्सीत कुटाळ
तो एक विटाळ मासीक धर्म
आपुलीये मराठी म्हणवीती 'माय'
वागणे ते काय कलंकित
येथ वावरती करूनिया 'कंपू'
एकटे संपू ऐसे वाटे?
मायमराठीची येथ होय पूजा
नसो भाव दूजा राऊळामाजी
जे येथ येई साहित्य लेणे
पुष्प ते वहाणे मराठीला
ऐशा कुसुमांस असो वा सुवास
नसता कशास काय उणे?
म्हणती स्वतःस 'मायबोलीकर'
परी फार दूर अ-क्षर मार्गी
कसे पहा कोणा आम्ही बोळविले
त्यांसी पळविले मारीती शेंखी
ऐसी जी करणी ज्या वाटतसे रस
होईल निरास सकल भ्रम
अगं आई,
आज दहा दिवस झाले गं....
बाबा म्हणतात, सावर गं पोरी, हे तर होणारच होतं कधी ना कधी....
त्याच्या हातात हुकुमाचा एक्का, डाव तर तोच जिंकणार... .फॅक्ट आहे गं साधी...
झालं ते भूतकाळात गेलं...पण तुझ्या सगळ्या छान छान आठवणी आणि अनुभव
मनात सांभाळुन ठेव आणि लेकीसाठी गोष्टीरुपात टिपुन ठेव....
पटतयं गं आई बाबांच म्हणणं ...तुम्ही नेहमीच आम्हाला धीर दिला...
पण मनाने तेही खचलेत.. कळतय की गं मला...
त्यांच्याशी फोनवर बोलताना, भावना अनावर होतात...
डोळ्यातुन आसवं बांध फुटल्यासारखी ओघळतात...
त्यांना त्रास नको म्हणुन सांगते सर्दी झालिये...
सध्या इथे थंडी खुपच वाढलिये...
दूर वाट अशी ही छळणारी
वळणावर अलगद निजणारी;
रात्र मोजती अंतर किती
अंतरावर तुझ्या ही सळणारी.
ह्रदयी टोचते ही पानगळ
मनास बोचतो गार वारा;
येशील कधी तु सांग सख्या रे
झुंझते वात ही विझणारी.
नागिण विरहाची भिरणारी
आवळते पाश भोवती मज असा;
येशील कधी तु सांग सख्या रे
विषदंश हर-क्षण ही घेणारी.
खडू आठवणींचे नदीत टाकतांना
तरंग एक एक उठणारी;
येशील कधी तु सांग सख्या रे
जगेल तरंग का ही विरणारी.
उजाडले तरी किती?
मनाला मनातच विचारले
काहितरी करायचे राहिले
असे नेहमीचेच झाले
फ़ायदा दिसलाच नाही
सर्व सल्ले हवेतच गेले
मित्रही म्हणे भेटुन गेले
मी उभा बसतच राहिलो
जाउ दे, नशिबच विकावे
असे कसे म्हणावे? पण
प्रयत्न वेडया अजुन असावे
आपले आपण ही शिकावे.
हेच ते समाधान
दुर ढकलत नेहमी हसते
डबके जरी असले तरी
खोल वाटु लागते.
संदर्भः
लहान असल्यापासून बाबांच्या नौकरी निमित्त खूप वेळा घर बदली करावे लागले. त्यात बरेच काही सुटले, मागे राहूनि गेले. मन फरफटले गेले सामाना सोबत. ही कविता काही वर्षांपुर्वी लिहिली होती. आजच मा.बो वर आले आहे, तेन्व्हा इथे देत आहे. इंग्रजी कि-बोर्ड असल्या मुळे चुका झाल्यास माफ करावे. अजुन हाथ बसला नाहिये.
स्थ्लांतर
पाउले पडत होती भराभरा घराकडे
अन असंख्य विचार घुमत होते मना मधे
शहर सोडण्याची तयारी झाली असेल का?
सामान सगळे बांधले असेल का?
बाबांनी काढले होतेच तिकिट परवाच
नातेवाईक सगळे जमले असतील का?
पोहोचताच घरी मन झाले अजुनच जड
ह्या वॄंदावनाची ओवाळेल आरती कुणी का?
कितीही चांगला वागून ठरतो हीन एखादा
तरीही मानतो आनंद याचा दीन एखादा
मला स्वीकारले नाही तरी अभ्यासतो मृत्यू
जणू प्रस्ताव ठेवावा विचाराधीन एखादा
कुणी निष्पाप आरोपी, कुणी बेमान फिर्यादी
कसे समजेल की आहे गुन्हा संगीन एखादा
तुझी चर्चा निघाली की मनाला शांतता मिळते
इथे भेटेल का कोणी तुझा शौकीन एखादा
कसा आणायचा कोणी जमाना कालचा आता
पुरावा लागला हाती जरी प्राचीन एखादा
नव्या रस्त्याकडेला मी कसासा थांबलो आहे
जणू वाडा उरावा पेशवेकालीन एखादा