कविता

नसे चिंता विश्वाची..!!

Submitted by mahesh_engpune on 10 April, 2011 - 05:34

नसे चिंता विश्वाची आहे या आत्म्याची,
पैशात मोजितो किमंत भक्तिची.
नाही वेळ स्मराया तुझे नाम अंतरी,
जाहलो गुलाम अनाहुत वेळी.
कुठे नजरही अशी भिरभिरे शोधायला सुख,
नाही शब्द होण्या जगण्याच्या या दुखातुन होण्या उतराई.
उगी स्मरे मग नाम तुझे मज त्या कातर्वेळी,
नाम आपोआप येत तुझे माझ्या ओठी.
ज्याची जैसी करणी देसी तैसी भरणी.
मरुनी न जाणे मिळेल का मुक्ती
म्हणुनी आहे चिंता ही त्या मुजोर आत्म्याची.

------------------- महेश घुले.

गुलमोहर: 

आज ही गेले

Submitted by निनाव on 10 April, 2011 - 04:12

आज ही गेले काल मधे जमा झाले
आठवणींच्या पेटित असे बंद झाले!!

न आठवलो मी कुणास आजही
न कुणी मज आज भेटीस आले!!

बघून आभाळ खिडकीतुन म्हणतो मी
चला दिवस अजुन एक कमी झाले!!

अनवाणी चालतांना टोचले जर पायी
अजुन एक घाव, नवीन काय झाले!!

कुणी ठेवले नाव मज, तिच्या नावानं
नाव असे झालेच, तर निनाव काय झाले!!

आज ही गेले काल मधे जमा झाले
आठवणींच्या पेटित असे बंद झाले!!

गुलमोहर: 

रे !

Submitted by sumati_wankhede on 10 April, 2011 - 03:45

’खोटाच बहाणा होता !’ अश्रूंनी पुसले मजला
काय खरे नि खोटे... मज उमजावे कसे रे !

मी काळीज घेऊन हाती, मध्यरात्रीच्या काठी
कुठवर सोडू उसासे... मम समजावे किती रे !

तो भ्रमर होऊना गातो, आकाशात भटकतो
कसे बेडी तोडून यावे... मन जाळावे किती रे !

मी गोंजारावी प्रीत, की पाळू जगाची रीत ?
हे देहभान, ही साद... तन गुंतावे किती रे !

काटेरी मायाजाल, की फसवी रानभूल ?
आत्म्याने कुडी त्यागता... राखेस पुसावे का रे !

गुलमोहर: 

'माझे' पुराण

Submitted by सुनिल जोग on 10 April, 2011 - 01:26

मी, मी, मी
आणि
फक्त मी, मीच
तू नाहीस, तुम्ही नाही
तो,ती,त्या,ते,त्या,ती
नाहीत...
मी आणि फक्त मीच..

सारे जग माझे
सारे जीवन माझे
सारे काही माझे
माझे,माझे आणि माझेच

पैसा माझा,घर माझे,
जमीन माझी,जग माझे,बायकापोरे माझी
सर्व काही माझे
माझे,माझे आणि फक्त माझेच

मग...
तरी मी एकटा मित्रा
का... सांगशील मला?

गुलमोहर: 

गझलचं पझल

Submitted by डॉ अशोक on 9 April, 2011 - 13:10

गझलचं पझल

उंटावरच्या स्त्री सारखा
रदीफ चिकटून होता
चार काफिये दौडत आले
पण, फौजफाटा अपूरा होता

अलामतची बिलामत
अंगावरच आली
तखल्लूसची युक्तीसुद्धा
कामी नाही आली

मुसलसल गैर-मुसलसल वादात
आपण नाही पडलो
मात्रावृत्त की गणवृत्त यासाठी
आपण नाही रडलो

मतला फारच मातला तेंव्हा
शेर पुढे आला
एका शेरावर पावशेर घेतला
तेंव्हा कुठं डोळा लागला

हे गझलचं पझल काही
आपल्याला सुटलंच नाही
"इर्शाद"चं दान काही
पदरात आपल्या पडलंच नाही !

-अशोक

गुलमोहर: 

ता.क.

Submitted by मी मुक्ता.. on 9 April, 2011 - 09:50

पत्रास कारण की,
आज दुपारी पाऊस पडला..
या मोसमातला पहिलाच..
काम होतंच, तरी पण मुद्दाम बाहेर पडले ऑफिसच्या,
कोणीतरी ढकलून दिल्यासारखी..
उष्ण वारं वाहत होतं..
तुझे श्वास असेच भासायचे.. बहुतेक..
रस्त्याच्या कडेने धुळीच्या छोट्या छोट्या वावटळी
तयार होऊन विरत होत्या..
हल्ली तुझे विचार विरतात असेच थोडेसे भिरभिरुन..
वादळं होत नाहीत त्यांची..
इतका भरुन येऊन पण बरसत नव्हता तो,
तूही असाच गप्प रहायचास ना बोलायचं असताना..
काहीच मनाला येईना तेव्हा मुकाट्याने परत येऊन डोकं घातलं कामात..
नेहमी दुर्लक्ष झाल्यावरच बरसायची खोड त्याला.. तुलाही..
असो, पाऊस पडून गेला..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

त्याचे येणे

Submitted by मृण_मयी on 9 April, 2011 - 03:49

स्पर्श अहेतुक झाला होता असे वाटले
सहज जवळ तो आला होता असे वाटले ||धृ||

नयनी लज्जा, अनाहूत गालावर लाली
तप्त श्वास अन्‌ उरात धडधड सोबत आली
एकटाच तो आला होता असे वाटले ||१||

स्वागत करण्यासाठी लज्जित शब्द जुळवले
अबोध ओठांवरुनी त्याने अलगद टिपले
मद्याचा तो प्याला होता असे वाटले ||२||

अशाच गाठीभेटी व्हाव्या सांज-सकाळी
अशीच व्हावे राधा मी अन्‌ तो वनमाळी
पावा हृदयी घुमला होता असे वाटले ||३||

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बिघडलीये काच!

Submitted by नीधप on 9 April, 2011 - 02:57

जुनी कविता परत टाकलीये
----------------------------------
खिडकीची काच बिघडलीये.
दोन प्रतिबिंबं दिसतात हल्ली.
एक साधंच
एक डोळे वटारणारं.
देवाच्या चांदीच्या डोळ्यांसारखे
माझेच डोळे
काचेत बसून रहातात.

मी आक्रसत रहाते स्वतःला.
त्याचा फोन..
एखादी धुंद आठवण..
एक गम्मतनाच..
जुनेपाने कपडे घालून वावर..
देहामनाची तगमग...
सगळं सगळं
त्या डोळ्यात टिपलं जातं.
मी आक्रसत रहाते..
चांदीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात

खरंच
बिघडलीये ही काच
बदलली पाहिजे!

- नी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रिती झोळी

Submitted by अज्ञात on 8 April, 2011 - 10:24

का कातर वेळी कोप तुझा
मी संध्या तुझि रे भेटखुळी
एकांत विरहिणी निशा कुढे
चंद्रिकाहि झुरते गोप कुळी

राशींभवती नक्षत्रांची
वलयांकित तव सलगी खेळी
अंगार अंग लाही वणवा
अंतरी भावनांची होळी

सल छळे रात्रभर जळे कुडी
राखेची घरभर रांगोळी
पापणी लवे साखर प्रहरी
रजनी स्वप्नात; रिती झोळी

....................अज्ञात

गुलमोहर: 

माझ्या भावना...

Submitted by पल्ली on 8 April, 2011 - 08:09

आज माझ्या भावनाही
मजला अशा सोडुन गेल्या
राहिली ना लक्तरेही
इतक्या मला फाडुन गेल्या....
राहिलेल्या सोबतीने
हरक्षणांच्या साक्षी या
सोडुन गेल्या गेल्या जरी
वळुनही मज पाहीत ना.....
मीही म्हंटले ठीक आहे!
जाता अशा तर जात जा
डोळ्यात नाही पाणी आता
हृदयात नाहीत भावना......

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता