सावली

Submitted by कौतुक शिरोडकर on 13 April, 2011 - 06:08

आधीच एकटेपणाची भीती...
त्यात 'गर्द अंधारात सावलीसुद्धा सोबत सोडते'
म्हणूनच..
प्रकाशाचा ध्यास घेतला.
असंख्य प्रकाशझोतात
बहुविध सावल्यांनी भोवताली फेर धरला,
सगळ्या सावल्या माझ्याच असूनही
एकही माझी वाटेना.
मग प्रकाशाची प्रखरता वाढवत गेलो....
...
....
आता मी पुन्हा
'माझ्या सावली'च्या शोधात आहे.

गुलमोहर: 

Happy great...

कविता एकदा वाचली तेव्हा अर्थबोध झाला नाही.... दुसर्‍यांदा वाचली तेव्हा एक आणि पुन्हा वाचली तेव्हा अजून एक आशय सापडला..

एकटेपणा हे खरंतर आपल्या आयुष्यातलं अंतिम सत्य आहे, आणि आपण त्यापासूनच पळण्याचा प्रयत्न करत असतो, त्या ओघात मग वेगवेगळ्या गोष्टी आत्मसात करून स्वत:चीच अनेक रूपं बनवतो आणि शेवटी आपल्यालाच प्रश्न पडतो की, यातला मी, खराखुरा/री नक्की कोणता/ती? खूप अंधार आणि खूप प्रकाश... दोन्ही घातक, अर्थात कोणतीही गोष्ट अती वाईटच. कारण दोन्हीत माणसाचं अस्तित्व लोप पावतंय... हल्लिच्या आयुष्यात तसा ही यंत्रवाद (निर्माण केलेली चकचक/प्रकाश) खूप झालाय, त्यात माणसाचं स्वत:चं अस्तित्व शोधणं... फार मुश्किल झालंय..

हा मला सापडलेला आशय... माहीत नाही तुला काही वेगळं अपेक्षित आहे का ते..

आवडली की नाही? ५०-५०
वास्तव योग्य शब्दात (जरा अवघड) करून्(च) मांडलंयस फक्त.