प्रिय

प्रिय

Submitted by वृन्दा१ on 25 April, 2017 - 12:29

असंबद्ध स्वप्नांच्या पुसट आठवणींसारखे
हे जवळून वाहात जाणारे बिनचेहऱ्याचे दिवस
आणि गाडीत अचानक झोप लागून
आपलं स्टेशन मागेच निघून गेल्यानंतरचा
पोटातला खोल खड्डा
प्रिय, खरं काय असतं आणि खोटं कशाला म्हणायचं
हे विचारायलाही तू भेटत नाहीयेस आजकाल.....

विषय: 
शब्दखुणा: 

गर्भपात करणारी आई, ती वेडी बाई (़गर्भातल्या लहानग्या मुलीची खंत)...

Submitted by आठवणीतला मी.... on 28 February, 2012 - 06:55

{ आई आणि तिला गर्भपात करायला लावना-या त्या लोकांसाठी गर्भातील त्या लहान मुलीने हे तर म्हणले नसेल ना????}

प्रिय,
*
प्रिय मा़झ्या आईस हे माझं अखेरच पत्र,
ते डॉक्टरांचे कसले ग होते पोट तपासण्याचे यंत्र.
*
आई माझ्या येण्याची तुला लागली होती चाहुल,
मग का उचललेस सांग तु गर्भपाताचे हे पाऊल.
*
वाटलं नव्हंत मला तु अशी भेदशील,
़जन्माला येण्याआधिच माझ्या काळजात छेद करशील.
*
वाटलं नव्हंत मला तु एवढ्या लवकर सोड्शील,
दोघांमधली जुळलेली नाळ एवढ्या लवकर तोडशील.
*
त्या नराधम लोकांनी आणली तुझ्यावर गर्भपाताची वेळ,
तु नव्हता कारायला पाहिजे माझ्या जिवनाशी खेळ.
*

गुलमोहर: 

प्रिय मित्रा!

Submitted by नीधप on 13 April, 2011 - 22:08

ही कविताही जुनीच आहे. क्षिप्राच्या ब्लॉगवरच्या तिच्या प्रिय या कवितेतल्या
तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे
मी कधी फुशारुन गेले नाही

या पहिल्या दोन ओळींच्यावरून सुचलेली..

-----------------------------------------
तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे
मी कधी फुशारुन गेले नाही
मी मोहरले नक्कीच

हे तात्कालिकच आहे
अशी समजूत घातली स्वतःची
तगमग शांतवण्यासाठी
'का होईना! ओढ तर आहे'
अशीही समजूत घातली मनाची
सुखावून जाण्यासाठी..

या तात्कालिक प्रेमाआड नक्की काय आहे
मी कधीच पाह्यलं नाही.
गरज वाटली नाही
भीतीही वाटली.

प्रिय मित्रा,
मला सांग रे

गुलमोहर: 
Subscribe to RSS - प्रिय