न्याय
ख-याचं भांडण खोट्याशी होतं, तेव्हा
खरं समजावण्याची पराकाष्ठा करतं
ख-याकडं भक्कम पुरावा कुठंय
म्हणून खोटं काही मानत नसतं
एक काळा कोटवाला खोट्याला कडेवर घेतो
मीच खरा कायद्याचा रक्षक ठणकावून सांगतो
खरं गुडघे टेकत न्यायाची याचना करतं
पण न्याय आंधळा असतो
भकास, उदास,वाकलेलं, क्षीण सत्य ताटकळत कोर्टाच्या अंगणात
“मेरी बारी आयेगी” असं मनाला बजावत
संवेदनाहीन, निर्ढावलेल्या कायद्याच्या नजरा
निराश, हताश, उपाशीपोटी सत्य सायंकाळी घरात