............ न्याय तुमचा खास आहे

Submitted by डॉ अशोक on 12 April, 2011 - 05:08

............ न्याय तुमचा खास आहे

तक्रार तुमची, पोलीस तुम्ही, न्याय तुमचा खास आहे
सीता असो वा द्रौपदी, नशिबात अमुच्या वनवास आहे.

आले किती, गेले किती, यात सारे गर्क झाले
बागेतल्या फुलांनाही, येथे गणिताचा तास आहे.

कोण वेडा, कोण नाही, वेडेच ठरविती सर्व काही
लाट आहे बारकी पण, मज सुनामीचा भास आहे.

भाट यांचे गाऊन गेले, ढोल यांचे बडवून झाले
बंद करतो कान माझा, इतुकाच मजला त्रास आहे.

पेरले मी, राखले मी. चातकासम थांबलो मी
काही म्हणा भगवन परि, मज फळाची आस आहे

-अशोक

गुलमोहर: 

मस्त Happy

छाया देसाईंशी सहमत!

(अवांतर - गझलतंत्राच्याही जवळपास गेलेली आहे. )

सीता असो वा द्रौपदी - ही ओळखी खूप चांगली ओळ आहे अशोकराव!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मंदार, छाया आणि बेफिकीर
धन्यवाद!
बेफिकीर जी
या कवितेच्या शीर्षकात कंसात "संशयित गझल" असं लिहीणार होतो, पण नाही लिहीलं. बेटर सेन्स प्रिव्हेल्ड..
-अशोक