फाटलेलं झुंबर

Submitted by सकाळ on 12 April, 2011 - 13:58

दिसलं आहे का तुम्हाला कधी फाटलेलं झुंबर ?
मला दिसलं होतं एकदा - काळजाचा ठोका चुकवून तेंव्हा निघून गेलं .
पण आता लटकलेलं असतं अधांतरी माझ्या मनावर
तेच फाटलेलं झुंबर ..

तुम्हालाही नक्की दिसलं असेल कधी ते फाटलेलं झुंबर
कधी आईने टाकलेल्या बाळाची बातमी वाचून
कधी आई -बापाने केलेला पोटच्या गोळ्याचा खून वाचून
कधी आईने मुलांसह केलेली आत्महत्या वाचून

कधी माणुस म्हणून जन्माला आल्याची खरीखुरी लाज वाटली आहे का ?
कधी पाशवी बातम्या वाचून देवाची, मानवजातीतर्फे माफी मागितली आहे का ?
कधी मनात अन्यायाचे धागेदोरे जुळवण्याचा अर्धवट प्रयत्न करून सोडून दिला आहे का ?
कधी बेचिराग झालेले संसार टीव्ही वर बघून , मनाचा कप्पा बंद करून जेवायला बसले आहात काय ?
जरा खोल जा मनात - काय दिसलं ?
दिसलं ना आता

मनावर अधांतरी लटकलेलं
तेच फाटलेलं झुंबर ?

गुलमोहर: