कधी कधी गाभा-यात देव नसतो
(आवडत्या भक्ताला भेटायला जातो?)
तरी पुजारी नेमाने पूजाअर्चा चालूच ठेवतो,
कधी देवाचं परत येणं लांबतं
तेव्हा पुजारी कदाचित विसरूनही जातो त्याची वाट पाहाणं वगैरे.
स्वयंभू स्थान, मंत्रभारला गाभारा, स्वतःची चिवट श्रद्धा
या सा-यातदेखील त्याला जाणवत राहतं देवाचं अस्तित्व
आणि यातच समाधान मानून,
देव कधी का होईना परत आलाच तर
अशी स्वतःची सांत्वना करीत
पुजारी जगत राहतो अस्सल पुजा-याचं आयुष्य...
यावेळी देवाचं परत येणं खूपच लांबलं
(आवडत्या भक्तापाशी देव इतका रमला की आपला गाभारा विसरला?)
पुजारी मरताना रिकाम्या गाभा-यात एवढंच म्हणाला,
बोलकी गं डुक्कर-
धुंदी मनाची उतरत नाही, झटकून आळस उठवत नाही!
जेंव्हा येतो तुझा विचार, बुद्धी होते बधीर पार!
भूकेचा वेळी ना लागते भूक,ना मिळतं झोपेचा सुख!
डोक्यात तुझाच पिक्चर असतो चालू, रीवाइंड-रीवाइंड मी खेळत बसतो वेडू!
भ्रमिष्ठा सारखा असतो नुसता बसून,
करायला भरपूर अभ्यास असून!
तासालाहीघुमतो तुझाच आवाज फक्त,
शिक्षकाचा जातो ठक-ठक करून नुसतं!
व्यायाम करायला येतो भलताच जोर, मनाचा नाचतो बघ सारखा मोर!
डोकं मात्र माझं नाही कुठंच हालत, तुझ्यापाशी सोडून नाही कुठं चालत!
आतातरी माझ्याकडे पाहशील का!
त्रासातून या मला काढशील का!
देशील का सांग माझ्या प्रश्नाचं उत्तर!
नाहीतरी.. वर्ल्ड कप संपलाय..
वर्षाअखेरीची धावपळही
आणि मुलांच्या परिक्षाही..
आयपीएल तर संध्याकाळी
थोडा वेळ आहे तळव्यावर..
मलाही वाटलं तेव्हा मग
"सो कॊल्ड" भ्रष्टाचाराविरोधात
एखादी मेणबत्ती पेटवून..
उभं राहावं.. एका कळपात..
आणि ...
माहितीचा अधिकार... लोकपाल..
असं पुटपुटावं काहीबाही..
पण खोटं का बोलू...
आयुष्यात बरेच शॊर्टकट्स
मी ही मारलेत...
परवा पिवळा लाइट असताना
गाडी पळवली म्हणून दिलेली चिरिमिरी..
पैशाची निकड भागवताना..
बिलाची फाइल पास व्हावी
म्हणून केलेली हुशारी..
क्वचित कधीतरी
तिकीटं काढताना...
रांगेत केलेली घुसखोरी..
"जिंदाबाद" करायला
मेंढरांची गर्दी | लांडगेच नेते |
रोजे खाती प्रेते | जीती जागी ||
मेंढरांच्या मनी | कुपणाची भीती |
जुन्या चालीरीती | पुढे चाले ||
एक चाले पुढे | बाकी तयापाठी |
नाही तर काठी | पाठीवरी ||
वाळले गवत | मेंढराचा घास |
कोकराचा वास | लांडग्यासी ||
अशी ही मेंढरे | विचार हा त्याज्य |
लांडग्यांचे राज्य | चालू असे ||
-हरीश दांगट
तुझ्या देव्हार्यातली सांजवात
काल अचानक फडफडत राहिली
माझ्या काळजाचा ठोका चुकवत..
रित्या हातांचा लगबग आडोसा
निमीषार्धात तिला सावरायला
निष्ठूर वाऱ्यापुढे हतबल होण्याआधी..
पण तुझी सांजवात केव्हाच विझली होती.
उरला होता फक्त भयाण काळामिट्ट अंधार,
चुटपुटणारं मन,
आणि जळकट तेलाचा असह्य दर्प..
खरंय..
अपशकुनच तर झाला होता..
तुझ्या देव्हार्यात माझा पाय जो पडला होता..
डायरी चाळतांना ही कविता दिसली.. आज इथे प्रकाशित करत आहे:
******
अंगडाई घेतेस तु जेंव्हा हात उचलून
बघताच मी वीज भिरभिरते अंगभर जणु
लपतेच चंद्र तुझ्या हातात तसे चेहरे तुझे
लाजाळुच जशी बसतेस तु अंग दुमडून
चढत्या श्वासांना मग दाबतेस तु कसून
बावरलेल्या ओठांना चावतेस हसुन
हात शोधतात पदर हातातला मग
अधिकच मोहक येतेस तु दिसून
चढत्या श्वासांना तु दाबतेस कसून
बावरलेल्या ओठांना चावतेस हसुन
हात शोधतात पदर हातातला मग
अधिकच मोहक येतेस तु दिसून
उडावे केस मोकळे तुझे मग विसरुन
उठाव्या नजरा तुझ्या हळुच ठरवून
असह्य होते माझेच मला तुझे दिसणे मग
पडावे मजवर तुझे मधु यौवन कोसळुन
विपरीत

सांजेची वेळ, नाही काळवेळ
तुझ्या आठवणींना.
गालावरून फिरते अहर्निश, एक मोरपीस
तुझ्या आठवणींचे.
केवड्याचे पान, त्याची नसे शान
तुझ्या स्मृतीगंधापुढे.
सांवळी कृष्णकमळे, त्यांतूनही सुगंध उमले
तुझ्या आगमनाचा.
हांसरी मधुमालती, तिने जोडली नाती
तुझ्या पाऊलखुणांशी.
एक वेडी, फुले तोडी
ईशपूजेसाठी.
खरेच आहे वेडी ती, वाहिली तिने फुले सारी
अखेर तुझ्याच पायांशी !
चिंचेच्या झाडावर आहे चेटकीचा तळ
तिच्याकडे आली आज पाहूणी हडळ
पाहूणीच्या संगे तिचे नोकर पस्तीस
मावशीला भेटायला आले झोटींग, खविस
तळावर होईल आज मोठी मेजवानी
शाकीण-डाकिणीची नाच आणि गाणी
किंकाळ्या आरोळ्या घेती तळ डोक्यावर
खेळ रंगेल भूतांचा चंद्र येई माथ्यावर
सारी भुतावळ निघे पहा हेराया सावज
ईथे दूर वस्तीवर पहा येतील आवाज
पहाट होताना निघे मुंजोबाची स्वारी
पुढे उभे वेताळ ढाळीती चवरी
गणित सुटलं तसं सगळ्यांच्याच लक्ष्यात आलं
की उत्तर फारच सोप्पं होतं!
आपण उगीचंच समीकरणं, असमीकरणं,
सूत्रं, प्रमेयं, सिद्धांतं इ. इ. अनेक गोष्टींचा
काथ्याकूट करीत बसलो यातल्या कशाचीच
उत्तर मिळवण्यासाठी गरज नसताना.
प्रश्न सोडवताना प्रश्नच अधिक अवघड करीत बसलो.
मला मात्र अजूनही असंच वाटतंय,
आपण केलेला काथ्याकूट
टेक्निकली अनावश्यक असला तरी
'त्या'च्याशिवाय हे गणित
कधीच सुटलं नसतं....