Submitted by छाया देसाई on 12 April, 2011 - 07:44
धीराने प्राप्त परीस्थितीशी
नीमूट झुंज देणारा तू
चंचल अधीर वयात
उमजला असतास तर
माझ्या स्वप्नांचे पदर
तुझ्या पुढ्यात उलगडले नसते
सगळ्या स्वप्नाना तुझ्यासाठी
मूठमाती देण्याची ताकद
तेव्हाही होती अन आताही आहे
दोघांच अशरीरी नात
पण ते न लादायचा तुझा अट्टाहास
माझ्यावर शेवटी लादलासच
आज सांजवेळी मला अन मलाच घेरून
तू जेव्हा बावरतोस तेव्हा मी अजूनही
लाख चैतन्य एकत्रीत करत असते
फक्त तुला अन तुलाच घेरण्यासाठी
अन तू मात्र तसाच माझी मान मर्यादा जपत
अमर्याद प्रदेशात
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छाया देसाई -छान मन लावून
छाया देसाई -छान मन लावून लिहिलेय
धीराने प्राप्त परीस्थितीशी
नीमूट झुंज देणारा तू
चंचल अधीर वयात
उमजला असतास तर
माझ्या स्वप्नांचे पदर
तुझ्या पुढ्यात उलगडले नसते
पु.ले.शु.
खूपच छान प्रयत्न. असेच अजुन
खूपच छान प्रयत्न. असेच अजुन यवु द्या. आवडले.
सगळ्या स्वप्नाना तुझ्यासाठी
मुठमाती देण्याची ताकद
तेव्हाही होती अन आताही आहे
दोघांच अशरीरी नात
पण ते न लादायचा तुझा अट्टाहास
माझ्यावर शेवटी लादलासच
हे खूप सुंदर लिहिले आहे.
पण ते न लादायचा तुझा
पण ते न लादायचा तुझा अट्टाहास
माझ्यावर शेवटी लादलासच
काय सॉल्लिड ! मनाला भिडल्या या ओळी. पूर्ण कविताच प्रभावी झालीय. पु.ले.शु.
खूपच छान ! खूपच सुंदर !!
खूपच छान !
खूपच सुंदर !!
छान.
छान.
(No subject)
क्या बात है छायाजी.... इकदम
क्या बात है छायाजी....
इकदम हटके है ये मॅडमे !