Submitted by शाबुत on 11 April, 2011 - 16:59
लग्न म्हणजे,
तसं लग्न म्हणजे
दोन जिवांचा मेळ
दोन भावनांच बंधन
दोन मनाचं मिलन जन्मभराचं
एकानं पसरलं तर दुसर्यानं आवरायचं
एकाचा तोल गेला तर दुसर्यानं सावरायचं
एक कोलमडला तर दुसर्यानं उभं करायचं
दोघांच्या घामानं संसाराची बाग फुलवायची
तिच्या सुगंधानं सभोवतालच्यांना आनंदीत करायचं
तेव्हाच, कधीतरी निर्माण होईल एक बंध
दोघांमधल्या विश्वासाचा
तो विश्वासच पोलादी गज
संसारच्या सोनेरी इमारतीमधले
बाहेरच्या वार्या, वादळाशी झुंजण्यासाठी
कितीही भार पडला तरी न वाकण्याची
इमारतीला मानानं उभं ठेवण्याची
ताकद फक्त त्याच्यातच
बाहेरुन ते गज कधी नजरेत पडत नाहीत
पण इमारत पाडायची म्हटलं की जाणवतात
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
श्याम, अप्रतिम शब्द. तुमच्या
श्याम,
अप्रतिम शब्द. तुमच्या काव्या चे विशेष म्हण्जे, कुठलेही कठिण शब्द न वापरता अगदी सुंदर विषय हाताळणी केली आहे. कवितेतला संदेश जपला गेला आहे.
बाहेरच्या वार्या, वादळाशी झुंजण्यासाठी
कितीही भार पडला तरी न वाकण्याची
इमारतीला मानानं उभं ठेवण्याची
ताकद फक्त त्याच्यातच
बाहेरुन ते गज कधी नजरेत पडत नाहीत
पण इमारत पाडायची म्हटलं की जाणवतात
पुलेशु. अजुन येवू द्या असेच छान.
सूंदर कविता
सूंदर कविता
छानच हे माझे लग्नाबद्दलेचे
छानच

हे माझे लग्नाबद्दलेचे मत
http://www.maayboli.com/node/21907
(No subject)
सगळ्यांच्या प्रतिसादाबद्द्ल
सगळ्यांच्या प्रतिसादाबद्द्ल आभारी ....