कविता.

अशीच एक सायंकाळ !

Submitted by किंकर on 12 April, 2011 - 21:06

एक शहर थोडे वाढलेले. थोडे पसरलेले. नात्याचे गुंते फुललेले,
कधी नदी काठी,कधी किल्यापाठी,
कधी बाईक वरील लाँग राईड,
कधी गावाबाहेरील रस्त्यावरून चालतच पकडलेली एक साइड.
अशाच जातात अनेक संध्याकाळी.
माहित नसते पुढे काय लिहलेय भाळी.
त्या दिवशी एका संध्याकाळी, हवेत असाच थोडा गारवा थोडी शिरशिरी.
रोजचा रस्ता रोजची वाट,
पण तिने माळली नाही, नेत्र् कटाक्षातून ओसंडणारी हसरी वहिवाट.
तिला विचारले काय झाले?तर म्हणते सारे संपले.....
खूप बोललो, मनातून हललो. पण उत्तरादाखल मौनच बोलले.
ती संध्याकाळ खूपच लांबली. जणू उन्हे परतायची थांबली.
मला आठवल्या सगळ्याच संध्याकाळी
माहित नव्हते हेच आहे कपाळी.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माझ्यासाठी नव निर्मिती.

Submitted by किंकर on 27 March, 2011 - 11:57

आज बसलो लिहायला कविता, लेखणीत भरली ठासून शाई
जुळवण्यासाठी यमक, कानामात्रे शोधताना,वेलांटीच उलटी होई
आठवेनात नवीन शब्द,सुचेनात काहीच विचार
अकार उकार हवेत कोणाला,नुसतेच मारू रफार
मग पुन्हा पुन्हा उचलले,भोवतीचे कागदांचे बोळे
कडव्याच्या जुळवा जुळवी साठी ,फिरवले त्यावरून डोळे
ताल नाही सूर नाही, नाहीत अलंकार,अनुप्रास
त्यासाठी सुचावे लागते,आतूनच विनासायास
आडातच काही नाही,तर येईल कसे पोहर्‍यात
छंद बद्ध झाली नाही तरी,मीच माझ्या तोर्‍यात
अशी हि माझी कविता,मीच पुन्हा पुन्हा वाचून पाही

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कविता.