Submitted by निनाव on 13 April, 2011 - 17:32
बेफिकिर जी आणिक इतर तज्ञ मंडळी: ही गझल आहे कि नाही, हे मी तुम्हा वर सोडतो! मी केवळ एक प्रयत्न करतो आहे. सध्या कविता मधे प्रकाशित करतो आहे. मार्गदर्शन लाभावे - विनंती.
***
हल्ली नसतात रात्री न दिवसही पहिल्यासारखे
पाहे वाट मज साठी न जागे कुणी पहिल्यासारखे
वाटा ओसाड घरे उजाड न बंध पहिल्यासारखे
मने गार न काळजी फार कुणाची पहिल्यासारखे
वाळवतो आहे दुख्ख घरातल्या घरात न पहिल्यासारखे
आहेच कोठे आता अंगणी झाड लिंबाचे पहिल्यासारखे
मयखान्यातही हल्ली असते गर्दी न पहिल्यासारखे
लपुनच पितात लोक, न दर्द त्यांचे पहिल्यासारखे
लिहितो आहे मी आज तर नाव ठेवतात पहिल्यासारखे
हिच आहे रीत निनाव असलो तरी काय पहिल्यासारखे
गुलमोहर:
शेअर करा
निनाव्, जग जिंकण्या आधी,जग
निनाव्,
जग जिंकण्या आधी,जग पाहिलं पाहिजे.
खालील लिंक्स मनःपूर्वक वाच. अजून काही उत्तमोत्तम कविता,गझल यांचे यथेच्छ वाचन कर... आणि मग कविता लेखनास ''सुरुवात'' कर. शुभेच्छा.
http://www.maayboli.com/node/21889
http://www.sureshbhat.in/gazalechibarakhadi
http://mazigazalmarathi.blogspot.com/2008/06/blog-post_14.html
http://www.sardesaikavya.com/
निनाव तुझ्यात थोडी सुधारणा
निनाव
तुझ्यात थोडी सुधारणा आढळते आहे...चांगलं आहे. लिहीत रहा
निनाव - वाटा ओसाड घरे उजाड न
निनाव -
वाटा ओसाड घरे उजाड न बंध पहिल्यासारखे
मने गार न काळजी फार कुणाची पहिल्यासारखे
हे छान वाटले. पु.ले.शु.