कविता

आई

Submitted by कल्पी on 5 April, 2011 - 23:17

सकाळपासून घरभर फ़िरत असतेस
घरातल्या निर्जीवात जीव भरत असतेस..

मंदीरातली मूर्ती तू देवघरात असतेस
मला तू ज्ञानात देविच दिसतेस

यक्षीणी बनून मला तू वाढतेस
खरं सांगु "आई अनुसयाच "असतेस

गोधडीच्या आत तूझ्या स्पर्षाचा सहवास
उब मिळते मला नसे गारठयाचे भास

तूझ्या कुशीतच "आई"जन्म माझा जावा
युगानुयुगे मी तूझाच पुत्र व्हावा

कल्पी जोशी
१२/०३/२०१०

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अधुरे चित्र

Submitted by किंकर on 5 April, 2011 - 19:33

आताशी तिची आठवण एक वेदना असते
ठणकायची थांबली कि, अजून दुखते

तिच्या येण्याकडे मी लावतो डोळे
कलती सांज सांडते, रंग आरक्त खुळे

राहते चित्र मनीचे, आजही अधुरे
अधुर्‍या चित्रातील, रंग होती गहिरे

एकेका फटकार्‍याने होईल चित्र रेखाटून
भरले जर रंग त्यात,तर तू पाहशील अवगुंठून

खरेतर ठरले होते,कॅनव्हासवर चित्र तुझेच असणार
रेखाटून होता रूपरेषा, रंगही मीच भरणार

आज पुन्हा मी उलगडून बसलोय कॅनव्हास
आसपास तिची नसता चाहूल, अनुभवतोय सहवास

उद्याच्या भरवशावर वाटले, आज आवरावा तो पसारा
पण मग उद्या पुन्हा वाट पाहणे नको म्हणून
मी आजच साकारतो, कॅनव्हासवर एक फटकारा

गुलमोहर: 

व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना

Submitted by पाषाणभेद on 5 April, 2011 - 14:26

व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना

मामा अहो मामा,
तुमच्या पोरीला काय समजवाना
फोन केला तर म्हनती,
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||धृ||

कालच आणला मोबाईल नवा
मार्केटमधी लई त्याची हवा
वाटतंय तिनं एकदा तो पहावा
पण तिची भेटच होत नाहीना!
फोन केला तर म्हनती
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||१||

आता सगळं कसं सांगू तुमाला
मोबाईलचा हायटेक जमाना आला
तिला सारं काही समजते
रोजरोज एसऐमएस पाठवते
पर व्हायब्रेटर ही काही रिंगटोन नाहीना!
फोन केला तर म्हनती
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||२||

गुलमोहर: 

नागवा

Submitted by पल्ली on 5 April, 2011 - 05:14

भावनांची उफ्फ उधारी
मी पुरा भांबावलो
श्वास ही माझे नसावे
कि भिकेला लागलो....
.
क्षणैक सुखाच्या कल्पनांचा
मी शिराळा शेठजी
मांडले विक्रीस नशिबा
मज विकाया लागलो....
.
पाहुनी लाचार जन्मा
मी स्वतःला हासलो
हाय इतुका मी नागवा
कि स्वतःला लाजलो.....
....................

गुलमोहर: 

विरह

Submitted by yashwant197 on 5 April, 2011 - 04:00

नसतेस तू जवळ तेव्हा जीवाचे राण होते
चाहुल तु़झी लागताच त्या राणात प्राण येते

नाही तु दिसलीस तर होतो निरजीव मा़झा दोळा
लागलाय माझ्या मनाला तुझ्या प्रेमाचा लळा

ज्ररी उघडपणे बोलत नसलो,तरी
भरल्या आहेत तुझ्याच आटवणी व प्रेम माझ्या उरी

नाही मी विसरू शकत विरहाचे ते क्षण

गुलमोहर: 

तुझा सहवास

Submitted by क्रांति on 5 April, 2011 - 02:13

तुझ्या नजरेने गात्रांवर गोंदलेली धुंदी
श्वास श्वासांत माळून गेले बकुळ सुगंधी
तुझ्या बोलण्याने छेडलेली मंद नंदधून
तुझा सहवास उसळतो रोमरोमातून!

तुझ्या प्राजक्ताचा गंध माझे फुलवी अंगण
तुझ्या भासाचे-ध्यासाचे माझ्याभोवती रिंगण
धुंद होते, मिरवते तुझ्या चाहुली लेऊन
तुझा सहवास उसळतो रोमरोमातून!

वीज लहरे देहात अशी तुझी नेत्रबोली
तिच्या वर्षावात चिंब होते लाजून अबोली
मला लपवू पहाते, डोळे माझेच झाकून
तुझा सहवास उसळतो रोमरोमातून!

गुलमोहर: 

डेली सोप

Submitted by UlhasBhide on 5 April, 2011 - 01:13

डेली सोप

अदृष्य लेखक,
अज्ञात कथा…
आपण,
साधायचा संवाद
परिस्थितीच्या विसंवादाशी;
आपल्या अर्ध्या-मुर्ध्या पटकथेतून.
...…बेअरिंग सांभाळत,
वठवायची
पदरी पडलेली भूमिका.......
आणि इच्छेने, ईर्षेने
वा अनिच्छेने
सुरू ठेवायचे
एपिसोड मागून एपिसोड…..
चॅनेलकडून ’बंद’ चा आदेश येईपर्यंत.

.... उल्हास भिडे (४-४-२०११)

गुलमोहर: 

सावलीस लपता

Submitted by निनाव on 4 April, 2011 - 17:47

तुझ्या सावलीस लपता लपता
जात होतो गल्लीत अंधार जसा
कुठे होते ठाऊक तरी मला
भेटशील तिथं ही तु अशी
वेड्यावानी माझी वाट बघता

विखुरले काच असे आज खाली
असंख्य तुकड्यांमधे तारेच
ओठी लागायचे माझ्या कधी
नजर काढून माझी झाले रक्तरंजित
विघ्न जणु माझे घेता घेता

शोधत राहिले ते सारे त्याला त्या घरातच
हसु न आवरले मज पाहाता पाहाता
गुंतले होते मन कुणाचे किती बघत
जड होता तो कोपर्‍यात उभा
दाटुन होते मन त्याचे जाता जाता

गुलमोहर: 

उरली थोडी वहीत पाने...!

Submitted by चैतन्य दीक्षित on 4 April, 2011 - 10:55

उरली थोडी वहीत पाने, अन् थोडी लेखणीत शाई
फक्त एवढ्यावर आयुष्या कसा तुझा होऊ उतराई?

तुझ्या भव्यतेची हिमशिखरे, सहस्रसूर्यापरी लकाकी
प्रगल्भतेचा अथांग सागर, वर्णायाला आहे बाकी ।

अजुन सुखाची नवी पालवी, अन् दुःखाचे जुनाट काटे
अजून नाही लिहिलेले मी, तव रस्त्यांचे अनंत फाटे ।

अनेक हळवे, गहिवरले क्षण, तसेच अधिरे स्पर्श तुझे अन्
लिहू कसे मी कठोर निर्णय, नवरंगांचे हर्ष तसे अन्?

कितीक खाडाखोडी होत्या, सुवाच्य तरिही होते काही,
कितीक असतिल खाडाखोडी, सुवाच्य तरिही असेल काही ।

हिऱ्यासारखे असंख्य पैलू, गूढ तुझे अन् माझे नाते
लिहिणे यावर अशक्य केवळ, तरी लेखणी लिहीत जाते ।

गुलमोहर: 

कविता एका माणसाची

Submitted by कल्पी on 4 April, 2011 - 10:55

कसे सांगा कुणी ऐकावे माणसांचे
हाकलुन मारती थवे माणसांचे

चिमटा कुणी काढला कुणाला
अशाने गोडवे कसे गावे माणसाचे

ओरबडुन गाव माझे उध्वस्त केले
सांगा माणसाने कसे रहावे माणसाचे

आगबंबाळ आता ऐसा होउ नको रे
शांत डोके नेहमी असावे माणसाचे

ईतके कुणीही वाईट नव्हतेच तेव्हा
पशु पक्षी देखिल व्हावे माणसाचे

क्षुद्र कुणाला का समजतोस लेका
असावे सिमेतच हेवेदावे माणसाचे
कल्पी जोशी
०५/०४/२०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता