चारोळी

ऑनलाईन डेटिंग वरून प्रेरित चारोळी :

Submitted by चुन्नाड on 19 April, 2021 - 06:13

आंतरजाली भेट झाली
छायाचित्रे किती पाठवली
कधी होशील समोर प्रकट
का प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट

© चुन्नाड

विषय: 

आई

Submitted by गणक on 15 April, 2021 - 06:58

आई

आई जणू असे
पंच महाभूत ।
भुमिका अद्भुत
आई होणे ।

आई जणू पाणी
मायेचा सागर ।
प्रेमाची घागर
सरली ना ।

आई जणू हवा
सजीवांना श्वास ।
अंतालाच कास
सुटतसे ।

आई जणू अग्नी
परीक्षेचा काळ ।
पती मुलं बाळ
सांभाळणे ।

आई जणू पृथ्वी
सृष्टीला आधार ।
कधी ना माघार
पोषणात ।

आई ती आकाश
खग घेती झेप ।
अन्नाची या खेप
पिलांसाठी ।

चारोळी

Submitted by मी अनोळखी on 12 June, 2020 - 05:48

पावसानं सारं रान भिजून जावं
असच काहीतरी तुझं नि माझं व्हावं
थेंब मिसळतो जसा मातीत
तस तू ही माझ्यात मिसळून एकजीव व्हावं...

विषय: 
शब्दखुणा: 

एक अपूर्ण रचना:

Submitted by शब्दरचना on 27 December, 2018 - 00:20

लाल सडा फुलांचा पदरावर माझ्या
हा अट्टाहास कोणाचा आयुष्य रंगवण्याचा?

मी अस्ताव्यस्त आहे
हा अट्टाहास कोणाचा मज पुन्हा मांडण्याचा?

शब्दखुणा: 

अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - फेसबुक साठी रेडीमेड स्टेट्स - जाई.

Submitted by जाई. on 26 August, 2017 - 15:37

श्री गणरायाला वंदन करुन सादर करत आहोत खास सोशल मिडीया सॅव्ही मंडळीसाठी आमचे एक खास प्रॉडक्ट. ​
स दा पडीक ऑन सोशल मीडिया सर्व्हिस एजेंसी चे "द ग्रेट वॉल ऑफ पोस्ट्स "फेसबुक स्टेट्स पॅकेज!! एकदा अनुभव घ्या आणि कायमचे गिर्हाईक व्हा !

FB screen -1.jpg

आमची खास पॅकेजेस पुढीलप्रमाणे

FB SCREEN 2.jpg

आणि हे

विषय: 

चारोळी

Submitted by कविनारायण on 15 March, 2015 - 13:18

तू कितीही तोडून फेकलेस मला,
तरीही मी तुझाच होणार आहे,

पारिजातक आहे मी,
पायाखाली चुरगाळले तरी सुगंधच देणार आहे...।

शब्दखुणा: 

कितीकदा..

Submitted by रमा. on 25 January, 2014 - 03:06

कितीकदा तेच सूर आळवायचे पुन्हा
कितीकदा उसवणार आसमंत तो निळा
कितीकदा भरून नेत्र चांदरात कोसळेल
कितीकदा तू सांग मी असेच प्राण द्यायचे…

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

चक्र-चारोळी

Submitted by रमा. on 7 October, 2013 - 07:48

नियतीच्या या खेळामध्ये बेभरवशी अनेक साथी
आंधळा य हिशोब सगळा मांडला जगाच्या माथी
पुन्हा फिरूनी जन्मा येती जूनीच जाणी,नवीन ओठी
सैलावतसे जुनेच बंधन बांधण्या मग नवीन गाठी..

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - चारोळी