नर्मदा माई . . . .तिच्या प्रत्येक वळणावर ती काही ना काही आपल्याला शिकवत असते . मी नर्मदा मातेच्या काठावर बसून तिचा प्रवाह तासन्तास पहात बसायचो ! ती जणू काही मला आयुष्य कसे जगायचे तेच शिकवायची !
अतिशय अल्प साठा जन्माला घेऊन आलेला आपला जीव असतो . शारीरिक बळ अल्प असते , बुद्धी अल्प असते , सारेच कमी असते . नर्मदा मातेचा उगमही असाच करंगळी भर जाडीच्या धारेतून होतो .
माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळावरील लेखांक ८२ मधील लेखनाचा संपादित सारांश
माझी खंडित झालेली नर्मदा परीक्रमा २०२० !..
पाण्यात या शिरू नका
पुराशी त्या खेळू नका
चिडली ही नदी माय
तिची साक्ष काढू नका
.
जीवनाची धात्री जरी
सारे नाही तिच्या हाती
वरुणाचे देणे कधी
जड होते तिच्या माथी
.
युगेयुगे धावती ती
तिला ठाव तीच गती
तेच पाणी दिसे तरी
नित्य नवी होते रिती
.
पाणियाचा धर्म पाणी
गाणे जीवनाची गाणी
खोलवर डोहामध्ये
परि कालियाची फणी
.
आदबीने वागायाचे
काठावर राहायाचे
सहज ती होता पुन्हा
अंगावरी लोळायाचे
.
देणारीही तीच आहे
घेणारीही होते कधी
आकाशीचे शुभ्र तेज
पांघरून छतावर
शांतपणे निजलेली
पिठूर इवली घर
दाटलेली चंद्र प्रभा
साऱ्या कणाकणावर
सुख अद्भुत मोहिनी
जडलेली प्राणावर
गर्द पानातून किर्र
गुंजे प्राचीन संगीत
शांत मुग्ध निळाईत
गूढ दाटला एकांत
धुंदावणारा सुगंध
विशाल आम्र मोहरा
ओळखीची सळसळ
अनोळखी तरुवरा
ओघळला मेघ कुठे
कुणास शांत निजवी
थकल्या पायात बळ
माय गातसे अंगाई
अर्थ मुळी नव्हताच
कुठल्याही अस्तित्वाला
नच कुणी पाहणारा
दर्शनी सोस कुणाला
कोण मी इथे कशाला
नुरली आठव खंत
नितळ निवांत शांत
पाजळलो प्रकाशात
विक्रांत प्रभाकर
किनाऱ्यावर थबकलेले
साचलेले पाणी
बुडालेल्या घाटावर
अवघडलेले पाणी
जागेवाचून स्नानाला
खोळंबले भक्तवर
त्या त्यांच्या विनंतीस
मैयाही निरुतर
आवारात मंदिराच्या
घुसलेल्या गाड्या
अतिपरिचयात
झालेली अवज्ञा
धीरगंभीर प्रसन्न
एकमुखी दत्त
चैतन्यानी दाटलेले
जागृत आसमंत
कुठल्याही धनाविन
ऋण मुक्तेश्वर
भरलेले पाणी तरीही
पंपाचा आधार
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
मैया काठी
आत खोलवर
गूढ एकांती
शांत गंभीर
भल्या पहाटे
पिठूर चांदण्यात
दोन माता
गार गोट्यांत
बसल्या होत्या
पूजा करीत
निर्भय धीर
शांत आश्वस्त
चार दिवे
त्यांनी सोडले
हळूच लहरत
जवळ आले
गार बोचरा
वारा आणि
दुधाळ पाणी
खळखळ गाणी
उष्ण अश्या
प्रेमळ प्रवाही
देहास सोडून
दिले मीही
मी मैया त्या
चार ज्योती
चंद्रप्रभा अन
पाण्यावरती
कितीवेळ मग
माहित नाही
चंद्र उतरला
माझ्या देही