"लॉर्ड्स" शब्द उच्चारले की अनेक प्रतिमा डोळ्यासमोर उभ्या राहतात. शाळेत असताना ब्रिटिशांबद्दल ऐकलेल्या गोष्टी (ते साम्राज्यावर सूर्य न मावळणे वगैरे), तेव्हाचा बलाढ्य इंग्लिश संघ, परंपरा पाळण्याची त्यांची सवय यामुळे पूर्वी या सर्वाचा एक दरारा वाटायचा. त्यामुळे जेव्हा १९८३ मधे कपिल च्या संघाने तेथे वर्ल्ड कप जिंकला तेव्हा त्या समारंभाकडे व तेथील लोकांकडे बघताना एखाद्या हुशार विद्यार्थाला शाबासकी देणारे शिक्षक लोक असा आविर्भावच जाणवत होता. नंतर हळुहळू ते कमी झाले. भारताने ते दडपण झुगारून दिले - राजकीयदृष्ट्या आणि क्रिकेटमधे सुद्धा.
भीती ही मानवी मनाचा अविभाज्य भाग आहे. या भीतीचा अनुभव घेणंही कधीकधी आनंददायक असतं, कारण तिचा संबंध गूढतेशी, रहस्याशी, साहसाशी असतो. गूढ, रहस्यमय असं काही अनुभवणं ही मानवी मनाची गरजच असते, आणि चित्रपटांमधून, पुस्तकांमधून काही अंशी ती पूर्णही होते. रत्नाकर मतकरींच्या गूढकथांनी गेली काही दशकं खिळवून ठेवलं आहे. आता हृषिकेश गुप्ते या तरुण लेखकानं आपल्या गूढकथांद्वारे हा वारसा पुढे नेला आहे.
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती !
जो जे वांछिल तो ते लाहो ! संत ज्ञानेश्वरांनी परमेश्वराजवळ सकळ चराचरासाठी असे व्यापक पसायदान मागितले होते. जगात आजुबाजुला पसरलेली विषमता, गरीबी पाहून कधी कधी असे वाटायला लागते की ज्ञानदेवांची मागणी त्या सर्वव्यापक परमेशाजवळ पोहोचलीच नाही की काय कोण जाणे? पण जसजसे आपण समाजाच्या अधिकाधिक जवळ जायला लागतो, त्याच्याशी एकरुप व्हायचा प्रयत्न करतो तसतसे त्या परमेशाची कारगुजारी लक्षात यायला लागते आणि मग लक्षात येते की नाही..., तो जागाच आहे आणि आपल्या लेकरांवर लक्ष ठेवून आहे. आत्ता सगळीकडे एकाच वेळी असणे त्यालाही कार्यबाहुल्यामुळे जड जात असेल कदाचित 
'अतिथी महाराष्ट्रीय शाकाहारी जेवण'. दिलीप आणि कालिंदी पळशीकर यांनी पुण्याची खाऊगल्ली असणार्या जंगली महाराज रस्त्यावर गेली अठ्ठावीस वर्षं दिमाखात चालवून आपला मराठी बाणा जपलेलं नाव! अपार परिश्रम, आरोग्यदायी स्वच्छता आणि सर्वोत्तम दर्जाचे सातत्य या तीन आधारस्तंभांवर उभं असलेलं 'अतिथी' हे कोणत्याही उद्योगासाठी एक अनुकरणीय उदाहरणच आहे. 'अतिथी'च्या कालिंदी पळशीकर यांच्याशी त्यांच्या या शून्यातून उभ्या केलेल्या अतिथीविश्वाबद्दल मायबोलीकर आशूडी यांनी केलेले छोटेखानी हितगुज खास मायबोलीकरांसाठी.

***
खरेदीमध्ये जून २०११ मध्ये नव्याने दाखल झालेली काही पुस्तके.
२००७ च्या नाताळच्या सुट्टीत कुठे जावे ह्याचा शोध सुरु होता. केरळ, तामिळनाडू, उडीशा, काश्मिर असे ऑप्शन्स होते. शेवटी केरळ नक्की झाले. केरळला जाण्याचा सर्वात योग्य सिझन म्हणजे हिवाळा. डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात कोची ला पोहोचलो.
डॉ आयडा स्कडर -(लेखिका - वीणा गवाणकर) एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचा परिचय
प्रिय वीणाताई,
साधारणपणे ६ महिन्यापूर्वी आपले डॉ. आयडा स्कडर हे पुस्तक माझ्या हातात आले, आणि वाचल्यानंतर कार्व्हरनी जसं मनात घर केलं तसंच यांनी पण केलं. तुम्ही जर डॉ आयडा स्कडर यांच्याबद्दल लिहिलं नसतं तर या आभाळा एवढ्या व्यक्तिमत्वाची ओळखच झाली नसती.
डॉ आयडा स्कडर - जवळ जवळ ९० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या एक सेवाव्रती डॉक्टर! ज्यांच्यामुळे सेवाव्रती या शब्दाला अर्थ लाभला.